समस्येची दारं मोकळी होतात. प्रयत्न कर – बस कभी रुकना मत’ रुक जाना नही तू कभी हार – श्रध्दा जहागिरदार
रुकना मत
एका लेखात वाचले ‘बस कभी रुकना मत’ रुक जाना नही तू कभी हार के लगेच हे वाक्य मला आठवले. या दोन्ही वाक्यात किती सकारात्मता आहे.
ते वाक्य वारंवार वाचायचे, लगेच आपण तरतरीत. आपल्या समस्या , समस्येची दारं मोकळी होतात. करत रहा, प्रयत्न कर. तेवढ्यापुरते तरी आपण लगेच उठतो, करतो ज्यात आपल्याला आवड आहे. छंद आहे तो हाती घेतो.
‘ब्राह्मण युनिटी’ join करण्याआधी मी सारखी स्व-मनाला टोकायची ‘मला का पाहिजे तो प्लॅटफॉर्म उदा. सोशल वर्क, गाण्याला वाव (जे की मी सतत रियाज करेल) कोणाच्या तरी गायनाने मी उस्फूर्त होईल.’ हे सगळं मला का मिळत नाही. मला लोकांशी बोलायला आवडते, त्यांची मैत्री करायला आवडते हे सर्व मी कुठे शोधू? पण ‘ब्राह्मण युनिटी’ ने हे प्रश्न सोडवले. मनात म्हटले ‘अंजू बघ तरी एकदा त्यात सामिल होऊन तुझे दोन्ही हेतू साध्य होतायेत. दोनच नाही तर मैत्री, गायन, सामाजिक उपक्रम हे सर्व येथे च मिळत आहे. समाजासाठी काहीतरी करेन ही सतत खुमखुमी असायची ती पण झाली तर पूर्ण होईल.
मी सामील झाले युनिटी मध्ये. प्रथम फक्त गाणी टाकत होते, त्याला चांगले झाले, छान झाले, मस्त अशा लाईक्स येऊ लागल्या. अर्थात ते मी बरेच वेळा म्हणून घासलेले असायचे.आपला येथे सुर जातोय बरका, परत ते सारखे म्हणून त्यात perfection आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सहाजिक गळा गाता रहात होता.सकाळी पहाटे उठायची सवय परत माझं मन मला म्हणतच आहे अंजू कालचे राहिलेले गाणं तयार कर. ही माझ्या बाजूने जमेची बाजू झाली. हळूहळू ग्रूप मध्ये चॅटिंग मध्ये सहभाग घेऊ लागले.मज्जा, मस्ती चालायची.सामाजिक उपक्रमात जेवढी मला माझ्या परीने मेहनत देता येईल तेवढी देते. ‘मौका मिलेगा, वहां पे चौका लागती हूं, चौका सिधा निशाने पे जाता है। लोकांशी ओळखी वाढवणे आवडते.
मी स्वत:ला कायम कशात तरी गुंतवत आहे. मी रिकामी बसलेली मला पहावत नाही. जेवढे युनिटी मध्ये उपक्रम झाले त्यात हिरीरीने भाग घेते. यामध्ये सामील होऊन स्वार्थ पहायचा नाही. निस्वार्थी सेवा द्यायची, फक्त आनंद घ्यायचा हे मनाशी पक्के केले. आत्तापर्यंत सहभागी झालेल्या उपक्रमात मला खुप काही मिळाले. घरी जाताना मनाला म्हणते ‘ये’ किती छान वाटले तुला आनंदी, प्रसन्न, समाजासाठी काहीतरी करतो ते समाधान,अनेकांशी मैत्री ह्याची जाणीव. काय पाहिजे तुला बस्स. That’s it . बस लेकीन रिको मत। करते जाओ। एका वाक्याने मला आज लिहते केले. भगवान साथ दे करती रहुंगी ओर करनेवाली हूं।
श्रध्दा जहागिरदार , 86001 19338