दुर्गाशक्तीमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

माझ्या आयुष्यातल्या नवदुर्गा – पहिले दुर्गा रूप – माझी मुलं – सौ आरती अलबुर सिन्नरकर

माझ्या आयुष्यातल्या नवदुर्गा

पहिले दुर्गा रूप – माझी मुलं

प्रवास प्रगल्भतेच्या दिशेने….

जन्मानंतर आई आणि बाबा ह्यांचं बोट धरून चालायला शिकले उत्तम संस्कारांनी घडले.
शाळेमध्ये अतिशय उत्तम शिक्षक लाभले त्यामुळे समाजात वावरताना आवश्यक शिक्षण मिळालं आणि आयुष्याला योग्य दिशा मिळाली.

वयाने मोठे होताना शिक्षणं…लग्न… हे टप्पे पार करताना अथर्व आणि ओवी चा जन्म ह्याने पुन्हा एकदा लहान होऊन त्यांच्या बरोबर घडत आले…

आईपण सोप्प नसत म्हणतात पण माझ्या दोन्ही मुलांनी मला त्यांच्या बरोबरीने घडवलं. प्रगल्भ बनवलं..आजच पाहिलं दुर्गे च रूप माझी मुल…ज्यांच्यामुळे माझा प्रगल्भतेच्या दिंशेने प्रवास सुरू झाला.

अथर्व माझा मोठा लेक..ह्याचा अभ्यास , गृहपाठ …कधीही समोर बसून करून घ्यावा लागलाच नाही. धड्याच वाचन..त्या खालचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने स्वतः मेहनत घेतली…अर्थात प्रोजेक्ट मात्र आम्ही दोघांनी मिळून केले..आणि त्याची मजा पण घेतली. बरोबरीने मार्क पण मिळवले.

ओवी मात्र अगदी उलट…वाचन ज्याचा कायम कंटाळा..मुळातच इंग्रजी माध्यम…त्यामुळे मराठी काय कोणतेच वाचन आवडत नाही..आणि इतर विषय त्यांचा अवाका इतका भयंकर की खरंच सगळे विषय वाचल्याशिवाय गाडी पुढे जाणं अवघडच…
पण ओवी अतिशय कल्पक..तिच्या नवीन कल्पना कायम भन्नाट असतात.

दोन्ही मुलं म्हणजे दोन टोकं…मोठा छान अभ्यासू…अतिशय प्रामाणिक पणं अभ्यासाच्या दिशेने प्रवास…
आणि धाकटी वया प्रमाणे खट्याळ…अभ्यास करते..पण कलांमध्ये मनापासून आणि जास्त रमते.

मुलांमुळे पालकांचं प्रगल्भ होण काय असत हे मी कायम उत्तम अनुभवलं…अनुभवते आहे.

नवनवीन विषयांचं,लेखकांचं लेखन…त्याच वाचन….त्यावर सारासार विचार..त्यावर आपले विचार मांडता येणं हे मी अथर्व कडून शिकले…आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना आवश्यक अभ्यास…कष्ट घेताना लेकाला पाहून मी देखील माझ्या संगीत विषयाचा अभ्यास पुन्हा जोमाने करायला लागले. आज अथर्व त्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाताना..त्याने घेतलेली मेहनत..नवीन गोष्टींचा अभ्यास..आणि दुसऱ्या ठिकाणी अनोळखी जागी जात असताना पालक म्हणून आम्हाला विश्वास दिला. कुठेही आम्ही मागे पडलो नाही..कारण नव्या गोष्टींची माहिती देताना लेकाने कधी आमचं ज्ञान कमी पडत आहे अशी जाणीव करून दिली नाही. नवीन ठिकाणी हे नवं अस असत हे सांगताना हे तुम्हाला सहज जमेल समजेल…उमजेल..असच आहे..हा विश्वास दिला.

लेक तर पुन्हा एकदा लहान होऊन सगळं कसं मस्त आनंदाने जगायचं असत हे शिकवते आहे. तिच्या नव्या कल्पना.कलात्मकता ह्याची मला प्रचंड अपूर्वाई आहे. चित्रकला…रांगोळी… नृत्य, तायकोंदो सगळ्याचा मेळ ती उत्तम राखते, आवडीने त्याचा अभ्यास करते मला फार कौतुक वाटत..ह्या सगळ्याच. न दमता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा आनंद मनमुराद कसा घ्यायचा हे मी माझ्या लेकिकडून शिकले.

आयुष्यात आपल्याला शिकवणारे आपल्यापेक्षा वयाने मोठे ,अनुभवी असतात ..हे योग्य आहे ..पण माझ्यासाठी वयाने मोठे अथवा लहान कोणीही असो शिकताना वयापेक्षा समोरच्याच ज्ञान पणं कित्ती महत्वाचं असतं ह्याची जाणीव माझ्या मुलांकडून शिकताना मला झाली.

मोठ्यांकडून शिकतांना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि वयाने लहान असणाऱ्यांन कडून शिकताना त्यांच्या नव्याने केलेला परिपूर्ण अभ्यास दोन्हीचा समतोल राखता आला तर आपणं खऱ्या अर्थाने प्रगल्भ होत जातो असं मला मनापासून वाटत.

माझ्या आई वडीलांमुळे मी उत्तम संस्कारांनी घडले आणि त्या संस्कारांना नव्या युगाच्या गरजेप्रमाणे ..नव्या काळा प्रमाणे कसं बदलता यायला हवं हे माझ्या दोन्ही मुलांनी मला शिकवलं..

ज्यांनी मला ह्या सुंदर जगात आणल ते माझे पालक …माझे आई वडील आणि ज्यांनी मला नव्या जगाची नव्याने ओळख करून दिली त्या माझ्या दोन्ही मुलांना मी आज च हे पुष्प सन्मानाने अर्पण करते..वाहते….

माझा सुसंस्कारित.. आणि प्रगल्भतेच्या दिशेने जाणारा हा प्रवास सुकर बनवणाऱ्या माझ्या मुलांना मनापासून धन्यवाद.

देवीमाते..माझ्या मुलांच्यावर तुझी कृपादृष्टी कायम राहो हीच प्रार्थना🙏🏻

सौ आरती अलबुर सिन्नरकर , 77740 80393

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}