नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या विजयादशमी – आनंदोत्सव “आनंद क्षण वेचताना” – सौ आरती अलबूर – सिन्नरकर
नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या
विजयादशमी – आनंदोत्सव
“आनंद क्षण वेचताना”
हिंदूंचा एक प्रमुख सण विजयादशमी अर्थात दसरा. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. दशमीला महिषासुराचा वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे.
आजचा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा.माझ्या आयुष्यात,माझ्या यशात ज्या सर्वांच मोलाचं मार्गदर्शन लाभल त्या सर्वान प्रती घटस्थापना ते नवमी लिहून कृतज्ञता व्यक्त करण्याचा माझा छोटासा प्रयत्न. Unity Expression ने माझ्या या प्रयत्नात मला मोलाची साथ दिली ध्यानी मनी नसताना अचानक…एक मोठं व्यासपीठ मिळावं तो आनंद मला मिळाला. आनंदोत्सवाची हीच सुरुवात.
आजपर्यंत आई वडिलांनी माझ्या कलागुणांना उत्तम वाव दिला ,त्याच शिक्षण दिलं म्हणून विशारद पर्यंतचा टप्पा मी पार करू शकले. माझ्या ह्या सांगीतिक प्रवासात माझे संगीत गुरू, माझे आई वडील , माझ्या बहिणी, मित्र परिवार, माझं सासर ,माझी मुलं…सगळ्यात महत्वाचं माझे पती सगळ्यांनीच खूप भक्कम साथ दिला. इतकाच काय नोकरीच्या ठिकाणी देखील माझी कला माझ्या सहकाऱ्यांच्या साथीमुळे कायम नवे प्रयोग करत गेली. माझ्या गुरू भगिनी ,गुरू बंधू ह्यांच्या मुळे संगीत शिकताना नव्या प्रयोगांना कायम उत्साही प्रोत्साहन मिळालं.
व्यवहारीक शिक्षण आणि संगीत ह्यामध्ये काय आवडत अस विचारलं तर संगीतच अस उत्तर नक्की असेल…व्यावहारिक शिक्षणाने मला व्यवहारात मोठ नक्कीच केलं…पण संगीत माझा श्वास आहे.जे मला जगवत…उत्साह देतं..आनंद देत.
ह्या क्षेत्रात काम करत असताना आनंदाचे जे क्षण मी वेचले त्याची तुलना कशाशी करूच शकत नाही. मिळालेलं प्रत्येक बक्षीस, पुरस्कार जेव्हा हातात घेत होते तेव्हा फक्त आणि फक्त मला भरभरुन ज्ञान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती विषयी पुन्हा तोच विश्वास दुप्पटीने वाढत होता. कारण माझा अभ्यास आणि मला लाभणार मार्गदर्शन हे त्याच फलित.
कॉलेज मध्ये असताना हिंदी चित्रपट सृष्टीतले नामवंत कलाकार आणि मेलडी मेकर्स चां ऑर्केस्ट्रा ह्यात मिळालेली संधी …जी सुधाकर निसळ काकांनी विश्वास दाखवला… हीच ती पहिली भल्यामोठ्या प्रेक्षक समुदायासमोर गायची मोठी संधी.
संगीत गुरूंच्या मार्गदर्शनामुळे सांगली आकाशवाणी , आणि अहमदनगर आकाशवाणी चां अनुभव. आईच्या आग्रहामुळे मुंबई दूरदर्शन वर ताक धिना धिन मध्ये घेतलेला भाग आणि मिळालेलं यश, कॅमेरा sound हे आईकलेले पाहिले क्षण…तो अनुभव…बहिणी मुळे सहकुटुंब व्हील स्मार्ट श्रीमती चा सहभाग आणि गाण्यासाठी अनु कपूर सारख्या मोठ्या निवेदका ने दिलेली शाब्बासकी. झिंगाट मधला झिंगाट अनुभव…हे क्षण आपला आत्मविश्वास वाढवतात अस मला मनापासून वाटत.
माझ्या गुरूंनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे अनेक संगीत पुरस्कार मिळाले …ह्यात पुरस्कार मला मिळाला तरी गुरूंचा विश्वास त्याच हे यश. घरात माझा प्रत्येक पुरस्काराची रचना ,ते नेटक लावून ठेवण जेव्हा माझी मुलं आनंदाने करत असतात तो आनंद खूप मोलाचा..त्यात माझ्या मुलांना माझ्या विषयी असणारा अभिमान प्रेम मला दिसत.
सिंगापूर मलेशिया सारख्या ठिकाणी कला सादर करायला संधी लाभण माझे पती नितीन ह्यांच्या पाठिंब्यामुळ मला जमल…तिकडे मिळालेल यश हा माझ्या नवऱ्याचा माझ्यावरचा विश्वास आणि घरच्या आघाडीवर दिलेली भक्कम साथ.
लिखाण माझा पिंड नाही…कुणी लिही म्हटल तर जमत पण नाही…मनात आहे ते कागदावर ..अस काहीतरी माझ असत..पण त्या लिखाणाची माझी प्रेरणा माझी धाकटी बहीण रूपा आणि माझा लेक अर्थव. आणि ह्याला खत पाणी घातलं उपेंद्र पेंडसे ह्यांनी. त्यांनी लिही म्हणून विश्वासाने सांगितल आणि कोरोना काळात खऱ्याअर्थाने बाप्पाला शरण जाऊनच पहिली लेखमाला मी पूर्ण करून शकले.
त्यानंतर संगीत ग्रुप मध्ये कधी माझ्या सहकलाकाराची ओळख लिही…निवेदन लिही ह्यासाठी मला माझा मित्र स्वानंद ह्याने भाग पाडलं…कोणीतरी निमित्त ठरत …माझ्यावर विश्वास ठेवत ह्यावर मी माझी कला वृद्धिंगत करत आले…माझी कला फुलत गेली ..बहरत गेली.
यशात अनेक वाटेकरी आहेत..आता माझा संगीत प्रवास ,लेखन प्रवास सुरू आहे ती माझ्या लेकीच्या पाठिंब्यावर…कार्यक्रमाला कायम समोर असणारी माझी कन्या जणू माझी आई..माझ्या चुका परखडपणे सांगणारी..आणि आई हे भारी केलंस ग म्हणून शाब्बासकी देणारी पण तीच.
म्हणूनच आजच हे सिमोलंघन माझ्यासाठी खूप खास. सगळे आनंदक्षण वेचत, साठवत …त्याची सुरेख माळ मी आज गुंफली आहे आणि तेच तोरण आज माझ्या घराला मी बांधल आहे.
“खास आजची विजया दशमी
खास आजचे सिमोलंघन
वेचून सारे आनंद क्षण
त्याचे बांधले तोरण
आज माझ्या दारी
आज माझ्या दारी ”
सौ आरती अलबूर – सिन्नरकर