गुंतवणूक

ब्राह्मण युनिटी इन्व्हेस्टमेंट ग्रुप १ आणि २ या मधील काही मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे

ब्राह्मण युनिटी इन्व्हेस्टमेंट ग्रुप १ आणि २ या मधील काही मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे , हे एका प्रकारे रेप्रेसेंटेशन च आहे आपल्या सर्वांच्या मनातल्या भावनांचे आणि विचारांचं , थोड्या फार फरकाने सर्वांची मते अशीच असतील .. इथे आपल्या खूप काही शिकायला मिळाले , मिळत आहे , नवीन नवीन प्रयोग सुद्धा इथे केलेले दिसतात , स्वतःचे काही इंडिकेटर्स डेव्हलप करून त्याचा ही वापर करण्यासाठी लोकांना शेअर केले जातात , असा हा ग्रुप एकमेकांना प्रचंड सहाय्य करून हात देऊन वर आणत असतो , वाचूया , त्यातल्या काही लोकांचे मनोगत

ब्राह्मण युनिटी इन्व्हेस्टर ग्रुप 2. (बस नाम ही काफी है.) एका हलक्या नोटेवर, परंतु गंभीर बाजूने फक्त दुसरा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप नाही तर ज्ञान आणि पैशाने समृद्ध असलेल्या ग्रुपमधील सर्व ब्राह्मणांना शिक्षित करण्यासाठी एकल व्हॉट्सअॅप विश्व आहे.
आता हे सांगण्याचे कारण म्हणजे, माझा या ग्रुपमध्ये ३/४ वर्षांहून अधिक काळ आहे. मी एक आर्थिक सल्लागार आहे आणि माझे उद्दिष्ट कोणत्याही मार्गाने आणि जेथे शक्य असेल तेथे बाजाराची माहिती गोळा करणे हे आहे. हा समूह केवळ शेअर्स आणि इतर गुंतवणुकीच्या मार्गांवर शिक्षण केंद्र बनला नाही तर प्रश्न लहान किंवा मोठे असले तरी त्यांना योग्य सन्मान मिळतो आणि शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली जातात. कधीकधी मला खरोखरच भारावून जातो की या गटात इतके सखोल ज्ञान असलेले बरेच लोक आहेत की संधी मिळाल्यास ते एकट्याने संपूर्ण पीएमएस सेट करू शकतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर, हा गट नवशिक्या, हौशी, दीर्घकालीन गुंतवणूकदार, व्यापारी आणि एक व्यासपीठ आहे जिथे आपल्याला कधीही सोडले जात नाही, हा एक महासागर आहे जिथे माहिती ओतली जाते आणि माहितीची फळे अनुभवली जातात. समुदाय
वैयक्तिक लक्षात घेऊन मी तांत्रिकदृष्ट्या दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे पण गेल्या 3/4 वर्षांमध्ये बँकिंग आणि वित्त पार्श्वभूमी असूनही या गटाने अजूनही अंतर्दृष्टी ऑफर केली आहे ज्यामुळे मला अजूनही नवशिक्यासारखे वाटते.

हर्षद साने
9403704640
shrimantsane@gmail.com

===============================================

नमस्कार शेअर प्रेमी मंडळी!

“शेअर बाजारात पैसे फक्त बुडतात” असे सर्व सामान्य माणसाला नेहमीच वाटते. अश्या चुकीच्या समजुती मुळे फक्त 3-4% लोक शेअर मार्केटमध्ये येतात. ट्रेडिंग करून झटपट पैसे कमवू आणि शॉर्ट कट नी श्रीमंत होऊ असे ठरवून मार्केट मध्ये बरेच लोक येतात आणि त्यातले 90% पैसे गमावतात. हे 90% लोक शेअर मार्केट बद्दल अनेकदा गैरसमज पसरवत असतात. असो.

मी स्वतः शेअर बाजारात गेली 15 वर्षे इन्व्हेस्टमेंट करतोय. त्यातली पहिली अनेक वर्षे मी “टिप्स” ऐकून शेअर घेतले आणि नुकसान झाले. नंतर 1 – 2 जाणकार मंडळींचा मोलाचा सल्ला मिळाला आणि मग माझा खरा प्रवास सुरू झाला.
कंपनी काय करते, त्या कंपनी ची उत्पादने काय आहेत, ती कंपनी खरंच प्रॉफिट कमावते का? ह्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या तर आपण चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे पण फारच कमी लोक स्वतः अभ्यास करायला तयार असतात. मी ते करायचं ठरवलं. सुरुवातीला थोडा वेळ लागला पण नंतर हा प्रवास खूप इंटरेस्टिंग झाला आणि अचानक कोरोना मुळे मार्केट जबरदस्त पडले. हा एक वन्स इन अ लाइफ अनुभव होता.

माझा प्रवास चालू असताना आपल्याला काही जाणकार लोकांचे मार्गदर्शन मिळाले तर हा प्रवास अजून चांगल्या प्रकारे करता येईल असे वाटत होते. तेव्हा माझ्या एका मित्राने मला “ब्राम्हण युनिटी” बद्दल माहिती दिली.
हा ग्रूप जॉईन केला अणि माझा प्रवास वेगाने सुरू झाला.
आता पर्यंत माझा फक्त फंडामेंटल analysis वर विश्वास होता परंतु टेक्निकल analysis करून सुद्धा चांगले पैसे मिळतात हे ह्या ग्रुप मुळे समजले. स्टॉप लॉस लाऊन बिनधास्त ट्रेडिंग करा ह्या सल्ल्यानुसार मी थोडा टेक्निकल analysis चा पण अभ्यास सुरू केला. खरं सांगायचं तर ट्रेडिंग मध्ये फार काही यश मिळाले नाही परंतु लेवल पाहून चांगले शेअर कुठल्या किमतीला घ्यायला हवेत ह्याचा थोडा अंदाज आला आणि याचा पुढे फायदा होईल याची खात्री आहे.
आपल्या ग्रुप मध्ये सर्व प्रकारचे सदस्य आहेत. एकीकडे शेअर मार्केट चा काही अनुभव नाही असे सदस्य त्याच बरोबर 30/35 वर्षे शेअर मार्केट चा जबरदस्त अनुभव असलेले दिग्गज.
ह्या दोन्ही चा मेळ अजून चांगल्या प्रकारे कसा घालता येईल त्या बद्दल माझे काही मुद्दे :

दिग्गज मंडळी-
– नुसते टेक्निकल ग्राफ पोस्ट करण्या ऐवजी थोडी बेसिक माहिती दिली तर जास्तं लोक इंट्रेस्ट घेतील
– अनेकांना रोज मार्केट पाहायला वेळ नसतो अश्या सदस्यांसाठी 10/15 चांगले शेअर सांगितले तर हळू हळू हे शेअर घेऊन ठेवायला सोपं जाईल.
– सोप्या भाषेत काही लेक्चर घेतली तर फारच छान

बाकीचे मेंबर्स:
– स्वतः थोडं वाचन/ अभ्यास केला तर दिग्गजांच्या सल्ल्याचा खूप छान फायदा होतो
– एखाद्या शेअर मध्ये थोडे नुकसान झाले तर लगेच लोकांना मेसेज करून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, स्वतः थोडे वाचन करून शंका विचारली तर चांगले.

शेअर मार्केट म्हटले की फायदा / नुकसान हे आलेच. पण ह्या ग्रुप मुळे अनेक ओळखी झाल्या, नवी नाती जुळली, माझ्या साठी हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.

सब का साथ सब का विकास हे वाक्य इथे पर्फेक्ट लागु होते

धन्यवाद!
प्रसाद महाशब्दे ,98230 06449

======================================================

उपेंद्रजी आणि श्रीरंग, सर्वप्रथम ब्राह्मण युनिटी इन्व्हेस्टमेंट या ग्रुप मधे मला समाविष्ट केले याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏
ज्या संकल्पनेने आणि जे उद्दिष्ट समोर ठेवून हा ग्रुप सुरू केला आहे आणि कार्यरत आहे, तो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शेअर मार्केट, गुंतवणूक, टेक्निकल ॲन्यालिसीस, इंडस्ट्री संदर्भात माहिती इत्यादि विषयावर अनेक तज्ज्ञ जी माहिती देतात त्यामुळे या क्षेत्रात प्रथम पाऊल ठेवणार्‍याचा आत्मविश्वास तर बळावतोच, पण त्याबरोबर या क्षेत्राशी निगडित असणाऱ्यांचेही ज्ञानसंवर्धन होते. विचार करण्याची पद्धत ही व्यक्तिनुसार बदलते परंतु, out of the box thinking हे दुसर्‍या व्यक्तीलासुद्धा प्रेरणादायक ठरतं.
आता वैयक्तिक प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर आजतागायत मी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन उद्दिष्टानी केलेली आहे. तसेच मध्यंतरी आपल्याशी केलेल्या मेसेज/संवादाप्रमाणे सध्या Asset Allocation मधे काही सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया सुमारे दोन महिन्यात पूर्ण झाल्यावर गुंतवणूकीचा काही हिस्सा हा शेअर ट्रेडिंग-शाॅर्ट टर्म व
F&O मधे वापरणार आहे. ब्राह्मण युनिटीचे F&O चे वर्गातील मिळालेली माहिती नक्कीच कामी येणार आहे.
आपल्या सर्वांशी असाच ऋणानुबंध रहावा. धन्यवाद 🙏🙏

संजय रानडे

==================================================

ब्राह्मणांचा एक ग्रुप असावा आणि कोणालाही काही मदतीची जरुर पडली तरं, मदत पोहोचवता येईल. या उद्दात हेतू ठेवून, उपेंद्र पेंडसे, नरेंद्र मेहेंदळे आणि स्वानंद समुद्र स्वतःहून पुढे आले. एकाचे दोन, दोनाचे चार असं होतं आज आपण हजार पार केले. हा पसारा फक्त पुणे शहरापर्यंत मर्यादित न रहाता, जवळपास आता सगळ्या प्रमुख शहरांत पोहोचलो. आता पुढचा संकल्प गाव तिथे शाखा.

थोडंसं मागे वळून पहातं सिंहावलोकन केलं तर, लक्षात येईल…. एकूण झालेल्या नफ्याचा विचार केला, सगळ्यांना मिळालेल्या नफ्याचा हिशोब केला तर काही कोटीं मध्ये जाईल.

आजपर्यंत शेअर मार्केट संदर्भात मारवाडी, गुजराती समाजाचं प्रभुत्व आहेचं. तिथे community म्हणून एकत्र येतात, आणि ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बांधवांना श्रीमंत करतातं. हा चांगला गुण बघून आपणं प्रत्येक व्यक्ती करोडपती ही संकल्पना आणली, तर सध्या तरी प्रत्येक व्यक्ती लखपती इथपर्यंत आपणं आपणं पोहोचलो फक्त पाच वर्षांत (२०१७ ते २०२३).

मला आठवतंय ग्रुपची पहिली मीटिंग संतोष हॉल (सिंहगड रोड, पुणे) समोरच्या एका छोट्या शाळेच्या वर्गात झाली. तिथपासून ते आतापर्यंत अखंडपणे आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे उपेंद्र आणि नरेंद्र सतत काही ना काही नवीन शोधत असतात.

Breakfast meeting पूर्णपणे नियोजनांपासून ते training course plan करणारे. तसेच ग्रुप मध्ये असणारे financial advisers साठी पूर्ण एक दिवसाचं exhibition. करणारे उपेंद्र पेंडसे. मला शंका येते हा माणूस थकत कसा नाही. कोणताही message टाकला की त्याला reply येणारं.

इतर ग्रुप मध्ये individual analysis share करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दररोज किमान आठ दहा stocks तरी recommendations असतात. अपेक्षा आहे यामध्ये भविष्यात नक्कीचं वाढ होईल.

खरंतर या ग्रुपमध्ये different professional करणारे आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, चार्टर्ड अकाऊंट, छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, शेती व्यवसाय करणारे, भिक्षुक विविध वयोगटातील स्त्री-पुरुष असूनही सर्वच जणं एकसंघ वाटतात तसेच काटेकोरपणे नियम पाळतात. इतर ग्रुप मध्ये आढळणारे मतभेदांमुळे होणारे वाद इथे दिसतं नाही.

फक्त एक गोष्ट खेदाने नमूद करावी वाटते कोणी expert ने recommend केलेला stock मध्ये entry केली. तर इथे फार थोडे जणं करतातं. Profit मिळालं तरी acknowledge करणारे सुद्धा फारचं थोडे जणं आहेत. खरं तो जो expert analysis करतो त्यामागे बरेच efforts असणारं. आपणं तिथे appricate करुन encourage करणं अपेक्षित आहे. यापुढे आपणं सर्वजण सुधारणा निश्चितचं करु.

श्रीरंग गोरे

======================================

23 मार्च 2020 पासून शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, ब्रोकर च्या मदतीने .
सुरुवातीला शेअर्स घेणे व प्रॉफिट मिळाल्यावर लगेच विकणे एव्हडेच माहीत होते.
24000 ते 35000 प्रॉफिट बूकिंग होते.
पण लॉस 20 to 25%
व नंतर corona 40% लॉस
काही वेळा असे वाटायचे सर्व च shares विकावे व शिल्लक रक्कम बँकेत ठेवून टाकावी.
पण मास्तरांनी वारंवार सांगितले काहीही विकु नको आहे तसेच राहू दे.
नंतर विचार केला 30% कशामुळे आहे
Divident देणार्‍या 2 te 3 कंपनी मध्ये माझी 50 टक्क्यांनी किंवा त्याहून अधिक इन्व्हेस्टमेंट झाली होती व त्या कंपन्यांची शेअर्स चि किम्मत ही खूप घसरली होती. मला कोणतेही बेसिक नॉलेज नव्हते.स्वतः शेअर्स अनालिसिस करणे वैगेरे काहीच ,मी ट्रेडिंग करते ते कोणत्या प्रकाराचे हेही माहीत नव्हते.
Corona संपत आला व मिस्टरां नी मला B unity तर्फे असलेल्या FNO च्या ट्रेनिंग ची पोस्ट मिस्टरांनी पाठवली. हो मला कोर्स करायचा आहे.
कोर्स मधले सर्व काही कळले असे नाही. पन काहीच माहिती नसलेल्या मला मार्केटची भव्यता व ट्रेडिंग चे गांभीर्य लक्ष्यात आले.
त्या ट्रेनिंग पासून माझा
‘ B UNITY INVESTMENT 2 ‘ या ग्रुप वर समावेश झाला तिथे सर्वजण आपण घेतलेले ट्रेड व ग्रुप मधील एक्सपर्ट आपले टार्गेट व ट्रेड व काहीजण त्या त्या कंपनी विषयी ची माहिती ही पोस्ट केली जात होती. जेव्हा सर्वाना स्वतः विषयी ओळखीच्या पोस्ट लिहावयास उपेंद्र यांनी आव्हान केले तेव्हा एका हून एक अनुभवी एक्सपर्ट्स ग्रुप वर आहेत याची जाणीव झाली त्याच बरोबर आमच्या सारखे नवशिके ही आहेत 😄हे ही कळले.
हळू हळू ट्रेड घेताना कोणत्या गोष्टी पाळल्या जाव्यात याची कल्पना येऊ लागली.
त्यातील महत्त्वाचा शब्द म्हणजे ‘स्टॉप लॉस ‘.
याचे महत्व वेळेत कळायला हवे.यापुर्वी मी कधीच लॉस मध्ये शेअर्स विकण्याचा विचार ही करत नव्हते.10 % लॉस 30 % ते 40 % वर जाताना मी पाहिले आहे त्यापेक्षा वेळेत कमी लॉस बूक करून बाहेर पडलेले बरे.
दुसरी लक्ष्यात आलेली गोष्ट Longterm इन्व्हेस्टमेंट व फ्री अप करुन ठेवलेले शेअर्स. ग्रुप मधील सर्व investers महत्त्वाचे म्हणजे उपेंद्र सर यांच्या सर Longterm व फ्रीअप करून ठेवलेले शेअर्स याची माहिती ऐकली व Longterm इन्व्हेस्टमेंट ही कोणाही investers ची ‘लाइफ लाइन’आहे. व ती आपल्याला जवळ असणे हे अत्यंत गरजेचे आहे. तशी सुरुवात केल्यावर हेही लक्ष्यात ते इतके सोपे नाही .
मार्केट la खूप कारणे असतात करेक्शन la व नेमकी अपन Longterm साठी घेतलेली इन्व्हेस्टमेंट ही पुन्हा खालच्या दिशेने निघून जाते कंपनी चे फंडामेंटल स्ट्राँग आहे याची खात्री असेल तर ते आहेत तसे ठेवून देणे गरजेचे.
पुन्हा ग्रुप वर एक अभियान राबविले यामध्येही उपेंद्र यानी असे आव्हान केले की, सर्व मेंबर्स नी नुसते ग्रुप वर च्या पोस्ट नमस्कार वाचता स्वतः काही स्टॉक वर अभ्यास करायचा, तुम्ही तो स्टॉक का निवडला त्याचे टार्गेट काय असेल व त्यापासून फायदा होत आहे का? फायदा होत असेल तर, सर्व ग्रुप मधील मेंबर्स चाही फायदा व्हायला हवा व सर्वांची वाटचाल करोडपती होण्याकडे होऊ दे.
यानंतर मी काही स्टॉक चा अभ्यास करायला घेतला पण सुरुवाती पासून कल , इंटराडे, स्विंग ट्रेडिंग व शॉर्ट टर्म इनकम कडे कल असल्याने मी त्याच पद्धती चे anyalisis GROUP वर टाकते. ते ट्रेड मी स्वतः केलेले असतात.
एकदा ग्रुप चित्र मीटिंग झाली व त्यामध्ये प्रॉफिट चा विषय प्रॉफिट होतो पण त्यापेक्षा अधिक सध्या लॉस ही आहे
त्यावेळी मी easymytrip, या कंपनी ची काहीच किमत वाढे ना म्हणुन लॉस बूक केला व intraday करत असता ना खूप सारे शेअर्स pledge असल्याने margin भरपूर मिळत होते प्रॉफिट ही होत होता तसाच पाठोपाठ लॉस ही ही सत्र अजूनही सुरू आहे.
आता स्टोरी लॉस covering ची जून व जुलै महिन्या मध्ये मी ठरवले की त्या महिन्या मध्ये असलेला सर्व लॉस cover करायचा तसा लॉस cover झाला ही
पण पुन्हा या महिन्यात GRSE शॉर्ट केले त्याच दिवशी tya1000 कडे वाटचाल केली अंदाजे 8000rs चा प्रॉफिट हातातून गेला. फक्त मार्केट मागे येणार ते केव्हा होऊ
unstable होईल जितका मिळेल तितका प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचे यासाठी विकले.
पण एकच displine असणे महत्वाचे म्हणतात ते खरे आहे.
ती ट्रेड मध्ये आणली तर नक्की फायदा होतो.
सतत मार्गदर्शन करणार्‍या ग्रुप मधील सर्व experts चे आभार .ग्रुप मुळे खूप शिकायला मिळते, आत्मविश्वास वाढला आहे लॉस हा मला एकटीला च तर छोट्या investers पासून मोठ्या investers पर्यंत सर्वाना कोणत्या कोणत्या स्क्रिप्ट मध्ये लॉस आहे.
पण चांगल्या शिस्त बद्ध ट्रेडिंग ने हा सर्व लॉस भरून येतो हेही अनुभवले आहे. त्यावेळी फक्त स्वतः ची एक startegy स्वतः तयार करुन वापरायची .100% यश मिळतेच.ईतका आत्मविश्वास BUNITY च्या सहकार्याने आला आहे.
विशेष आभार पराग गोवईकर , श्रीरंग गोरे, विश्वास केतकर, माझ्यासारख्या असणार्‍या ग्रुप मधील समस्त महिला invester , अक्षय पुजारी अन आणखी नावासह माहीत नसले ले सर्व investers यांचे खूप खूप आभार

Anupama S. Kulkarni +91 95524 11536

======================================

======================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}