प्रोजेक्टस्मंथन (विचार)

पुरोहितांनी ,  एकत्र येऊन सामुहिक शेती करण्याचा प्रकल्प आखला व यशस्वी करुन दाखवला. 

!! जय श्री परशुराम !!

गेल्या वर्षी (२०२०) कोरोना परिस्थितीत विदारक व हताश वातावरण असताना, रोजगार नसताना, परिस्थिती पुढे हताश न होता कणकवली येथिल काही  पुरोहितांनी ,  एकत्र येऊन सामुहिक शेती करण्याचा प्रकल्प आखला व यशस्वी करुन दाखवला. कणकवली येथिल एका ब्राह्मण सद्गृहस्थाने त्यांची पडजमीन विनामोबदला कसण्यासाठी या ग्रुपला बहाल केली.

शेतीच्या कामांची सवय व माहिती नसताना देखील या समुहाने  सर्व प्रकारचे कष्ट एकत्रितपणे केल्याने त्यांनी त्या पडजमीनीत सुंदर शेती प्रकल्प उभारला.जंगलातून पालापाचोळा, काड्या जळणएकत्र करुन जमीन भाजून व साफ करुन शेती योग्य तयार केली.जमीनीची नांगरण, मशागत, पेरणी, लावणी ही सगळी कष्टाची कामे त्यांनी स्वतः केली. शेतातील पडीक घरातच तात्पुरती मुक्कामाची सोय करुन जेवणाखाणाची, आरामाची व्यवस्था केली.

पावसाळा पूर्व भात पेरणी केल्या नंतर जंगली श्वापदां पासून, रानगव्यां पासून शेतीचे रक्षण केले. काही महिन्यातच त्या पड जमीनीचे रुपांतर हिरव्या गार अशा भातशेतीत केले..आलेले सर्व उत्पन्न त्या ८-९ पुरोहितांनी  आपापसात वाटून घेतले..

या सर्व उपक्रमास ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन ने संपूर्णपणे अर्थ साहाय्य केले.

प्रेरणा : -या उपक्रमापासून प्रेरणा घेत अजून दोन समुह निर्माण झाले आणि त्यांनी यंदाच्या (२०२१) वर्षात सुद्धा अशाच प्रकारचा सामुदायिक शेतीचा उपक्रम सुरु केला.परिस्थिती पुढे हताश न होता नाविन्यपुर्ण कल्पनेने सकारात्मकने  कणकवलीच्या या पुरोहितांनी समाजापुढे आदर्शच निर्माण केला आहे.कणकवलीचे एक सुजाण व सुज्ञ पुरोहित श्री. प्रसाद देवस्थळी यांनी या तिनही उपक्रमाचे यशस्वी  नेतृत्व केले.

जय श्री परशुराम !

टिम – ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}