जाहिरातप्रोजेक्टस्मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

टीम आर्ट अटॅक — राजेश सहस्रबुद्धे

टीम आर्ट अटॅक

किती आणि कस लिहू ह्या एक नंबर टीम बद्दल असा प्रश्न पडलाय मला.
आपल्या सारेगम ग्रुप मधून हौशी कलाकारांच्या 9 टीम तयार केल्या गेल्या आणि बघता बघता पूर्ण वर्षाच एंटरटेनमेंटच कॅलेंडर फुल झाल.
आमच्या टीम ची पहिली मीटिंग 25 dec 2022 ला माझ्या घरी झाली, आमची मेंटर होती कल्पना नारायण.
त्यानंतर आठवडाभर आमच्या टीमच्या ग्रुप वर चर्चा रंगली टीमच्या बारशाची, आणि अनेक पर्यायांमधून नाव ठेवलं गेलं Team Art-Attack.
त्यानंतर मात्र वेगवेगळ्या टीम चे प्रोग्रॅम यशस्वी होत गेले आणि आमच्या ग्रुपला गळती लागत गेली, आमची मेंटर आधी तिच्या वैयक्तिक कारणांमुळे ग्रुप सोडून गेली, मग कामाच्या व्यापामुळे जमणार नाही म्हणून भूषण आणि अविनाश यांनी ग्रुप सोडला, राहिलो फक्त मी, मैय्या,अमृता,मिलिंद,अमित आणि डॉ किशोर, आणि मला गाण्याच शून्य ज्ञान असून सुद्धा मैय्याच्या पुढाकाराने mentor ची माळ माझ्या गळ्यात पडली.
पहिल्या मीटिंग मध्येच ठरलं होत आपल्याला काही तरी हटके करायचं आहे आणि शोलेच्या थीमवरच काही तरी करायच हे नक्की होत.
ह्या व्यतिरिक्त काहीही ठरलेल न्हवत, प्रॅक्टिस सुरू झाल्या न्हवत्या, गाणी फायनल नाही कारण आम्हाला गाणारे कलाकारच कमी होते.
मग आम्ही गौरी, मंदार आणि वृषाली ह्या तिघांना घेतल पैकी वृषालीनी पण दोन प्रॅक्टिस नंतर बॉम्ब टाकला की मला जमणार नाही.

मी तर म्हणायचो पण की तुमचा mentor पांढऱ्या पायांचा आहे म्हणून😊.
शेवटी हो नाही करता गाणी फायनल झाली,मग त्या गाण्यांना साजेस निवेदन लिहिल मी आणि अस करत हळू हळू गाण्याची प्रॅक्टिस आणि स्किट आकार घेऊ लागल.
बाळडॉक ला म्हणल तू आणि मी मिळून गाण्याच निवेदन करणार आहोत आणि मध्ये अध्ये थोडीशी धमाल करायची स्टेज वर, तो आधी नाही म्हणत होता पण शेवटी तयार झाला.
हार्डली आम्ही 1 ते 1/2 महिन्यात सगळी तयारी केली पण पुन्हा शेवटी एक अडथळा आला मी चिकून गुनिया/ डेंग्यू ने पूर्ण आजारी पडलो, गाण तर लांब मला उठून चालता पण येत न्हवत, आणि कार्यक्रमाला तर 15 दिवसांपेक्षा कमी वेळ राहिला होता.
डॉक्टर किशोरनी ह्यात जी मदत केली ती आयुष्यभर नाही विसरू शकत, हा हिरो सगळी औषद आणि सलाईन लावायच घरी घेऊन आला, 8 तास माझ्या जवळ बसून होता….. कोण करत आजकाल एवढ?

टीम मधला प्रत्येक मेम्बर काळजी मुळे रोज फोन आणि msg वर तब्येतीची update घेत होते, आजारपण सुद्धा एवढ सुखावह असू शकत हे मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवल आणि ते सुद्धा ब्राह्मण यूनितीमुळेच, हे मला आवर्जून सांगावस वाटत. माझं शेवट पर्यंत टीमला एकच सांगण होत काहीही झालं तरी प्रोग्रॅम होणारच आणि आपण तो हिट करणारच, डॉक्टरला सांगून ठेवल होत मला नाहीच जमलं तर मी स्टेज वर गब्बर जसा बाजेवर झोपला होता तस झोपतो तू मला सलाईन लाव आणि तसा आपण पूर्ण शो करू.

महाराज कृपेने, डॉक्टरच्या प्रयत्नाने तशी वेळ आली नाही, आमची निवेदनाची प्रॅक्टिस तर शून्य होती जी काही केली ती डायरेक्ट स्टेजवरच तुमच्या सर्वांच्या समोर, जशा तुम्हा मायबाप प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या येऊ लागल्या त्या मुळे आजारपण कुठल्या कुठे पळून गेल, सगळया टीमनी अतिशय उच्च कोटीचा कार्यक्रम सादर केला आणि तुम्ही सर्वांनी तो मनापासून उचलून धरलात त्यामुळे तुमचे मनःपूर्वक आभार.

 

 

 

 

अंकुश राजूरकर ह्याला धन्यवाद म्हणल्याशिवाय आर्ट अटॅकचा हा लेख संपूच शकत नाही, त्यानी बिचार्यांनी शेवट पर्यंत त्याला जे बदल सांगू ते करत गेला, त्याच्या क्रिएटिव्हिटी ला सलाम.

राजेश सहस्रबुद्धे

ब्राह्मण यूनिटी जिंदाबाद
जय परशुराम🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}