आगामी सूचनाजाहिरातप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

केसरिया गान समुहाचे मुड्स ॲन्ड कलर्स — Team Kesariya

 

।।श्री परशुराम सुप्रसन्न।।

स.न.वि.वि. आमचे येथे श्री. परशुराम व ब्राह्मण एकता कृपेकरुन

चि. मुड्स ॲन्ड कलर्स
केसरिया गान समुहाचे
अपत्य

यांचा मधुर संबंध

चि. सारेगम परिवार
ब्राम्हण एकता समुहाचे
अपत्य

यांचे सोबत करण्याचे दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ०५.३० वाजता करण्याचे योजले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यास श्री परशुराम समर्थ आहेच परंतू आपण सर्वांनी आपल्या परिवार, मित्रमैत्रिणींबरोबर या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती. सोहळ्यादरम्यान आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील व आपल्या सर्वांना सुरेल संगिताची मेजवानी मिळेलच त्यासोबतच कार्यक्रमानंतर आपल्यासोबत अल्पोपाहार करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभू देत ही मनिषा.

येताय ना मग…..
दिवस राखीव करा तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत

सोहळास्थळ: न्यु इंग्लिश स्कूलचे गणेश सभागृह, टिळक रोड, पुणे.

आपले स्वागतोत्सुक

सौ. अचला दिक्षित
सौ. सारिका जोशी
सौ. माधवी भिसे
सौ. प्रिती करंदीकर
सौ. योगिता गुर्जर
श्री. सुधीर भिसे
श्री. शेखर जोशी
श्री. संतोष देशपांडे
श्री. अरविंद फाटक
श्री. सोमनाथ केसकर
श्री. अनिकेत कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}