Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर 15-10-2025

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर 15-10-2025
सीमा रस्ते संघटनेने (BRO) सीमावर्ती भागातील आव्हानं पाहता या भागातील दळणवळण सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक उत्तुंग कामगिरी केली आहे. सीमा रस्ते संघटनेने इंजिनिअरिंग क्षेत्रात मैलाचा दगड रोवला आहे. बीआरओने मिग ला पास (Mig La Pass) पर्यंत रस्ता तयार केला. ही जगातील सर्वात उंच 19,400 फूट उंचीवरील मोटरेबल पास (Motorable Pass) आहे. पूर्वी लडाख क्षेत्रात हिमांक प्रकल्पातंर्गत उमलिंग ला (19,024 फूट) खिंड गेल्या वर्षी तयार करण्यात आली होती. त्यापेक्षा उंचावर बीआरओने नवीन प्रकल्प उभारला आहे.
BRO च्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा! लडाखमध्ये 19,000 फूट उंचीवर बांधली सर्वात उंच मोटारेबल खिंड
Mig La Pass Ladakh : सीमा रस्ते संघटनेने (BRO) सीमावर्ती भागात उत्तुंग कामगिरी केली. लडाखमध्ये 19,000 फूट उंचीवर सर्वात उंच मोटारेबल खिंड उभारली आहे. इंजिनिअरिंगमधील हा मोठा चमत्कार ठरला आहे. काय आहे हा प्रकल्प, जाणून घ्या एका क्लिकवर…
सीमा रस्ते संघटनेने (BRO) सीमावर्ती भागातील आव्हानं पाहता या भागातील दळणवळण सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक उत्तुंग कामगिरी केली आहे. सीमा रस्ते संघटनेने इंजिनिअरिंग क्षेत्रात मैलाचा दगड रोवला आहे. बीआरओने मिग ला पास (Mig La Pass) पर्यंत रस्ता तयार केला. ही जगातील सर्वात उंच 19,400 फूट उंचीवरील मोटरेबल पास (Motorable Pass) आहे. पूर्वी लडाख क्षेत्रात हिमांक प्रकल्पातंर्गत उमलिंग ला (19,024 फूट) खिंड गेल्या वर्षी तयार करण्यात आली होती. त्यापेक्षा उंचावर बीआरओने नवीन प्रकल्प उभारला आहे.
हिमांक प्रकल्पाचे मुख्य अभियंता ब्रिगेडिअर विशाल श्रीवास्तव यांनी या मोहिमेविषयी भरभरुन माहिती दिली. “ही खिंड उभारून खूप मोठा आनंद होत आहे. मला माझ्या चमूचा अभिमान वाटतो. या दुर्गम, डोंगराळ आणि उंच भागात उमलिंग ला पासचा रेकॉर्ड तोडला. आमचा उद्देश केवळ विक्रम मोडणे नाही तर तर सशस्त्र दल आणि नागरिकांना दर्जेदार सेवा पुरवणे हा आहे. या प्रक्रियेत जर एखादा जुना विक्रम मोडीत निघत असेल तर हा एक बोनसच म्हणावा लागेल.” असे विचार त्यांनी मांडले.
मिग ला ही केवळ एक खिंड नाही तर नैसर्गिक स्थितीच्या अगदी उलट मानवाने केलेली मोठी कामगिरी आहे. त्याची उंची ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा पम अधिक आहे. तर माऊंट एव्हरेस्ट कॅम्प 1 ते जवळपास 500 फूट खाली आहे. मिग ला वर उभे राहणे म्हणजे खुम्बू हिमनदीशी (Khumbu Glacier) दोन हात करणे आहे
देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण
धोरणात्मकदृष्ट्या लिकारू-मिग ला-फुक्चे रस्ता (LikaruMig LaFukche road) हा देशासाठी अत्यंत महत्त्व आहे. हा रस्ता हानले ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) फुक्चे या सीमावर्ती गावापर्यंत तिसरा अक्ष तयार करतो. सीमावर्ती भागातील मचोक, फुक्चे, दुग्ती आणि चुशुल सारख्या महत्त्वाच्या सीमावर्ती गावांना जोडण्याचे काम होत आहे.
धाडसी अभियांत्रिकीचे कौतुक
इतक्या उंचीवर रस्ता बांधण्याचे काम सोपे नक्कीच नव्हते. हिवाळ्यात मिग ला या खिंड परिसात तापमान 40° सेल्सिअस पर्यंत घसरते. त्यामुळे अशा विपरीत परिस्थितीत कर्मचारी, अभियंता यांनी मोठे साहसी काम केले आहे. कारण येथे वर्षातील केवळ सहा महिनेच काम करता येते. त्यांच्या धाडसी अभियांत्रिकीचे कौतुक होत आहे