दुर्गाशक्तीमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या सहावे दुर्गा रूप – माझ्या नणंदा “माझ्या सासरच्या सख्या” -सौ आरती अलबूर – सिन्नरकर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या

सहावे दुर्गा रूप – माझ्या नणंदा

“माझ्या सासरच्या सख्या”

लग्न होऊन नव्या घरात येताना सगळ काही अनोळखी असत, सगळ्यांशी ओळखी होऊन नव्या घरात रुळताना जर आपल्याला कोणी साथ दिला तर ते घर पटकन आपलंसं होत.

मी लग्न होऊन आले तेव्हा माझी मोठी नणंद नीलिमा जिच्याशी माझा मोकळा संवाद होता. तिला मी काय म्हणून हाक मारू विचारलं तर तिने ताई म्हण म्हणून सांगितलं आणि मला पटकन कोणीतरी जवळची भेटली अस वाटल. कारण माझ्या माहेरी सगळे मला ताई म्हणणारे त्यामुळे आता मला ताई मिळाली हा आनंद खूप मोठा होता.

लग्नानंतर माझी धाकटी नणंद शिल्पा तिच्या delivery साठी म्हणून माहेरी आली होती मग काय माझी आणि तिची पण गट्टी मस्त जमली.

बघता बघता मला दोन ताई मिळाल्या. ज्यांच्याशी मी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकते अस मला लक्षात आलं.

खर तर शिल्पा ताईची delivery… तिचे डोहाळे पुरवायचे तर उलट आम्हीच ताई च्या हातचे नवनवे पदार्थ खाऊन धमाल करत होतो.

माझ्या दोन्ही (अहो )ताई शाळेमध्ये शिक्षिका, त्यामुळे विद्यार्थ्यां मध्ये रमणाऱ्या दोघी, पण ह्या शिवाय त्यांच्या कलांमध्ये पण दोघी उत्तम आहेत.
नीलिमा ताई चित्रकला विषयाची पदव्युत्तर तर शिल्पा ताई कॉम्युटर सारख्या क्लिष्ट विषयाची शिक्षिका. उत्तम शिक्षण आणि त्या शिक्षणाचा उत्तम उपयोग करणाऱ्या दोघी.

शिल्पा ताई च्या delivery च्या वेळी तर आम्ही दोघी मिळून माझा MCM चां अभ्यास करत बसायचो. संध्याकाळी मस्त फेरफटका मारायला , आणि घरी आला की काही तरी नवीन खाद्यपदार्थ करायचा अस आमचं गुळपिठ मस्त जमल होत.

तस नीलिमा ताई पुण्यात आणि शिल्पा ताई कोल्हापूर त्यामुळे राखी एकां ताई कडे आणि भाऊबीज दुसऱ्या ताई कडे अस आमचा ठरलेला कार्यक्रम होता.

आता दोन्ही ताई पुण्यात त्यामुळे आता तर आणखी मज्जा.

नीलिमा ताई खूपच समजूतदार त्यामुळे घरात कुणाशी ही बोलायचं तर नीलिमा ताई माझी ढाल. कारण शिल्पा ताई खूपच भिडस्त. पण एक मात्र आहे दोन्ही ताई जेवढ्या माझ्या जवळच्या तेवढ्याच माझ्या मुलांच्या पण जवळच्या, हक्काच्या.

आम्ही सगळेच नोकरी व्यवसाय ह्यात गुंतलेले असतो. पण एखादा कार्यक्रम आला की मग त्याची तयारी, धमाल ती एकत्रित च असते. अगदीं आत्ता मे महिन्यात माझ्या मोठ्या भाच्याच्या लग्नात आम्ही सगळ्यांनी कमाल धमाल केली.

मला आठवतय मी नोकरी सुरू केली आणि काही कामासाठी सासू बाई ना त्यांच्या माहेरी मदतीसाठी जावं लागलं…थोड थोड म्हणत बरेच दिवस लागणार होते..अश्यावेळी माझ्या लेकाला कुठे ठेवायचा सुट्टी किती घेणार तेव्हा नीलिमा ताई माझ्या पाठीशी उभी राहिली. नोकरी नक्की करायची आहे ना …मग मन घट्ट कर आणि जवळच्या पाळणाघरात ठेव ..पण मला सासूबाई काय म्हणतील ह्याची भीती तेव्हा ताई म्हणाली आत्ता ही गरज आहे त्यामुळे हा पर्याय हवाच…आई शी मी बोलते काळजी करू नकोस…मी पण थोड शांतपणे निर्णय घेऊन माझं काम सुरू ठेवू शकले.

नीलिमा आणि शिल्पा दोघी ताई खूपच भक्कम पणे माझ्या पाठीशी कायम असतात. सासरची प्रत्येक व्यक्ती , नातेवाईक कसे आहेत, कोण कुठे असतात ह्या सगळ्याची माहिती मला नीट दिल्यामुळे मला ही सगळी नाती सहज जपता आली.

खर तर सासरची नाती फार नाजूक ती सांभाळताना खूप कसरत होते अस नेहमी आईकट होते. पण काही नाजूक नाती आणि त्यातली मैत्री इतकी छान घट्ट होऊ शकते हे मी लग्नानंतर अनुभवल.

आम्हा नणंद भावजय मधला नाजूक बंध खूप घट्ट आहे तो मोकळ्या आणि स्पष्ट स्वभावामुळे.

गप्पा,दंगा, खाना, खिलाना…भटकंती…सगळ आमच्या तिघिंच्या आवडीच. त्यामुळे एकत्र आल्या वर काय करायचा हे न ठरवता ही होऊन जात.

सुट्टी ला म्हणून कधी दोघी आल्या तर सकाळी एकत्र पटापट आवरून मग गप्पा टप्पा ना भरपूर वेळ.. हें ठरलेल…कधी ही सुट्टी ल आल्या की मी कामात आणि दोघी बाहेर अस होतच नाही. आणि एकमेकींकडे गेलो तरी सगळं पटापट उरकून दंगा ..गप्पा साठी एकत्रच..

माझ्या कलागुणांना कायम प्रोत्साहन देणाऱ्या, केलेला पाठिंबा देणाऱ्या, चुकल तर प्रसंगी दटावणाऱ्या,स्पष्टपणे सांगणाऱ्या ह्या माझ्या सासरच्या घट्ट सख्या.

मी आणि माझ्या दोन्ही ताई
जन्म आमचे जरी भिन्न उदरी

दंगा, गप्पा, मस्तीची ही
आमची यारी जगात भारी

देवी माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना सासरच माझ हे नात नात असच कायम गोड आणि बळकट असुदे 🙏🏻

सौ आरती अलबूर – सिन्नरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}