मनोरंजन

Name: Sumit Rekhi Youtube Channel: cookingnotension Channel link: https://youtu.be/cq7nFdvs0S0

@cookingnotensionbyhomechef1687 on Youtube

आणि वरील विषयांवरील त्याचे इतर व्हिडिओ

ताजे, घरच्या घरी, प्रेमाने, स्वतःसाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी बनवलेले अन्न…किती साधी गोष्ट आहे नाही? पण आजकाल बाहेरच खाण्याचाच कल खुप वाढलाय.

मित्रमैत्रिणी, बंधूभगिनी यांच्या बरोबरच्या अनौपचारिक गप्पांमधे हा मुद्दा खुपदा चर्चिला जायचा. ‘आपल्या नोकऱ्या, व्यवसाय सांभाळता सांभाळता घरी स्वयंपाकही करायचा? किती थकून जातो आम्ही’, ‘मला नाही आवडत स्वयंपाक करायला’ ते ‘किती अवघड असत ते’ अशी विविध कारण ऐकू यायची. आणि त्यातच मार्च २०२० मधे टाळेबंदी लागली. सगळेच घरात अडकून पडले. घरातच राहून स्वतःला कशा ना कशात गुंतवून ठेवण्यासाठी एक दिवस झटपट होणारे कैरी लोणचे करायला घेतले, गंमत म्हणून मोबाईलवरच कृती रेकॅार्ड केली, संगणकावर व्हिडियो संपादन केल, त्या व्हिडियोला व्हॅाईसओव्हर दिला, पार्श्वसंगीत दिल…आणि बघता बघता एक छान पाककृतीचा व्हिडीयो तयार झाला. हे करता करता व्हिडीयो संपादनाबद्दलही बरच शिकायला मिळाल. मग हा व्हिडीयो युट्यूबला टाकला आणि व्हॅाट्सॲपवर दिला सर्व गटांवर पाठवून…आणि बघता बघता प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला.

चॅनलला नाव काय द्याव हा विचार करताना सहजच सुचल की स्वयंपाकाची भिती घालवायची आहे ना मग ‘Cooking? No Tension’ अस नाव देऊया. आणि मग झाला सुरू हा प्रवास. प्रत्येक पाककृतीनंतर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि चॅनल सबस्क्राइब करून लोकांनी दिलेला प्रतिसाद याने नवनविन काहीतरी करत रहाण्याचा उत्साह टिकून आहे. उद्देश हाच आहे की कुणीही स्वयंपाकाची भिती बाळगू नये, खुप अवघड वाटणाऱ्या पाककृतीही अगदी सोप्या पद्धतीने करता येतात, स्री असो वा पुरूष; स्वयंपाक प्रत्येकालाच करता येतो व यायला हवा, पुरूषांनीही हे जगण्याच महत्वाच कौशल्य आत्मसात करून घ्याव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरच्या घरी, ताज पौष्टिक अन्न सर्वांनी खाव.

आलेल्या दोन प्रातिनिधीक प्रतिक्रिया इथे देत आहे. एक मुलीची प्रतिक्रिया होती…’अय्या, इतक सोप असत स्वयंपाक करणे? मी उगीचच घाबरत होते’ आणि एक मुलाची ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे प्रमाणेच Cooking? No Tension! अस सांगून स्वयंपाकाची भिती घालवणारे सुमित रेखींना खुप खुप धन्यवाद…!’ ☺️

आपलाच होमशेफ,
सुमित रेखी

Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}