दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

एक क्षण पुरेसा असतो.. नकारात्मक विचार दूर सारणारा -मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.

बरेच दिवस हे मनात होत,खर तर कुठल्या तरी कार्यक्रमात हे मनोगत व्यक्त करायच होत.

एक क्षण पुरेसा असतो… नकारात्मक विचार दूर सारणारा
मंडळी आजकाल सगळ्यांची सहन शक्ती खूपच क्षीण होत चालली आहे १०वी, १२ वीच्या निकालाच्या वेळेस आत्महत्यांच्या बातम्यांनी पेपरचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. व्यवसाय नीट चालत नाही म्हणून आत्महत्या, ब्रेकअप मुळे आत्महत्या, अहो एवढच काय मोबाईल दिला नाही म्हणून शाळकरी मुला मुलींची आत्महत्या, कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या…………….. कारण अनेक,पण सगळ्यात महत्वाच कारण मन मोकळ कराव इतक आपण कुणाच्या जवळ जातच नाही
आत्महत्या म्हणजे काय? हे माहीत सुद्धा नसत कित्येक वेळा, त्या वयात आत्महत्या? आत्महत्येची कारण जरी वेगवेगळी असली तरी त्याच मुळ शेवटी एकच असत, आणि ते म्हणजे नकार पचवण्याची ताकद मनामध्ये नसते, मन कमकुवत होत चाललय हल्ली, आणि जीवघेणी स्पर्धा.
पैसा, करिअर, समाजाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याची भावना.
आत्महत्येचा विचार किंवा अशा प्रकारे नकारात्मक विचार हा क्षणिक असतो तेव्हा त्या विद्यार्थी किंवा व्यक्तीने क्षणभर थांबून देवाने दिलेल्या ह्या सुंदर या जीवनात कधी स्वतःसाठी वेळ दिला आहे का? विचार केला आहे का? की आपण पैसा, करिअर यामागे एवढे का धावत आहोत? ज्या सुखासाठी, ज्या व्यक्तींसाठी आपण धावत आहोत, त्या व्यक्ती, ते सुखाचे क्षण आपल्यासोबत कायम असणार आहेत का? या धावण्याला आपण काही मर्यादा घालून घेतली आहे का?
उर फुटे पर्यंत धावून सर्वच मिळवण्याच्या वेडापेक्षा रमतगमत चालत,निसर्गाचे अनेक आविष्कार बघत,आहे त्यात समाधान मानता येत नाही का?
काहीही न करता इन्स्टंट सुख मिळवणे, त्याचप्रमाणे कोणा ना कोणाचे सतत अनुकरण करण्याचा प्रयत्न करणे तो त्या ठिकाणी काय काय त्याग किंवा परिश्रम करून पोहीचलाय याचा विचारही न करणे, चित्रपट व वास्तव जीवन यांतील फरक न ओळखणे ही कारणे सुद्धा असू शकतात. या सर्वांवर उपाय काय? आज अनेक जण म्हणतात समुपदेशन घेतल पाहिजे, पण खर तर बऱ्याच लोकांना समुपदेशन म्हणजे काय, हे माहिती नाही. Physiatrist कडे जाणे म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे असा समज होणे.
मी सध्या श्रीमद भागवत आणि गीता वाचतोय आणि त्यावरून एक गोष्ट कळली ती म्हणजे,या जगातला सर्वांत मोठा counselor श्रीकृष्ण आहे,त्याने रणांगणावर जे अर्जुनाला गीतेतून मार्गदर्शन केले आहे, तेच आजच्या प्रत्येकासाठी योग्य समुपदेशन आहे.
गीतेत काय आहे?
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात समोर फक्त शत्रू आहे आणि त्याला हरवायला युद्धा शिवाय पर्याय नाही
युद्ध कर!
आज आपल्या समोर हे शत्रू कोण आहेत? तर मनातली भयाची भावना, राग, संशय, लोभ, मत्सर आणि त्यामुळे पक्का होत जाणारा नकारात्मक विचार जो पुढे जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. आपण काय करतो की ह्याच विचारांवर, वरील शत्रूंवर प्रेम करतो, त्यांना उराशी कवटाळून बसतो.
अस न करता आपण जर त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला तर हे लक्षात येईल, की ज्याप्रमाणे भगवान कृष्ण ज्या प्रमाणे अर्जुनाच्या पाठीशी होता, त्याप्रमाणे तो आपल्याही पाठीशी आहे.
त्यामुळे नकारात्मक विचार आल्यावर तो तसाच पुढे नेण्यापेक्षा जरा एक क्षण थांबून विचार केला तर सहज समजेल, की आपण स्वतःला विनाकारण त्या विचारांच्या कोषात बांधतो. त्या क्षणी जर जवळच्या व्यक्ती बरोबर थोडस बोललो तर त्याच्या कडून काही सकारात्मक विचार मिळतील, शिवाय आवडत्या देवावर श्रद्धा ठेवून त्याला पूर्ण शरण गेलो तर नक्कीच आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकतो.
या जगात कोणतीच गोष्ट निरर्थक नाही. दगडाला घडवल तर मूर्ती तयार होते,मातीचा उपयोग करून तहान भागवणारा सुंदर माठ तयार होतो. आपण तर माणूस आहोत. देवानी ह्या भूतलावर पाठवलेली सर्वांत सुंदर व उपयुक्त गोष्ट म्हणजे माणूस. देवाची सुंदर रचना म्हणजे आपले जीवन ते असे सहजासहजी वाया घालवू नका.
नकारात्मक विचार आल्याक्षणी जर आपण कोणाची तरी मदत घेऊन स्वतःला सावरले, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच.
ज्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात त्यांनी एकदा तरी गीता उघडून वाचावी,नक्कीच त्यातून मनःशांती मिळेल.
त्याच बरोबर आपल्या आजूबाजूला अशी माणस जोडा जी तुम्ही नुसता आवाज दिला तरी तुमच्या मदतीला धावून येतील,तुमच्या सुख दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.
आपल्या ब्राह्मण यूनिटी मध्येच अशी अनेक जीवाला जीव देणारी मंडळी आहेत. देवा, उपेंद्र, रूपा मैय्या ह्यांचा मी स्वतः अनुभव घेतलाय,संजय हेजीब सारखा माणूस माझ्या कवितेवरून ओळखतो की मला काही तरी प्रॉब्लेम आहे. गोळ्या वेळेवर घेत नाही म्हणून ओरडणारी बहिणी सारखी डॉक्टर विभा आहे, आजारपणात घरी येऊन सलाईन लावणारा डॉ किशोर आहे, डॉ मिलिंद राजूरकर आहे.
सगळा ग्रुप पाठीशी असतो कायम नाव लिहीत बसलो तर खूप मोठी लिस्ट होईल,पूर्ण ग्रुप हे माझं कुटुंब आहे नामोल्लेख नसला तरी सगळे माझेच आहेत आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.
ह्या दिवाळीच्या मुहूर्तावर सुरूच करा माणस जोडायला, तुम्हा ज्याला भेटाव वाटत त्याला फोन करा, समक्ष भेटा, विचार मांडा, बोलते व्हा. बोललात तर निम्मे टेन्शन संपून जाईल हे मी स्वानुभवातून सांगतोय.अजुन एक काम करायच,तुम्ही सकारात्मक विचार करायला लागलात आणि तुम्हाला जर एखादी व्यक्ती भेटली जी निराशेच्या गर्तेत आहे त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्याचा मनापासून प्रयत्न करा, हे तुम्हाला सहज शक्य आहे🙏
जय परशुराम
ब्राह्मण यूनिटी जिंदाबाद

राजेश सहस्त्रबुद्धे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}