Classifiedगुंतवणूकजाहिरातदेश विदेशमंथन (विचार)युनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

अक्षय पुजारी – लेख क्रमांक 4 – प्रत्येक व्यक्ती करोडपती या आपल्या संकल्पनेवर आधारित ९ ते १५ ऑक्टोबर या इन्व्हेस्टमेंट वीक मधील इन्वेस्टर्स अवेअरनेस वीक मधील हा आज चा चौथा लेख

बाजारात स्विंग ट्रेड काय असतो ?

अक्षय पुजारी   लेख क्रमांक 4 – प्रत्येक व्यक्ती करोडपती या आपल्या संकल्पनेवर आधारित ९ ते १५ ऑक्टोबर या इन्व्हेस्टमेंट वीक मधील इन्वेस्टर्स अवेअरनेस वीक मधील हा आज चा चौथा लेख

आज अक्षय पुजारी  यांच्या लिखाणातून आपण हे विचारात घेणार आहोत कि बाजारात स्विंग ट्रेड काय असतो आणि त्याचा आपण कसा फायदा करून घेऊन शकतो

स्विंग ट्रेंडीग (SWING TRADING)

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की (SWING TRADING) स्विंग ट्रेडिंग काय असतं??
SWING ट्रेडिंग कसे केले जाते?
स्विंग ट्रेडिंग ही नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि यातुन कसा फायदा घेता येतो?

तर या पोस्टमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. ही माहिती 5 भागांमध्ये दिली आहे.
(5 भाग : स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग चे महत्व, स्विंग ट्रेडिंग चे फायदे आणि तोटे, स्विंग ट्रेडिंग साठी टिप्स, निष्कर्ष)

PART I
स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?
What is Swing Trading?

आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय हे माहिती आहे, आज शेअर खरेदी करायचा आणि आजच विकायचा.
तसेच आपल्याला डिलिव्हरी ट्रेडिंग किंवा लॉंग टर्म इन्वेस्टिंग म्हणजे काय हे ही माहिती आहे, आज घेतलेला शेअर दोन वर्षांनी किंवा वीस वर्षांनी विकता येतो. परंतु स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही.
स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज घेतलेला शेअर दोन दिवस, दोन आठवडे किंवा दोन/चार महिने पर्यंत ठेवणे.
स्विंग ट्रेडिंग लाच आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंगही म्हणू शकतो.

स्टॉक मार्केट मधील प्रत्येक स्टॉक हा स्विंग मध्ये ट्रेड करत असतो. उदाहरणार्थ 100 वरून 200 ला जाईल, पुन्हा 150 ला येईल आणि मग 250/300 ला जाईल.
स्विंग ट्रेडिंग म्हणजे 150 ला घेऊन 250/300 ला विकणे – थोड्या काळामध्ये – 2 ते 4 महिन्यांमध्ये.

स्विंग ट्रेडिंगही डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये येते परंतु डिलिव्हरी ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये फरक काय आहे तर डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण एखादा शेअर जास्त काळ ठेवतो – लॉंग टर्म इन्वेस्टिंग.

उदाहरणार्थ – डिलिव्हरी मध्ये शेअर एक वर्ष ते दहा वर्ष किंवा वीस वर्ष पण ठेवला जातो. पण स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण तो शेअर कमीत कमी दोन दिवस ते जास्तीत जास्त दोन/चार महिन्यांपर्यंत ठेवतो म्हणजेच जो शेअर शॉर्ट टर्म साठी घेतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात.

उदाहरण – तुम्ही एक शेअर पाचशे रुपयाला घेतला आहे आणि तुमचे टार्गेट पाच टक्के किंवा दहा टक्के आहे जेव्हा हे टार्गेट पूर्ण होईल, म्हणजेच टार्गेट हिट होईल त्यावेळेस तो शेअर विकून ट्रेड मधून बाहेर पडायचे.
तुमचे टार्गेट जर दोन दिवसात हिट झाले तरी तो शेअर तुम्ही विकू शकता, दोन आठवडे किंवा दोन महिने तुम्ही टार्गेट हिट होईपर्यंत थांबू शकता आणि ज्या वेळेस तुमचे टार्गेट पूर्ण होईल त्यावेळेस ट्रेड मधून एक्झिट करू शकता.

———-

PART II
स्विंग ट्रेडिंग चे महत्व | Importance of Swing Trading
इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग / इन्वेस्टिंग यांच्यामधील फळी किंवा सुवर्णमध्य म्हणजे स्विंग ट्रेडिंग आहे. इंट्राडे ट्रेडिंग च्या तुलनेत स्विंग ट्रेडिंग खूप सुरक्षित आहे. जेवढे दिवस आपण शेअर होल्ड करणार आहे तेवढा जास्त आपला विनिंग रेशो वाढणार आहे. कारण जेवढे जास्त दिवस आपण तो शेअर होल्ड करू तेवढे जास्त चान्स आहेत की तो शेअर प्रॉफिट मध्ये जाईल.

इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जर तो शेअर लॉस मध्ये असेल तर आपण डिप्रेशन मध्ये जातो. आपण निराश राहतो. परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये तसं होत नाही आपण घेतलेला शेअर आज जरी लॉस मध्ये असेल तरी उद्या किंवा येणाऱ्या काही काळात तो शेअर प्रॉफिट देणार असतो कारण आपण पूर्ण ऍनॅलिसिस करून तो शेअर खरेदी केलेला असतो. त्याच सोबत स्टॉप लॉसची सेफटी सुद्धा आपल्या सोबत असते, जर SL (स्टॉप लॉस) हिट झाला तर आपण लॉस बुक करून बाहेर पडतो आणि ते पैसे पुढच्या स्विंग ट्रेड मध्ये गुंतवतो.

———-

PART III

जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग चे फायदे आणि तोटे काय आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

स्विंग ट्रेडिंग चे फायदे | Benifits of Swing Trading

1. कमीत कमी रिस्क
स्विंग ट्रेडिंग चा सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे लो रिस्क किंवा कमी रिस्क आहे. कारण इंट्राडे मध्ये आपल्याला घेतलेला शेअर आजच विकावा लागतो मग तो शेअर प्रॉफिट मध्ये असो किंवा लॉस मध्ये असो. परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये जर तो शेअर लॉस मध्ये असेल तर तो शेअर काही काळ होल्ड करू शकतो. आणि जेव्हा तो शेअर प्रॉफिट मध्ये येईल तेव्हा विकू शकतो. परंतु इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण शेअर विकू शकत नाही आज घेतलेला शेअर आजच विकावा लागतो. यामुळेच ब-याच ट्रेडर्सचे मोठे नुकसान होते.
(इंट्राडे मध्ये आपण घेतलेला शेअर डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट करू शकतो परंतु त्यासाठी पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे.)

2. जास्तीत जास्त प्रॉफिट
जेव्हा एखादा शेअर डाऊन ट्रेण्ड मध्ये येतो. तेव्हा तो शेअर ठराविक लेव्हलला सपोर्ट घेऊन पुन्हा वर जातो. इथे जो शेअर वर चालला आहे तो शेअर एका दिवसात वर जात नाही. जेव्हा तो शेअर अप फ्रेंड मध्ये असेल तेव्हा आपण इन्ट्राडे पेक्षा स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकतो. जोपर्यंत तो शेअर वर चालला आहे तोपर्यंत आपण प्रॉफिट कमवू शकतो आणि जेव्हा आपले टार्गेट पुर्ण होईल तेव्हा तो शेअर आपण विकू शकतो किंवा त्या शेअर चा स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो.
[स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा यावर एक विशेष व्हिडिओ आहे, त्याची लिंक खाली देत आहे]

3. मर्जिन नाही
स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्जिन मिळत नाही. मार्जिन हे फक्त इंट्राडे मध्ये मिळते margin जर दहापट असेल तर तुम्ही एका शेअरच्या किमतीत दहा शेअर्स घेऊ शकता. परंतु जर लॉस मध्ये गेला तर तो लॉस तुम्ही घेतलेल्या दहा शेअर्स वर होतो. त्यामुळे तुमचे जास्त नुकसान होते परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये कोणत्याही प्रकारचे मार्जिन मिळत नाही.
जर आपल्याला दहा शेअर पाहिजे असतील तर त्या, दहा शेअर चे जेवढे पैसे होतील ते पूर्ण पैसे देणे भाग आहे. त्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा जास्त शेअर घेत नाही आणि त्यामुळे आपले नुकसान ही कमी होते.

स्विंग ट्रेडिंग चे तोटे | Disadvantages of Swing Trading

1. दररोज अपडेट घेणे
तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग मध्ये एखादा शेअर खरेदी केला आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागला आणि दोन तीन दिवसात त्या शेअर बद्दल अचानक एखादी नकारात्मक बातमी आली तर, तो शेअर अचानक खाली जाऊ शकतो. म्हणजे त्याची किंमत अचानक कमी होते आणि आपलं नुकसान होतं. त्यामुळे आपण घेतलेल्या शेअर बद्दल दररोज माहिती घेतली पाहिजे तो शेअर प्रॉफिट मध्ये आहे कि लोस मध्ये हे डिमॅट अकाउंट मध्ये बघितलं पाहिजे. रोज दिवसाच्या शेवटी 4/5 मिनिटे वेळ देऊन ओपन पोसिशन review करणे उत्तम.
[तरी आजकाल GTT ऑर्डर लावून ही review करण्याची ऍक्टिव्हिटी टाळू शकतो]

2. जास्त पैशांची गरज
स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्जिन मिळत नाही. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग साठी जास्त पैशांची आवश्यकता आहे. मार्जिन नसणे हा स्विंग ट्रेडिंगचा फायदा आहे तसाच काही अंशी तोटा सुद्धा आहे.

3. ओवरनाईट होल्डिंग रिस्क
स्विंग ट्रेडिंग मध्ये घेतलेला शेअर आपण एका दिवसापेक्षा जास्त वेळ ठेवू शकतो. तसंच हे आपल्यासाठी रिस्की काम आहे. कारण आपण घेतलेल्या शेअर विषयी काही निगेटिव्ह न्यूज आली तर त्यात आपले नुकसान होऊ शकते तसेच तो शेअर जर दुसऱ्या दिवशी गॅप डाउन ओपन झाला तर त्यातही आपले नुकसान होऊ शकते.

———-

SWING TRADING (स्विंग ट्रेडिंग)
PART IV
स्विंग ट्रेडिंग साठी काही टिप्स –

# स्विंग ट्रेडिंग हे नेहमी डाउन ट्रेण्ड संपल्यावर किंवा अप फ्रेंड मध्ये करावे. किंवा ज्यावेळी रिव्हर्सल स्पॉट करता येईल तेव्हा.

# स्विंग ट्रेडिंग साठी वेगळी स्ट्रॅटेजी बनवावी.
यामध्ये एन्ट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आणि टारगेट या गोष्टी आधीच ठरवून ठेवाव्यात.

# स्विंग ट्रेडिंग साठी असणारे कॅपिटल बऱ्याच भागांमध्ये divide करावे आणि diversified ट्रेडिंग करावे.
उदाहरणार्थ – पूर्ण कॅपिटल 5 लाख असेल तर ते सगळे एकाच स्टॉक मध्ये लावू नये. 5 लाखाचे प्रत्येकी 25 हजार असेल 20 भाग करावेत आणि वेगवेगळ्या 20 स्टॉक मध्ये पोसिशन घ्याव्यात.

# Stop Loss चे स्ट्रिक्टली पालन करावे, जेणेकरून होणारा लॉस लिमिट मध्ये असेल.

# योग्य अभ्यास करून, Analysis च्या बेसिस वर Target आणि StopLoss ठरवूनच एखाद्या स्टॉक मध्ये पोसिशन घ्यावी. यासाठी Technical Analysis, डिमांड सप्लाय झोन्स याचा वापर करावा.

# स्विंग ट्रेड मध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक पोसिशन घेण्याआधी रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्या फेवर मध्ये आहे का हे जरूर कन्फर्म करावे.

अक्षय पुजारी ©
Stock शास्त्र ©

SWING TRADING (स्विंग ट्रेडिंग)
PART V
निष्कर्ष
आपण या पोस्ट मध्ये स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे बघितलं आहे तसेच आपण स्विंग ट्रेडिंग चे उदाहरण समजून घेत स्विंग ट्रेडिंग विषयी सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच स्विंग ट्रेडिंगचे फायदे काय आहेत आणि याचे तोटे काय आहेत हेही आपण बघितलं आहे.
यावर तुमच्या प्रतिक्रिया, शंका, फीडबॅक आम्हाला नक्की कळवा.

अक्षय पुजारी ©
Stock शास्त्र ©

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय यावर detailed व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक –

ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा वापरायचा, calculate करायचा याची strategy –

Related Articles

One Comment

  1. अप्रतिम लेख आहे आहे संपूर्ण. लिखाण पण व्यवस्थित आणि सविस्तर. 👌🏻👌🏻👌🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}