नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या सातवे दुर्गा रूप – माझा मित्र परिवार “श्रीमंत नातं”—- सौ आरती अलबूर – सिन्नरकर
नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या
सातवे दुर्गा रूप – माझा मित्र परिवार
“श्रीमंत नात”
“निःशब्द भावनेला ,
खांद्यावर विश्वासाचा मैत्रीचा हात,
हळव्या मनाला ,
मैत्रीचा भावनिक आधार,
उधाण आनंदाला,
हास्याची साथ,
अशीच असावी मैत्रीची साथ”
मैत्री एक अतिशय निखळ भावना,प्रत्येक गोष्टीला आकार देता येतो आणि चौकटीत बसवता येते. मात्र मैत्री ही स्वच्छंदी असते, त्यामुळे त्याला कधीच आकार नसतो आणि शेवटही नसतो.
आयुष्यात सच्चे मित्र मिळण भाग्यच.आपल्याला खऱ्या अर्थाने जिथे निवडीच स्वातंत्र्य असत ती मैत्री.
मला आठवतय माझ्या बालपणी सातारारोड ला माझ्या साधारण चौथी पर्यंत स्वरुपा ,बंटी ( अश्विनी), वीणा, राहुल, आणि प्रदीप आमची प्रचंड घट्ट मैत्री..अगदी मी अभ्यास केला नाही तर माझी तक्रार करायला राहुल माझ्या घरी हमखास येणार, आणि तो येऊ नये म्हणून मी धमकी देणारच..त्याचा उपयोग कधी झाला नाही पण माझा अभ्यासाचा stamina मात्र नक्की वाढला.
सातारारोड नंतर पाचवीत मी सांगलीला आले, इथे मला कॉलनी मध्ये विज्ञानी फाळके, निमिष, यांच्यासारखे भरपूर खेळणारे,शाखा,संस्कार वर्ग,लपंडाव,डब्बा ऐसपैस इतकाच नव्हे तर भातुकली खेळणारे मित्र मैत्रीण मिळाले. सुट्टी तर आमची हक्काची हे सगळ मनसोक्त आनंद घेण्याची. तर शाळेत सारिका खवाटे, रुक्साना सारख्या खूप प्रेमळ मैत्रिणी भेटल्या.
सहावी मध्ये पुन्हा एकदा नवीन शहर… अहमदनगर..पुन्हा नवीन मित्र परिवार …मला चांगले मित्र मैत्रीण मिळतील ना ही भीती मात्र ह्यावेळी मला वाटत होती.
पण शाळेपासून अगदी आत्तापर्यंत माझा नगरचा सगळं मित्र परिवार माझ्याबरोबर आहे. माझं गाणं म्हटलं की ज्याला कायम अरे का …अस वाटायचं तो माझा पक्का मित्र राहुल..लांब लचक वेणी घालणारी माझी मैत्रीण संध्या, आणि माझी बेंच पार्टनर सीमा.,तृप्ती..आमची मैत्री फक्त शाळे पुरती नव्हती तर ह्या घरा मध्ये आमचा मुक्त वावर होता.
इयत्ता बदलत होत्या…तसे नवीन मित्र मैत्रिणी पण होत गेले. कधी गाण्यामुळे, कधी खेळामुळे ,तर कधी क्लास मुळे…पण मित्र परिवार वाढत होता.
अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यावर पुन्हा नव्या ओळखी झाल्या. चिरंजीत, समीर , शेखर,रवी …खर तर हे सगळे आम्हाला सीनिअर आणि त्यात रवी म्हणजे संध्या चा सख्खा भाऊ..त्यामुळं ह्या सगळ्यांची अमच्यवर बारीक नजर…पण अभ्यासात मदत ही होतीच .एक मात्र नक्की आमच्या आजूबाजूला कायम सुरक्षित वातावरण असायचं ही जमेची बाजू.
बीकॉम करत असताना मला अजून भरपूर
मैत्रिणी भेटल्या सारिका, सोनाली ,शीला.. मित्रांमध्ये अमृत आणि संतोष,विजू, सतीश..ही मंडळी मित्र परिवारात सामील झाली. ह्यातल्या प्रत्येकाने मला आयुष्यात अतिशय खडतर प्रवासात साथ दिला आणि अजूनही माझ्या आनंद दुःख सगळ्यात माझ्या बरोबर उभे असतात.
खर तर प्रत्येकाचं नाव घेणं कठीणच इतका मोठा आणि गोड मित्र परिवार मला लाभला . कदाचित कुणाचं नाव राहील तरी मला खात्री आहे ते रागावणार नाहीत…कारण ही मैत्री नावाची भुकेली नाही…
सारिका आणि अमृत ह्या दोघांनी मला आयुष्यात..खचलेल्या प्रत्येक क्षणातून हात धरून बाहेर काढलं आणि मानसिक रित्या भक्कम बनवलं. माझ्या अडचणीत कधीही स्वतःची
अडचण न सांगता माझ्या पाठीशी हे दोघे भक्कम उभे राहिले.
माझ्या लग्नात अगदी सख्य्या
भावंडं सारखं अखंड मदतीला उभे राहिले.आज त्या दोघांच्या परिवाराशी पण त्यामुळेच एक गोड नात टिकून आहे.
गाण्याच्या माझ्या आवडीमुळे माझा हा परीवरही खूप मोठा. रुपाली ताई, अरविंद , राम, सचिन दादा, अश्विनी ,पल्लवी,पांचाळ काका,मिलिंद, रमा, हिमानी,स्वराली,सीमा ताई ही सगळी माझी गुरू बंधू भगिनी.
तर संगीत ह्या एका आवडीने जोडले गेलेले अनेक धागे…अभय, आर्या,अश्विनी,प्रीती,नवीन,सदा,विभा, योगिता….अनुजा…अशी अनेक अनेक संगीत प्रेमी मित्र मंडळी सांगीतिक परिवारात येत गेली. आज माझा सांगीतिक परिवार खूप खूप मोठा आहे. आणि त्यामुळे मी माझा संगीत ठेवा आनंदाने सांभाळू शकते.
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ही मला खूप छान मित्र परिवार मिळाला. शेटे मॅडम, स्नेहल, चारुता,स्मिता,रंजना,अश्या कितीतरी जणांनी माझ आयुष्य आनंदानी भरून टाकलं.
शिवतांडव शिकताना भेटलेल्या माझ्या सख्या मीनल ताई, कविता ताई, अर्चना, अपर्णा ह्यांनी तर छोट्याश्या कालावधी मध्ये पण इतकं भरभरून प्रेम दिलं की त्या एका वर्गा नंतर आजही आम्ही जोडल्या गेल्या आहोत.
खरंच मैत्री म्हटलं की किती तरी मित्र मैत्रणी आपल्या आयुष्यात आहेत आणि ते किती महत्वपूर्ण आहेत ह्याची कल्पना पण करता
येणार नाही. कारण मैत्रीचे हक्कच असे आहेत..जिथे कुठे व्यवहार आडवा येत नाही…हक्काने एखदी गोष्ट सांगितली आणि मागितली जाते इथे कोणताच संकोच… आड पडदा मध्ये येत नाही.
आज हे लिहिताना मला खऱ्या अर्थाने लक्षात आल माझा मित्र परिवार कित्ती मोठा आहे …प्रत्येकाशी माझं नात तेवढच घट्ट आणि अजूनही तितकच हक्काने टिकून आहे.
ह्याशिवाय माझ्या मुलांमुळे मला मिळालेला मित्र परिवार तो वेगळाच…माझ्या श्री सुक्त सख्या त्याही वेगळ्या…
खरंच जगातली सगळ्यात श्रीमंत कोण अस मला जर विचारलं तर नक्कीच ती मी…आणि मीच
इतका मोठा मित्र परिवार असणारी…कधीही हाक मारली तर माझ्यासाठी धावून येणारी ही माझी मित्र मंडळी. ह्यांनी कधी मी काही करेन ह्याची वाट पाहिली नाही की तशी अपेक्षा पण दाखवली नाही. उलट माझी हाक आणि धावत माझी मित्र मंडळी येतात ह्या पेक्षा आयुष्यात मोठ धन कोणत असेल??
“मोठ्या धनाचे धनी असतील जरी अंबानी,टाटा बिर्ला…
पण आज हे वाचून आईकून वाटेल त्यांना ही माझा हेवा..😃
क्षणभरासाठी का होईना वाटेल त्यांना ही हवा असा मित्र परिवार मोठा,💃
नसेल कधी जरी पैसा अडका
मिरवू ह्या ( मैत्रीच्या) श्रीमंतीचा ही तोरा
मिरवू ह्या श्रीमंतीचा तोरा💃💃
मैत्री च्या धाग्यात घट्ट गुंफलेल्या माझ्या सगळ्या मित्र परिवाराला ही श्रीमंती कायम लाभो हीच देवी माते चरणी प्रार्थना 🙏🏻
सौ आरती अलबूर – सिन्नरकर