कालौघात झालेले बदल…. ६ टेलिग्राफ मोहन वराडपांडे
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल…. ६
टेलिग्राफ
विज्ञान तंत्रज्ञानाचे क्षेत्रात, विद्युत गतीने झालेल्या प्रगतीने बर्याच जुन्या गोष्टी काळाच्या ओघात इतिहास जमा झाल्या ..
पोस्ट अँन्ड टेलिग्राफ आॅफीस, या केन्द्र शासनाच्या अधिकृत कार्यालयातील, टेलिग्राफ आॅफिस, कालबाह्य ठरल्याने कायम स्वरुपी बंद झाले…
वायरलेस फोन्स्, म्हणजे मोबाईल सेवा सुरु होण्यापूर्वी, लॅन्डलाईन्स् देखील पुरेसे नव्हते .. सहज उपलब्ध नव्हते .. चार ते पांच वर्षांची वेटिंग लिस्ट राहत असे.. मग काही अर्जंट मेसेज बाहेर गावी वास्तव्यास असलेल्या जिवलगांना द्यायचा असेल, तर कसां द्यायचा? त्यासाठी तार म्हणजेच टेलिग्राफ आॅफीस, (पोस्ट आॅफीसचाच एक भाग) अस्तित्वात होतं..
त्या तार आॅफीस मध्ये जाऊन एक फाॅर्म भरायचा.. त्यात तार स्विकारणारा आणि पाठवणार्याचा पत्ता आणि मध्ये तारेचा मजकूर भरावा लागे..
तो मजकूर इंग्रजी कॅपिटल लेटर मध्येच भरायचा.. आणि तो ही अगदी कमीत कमी शब्दांत .. कारण पैशाची आकारणी ही शब्दांच्या संख्येवर राहत असे.. कमीत कमी पैसे लागावे, म्हणून कमीत कमी शब्द ..
त्या तार मास्तर कडे एक साधे वाटणारे यंत्र असायचे.. त्याला जोडून एक खूंटी.. त्याला लाकडी मुठ .. मग तो तार मास्तर ती एकच खुंटी वेगवेगळ्या पद्धतीने दाबायचा.. एकदा दाबली की आपोआप स्प्रिंग मुळे वर उचलल्या जात असे.. त्यातून “कट्ट कडकट्ट .. कट्ट कडकडकट्ट ” असा काहीसा आवाज येई.. त्या प्रमाणे त्या संबंधित गावातील तार आॅफीस मधील प्रिंटरवर शब्द आपोआप टाईप होत.. आम्हाला तर ती जादूची वाटायची..
मग त्या गावातील पोस्ट मन ती प्रिंट झालेली तार, संबंधितांचे घरी पोहचवी .. आपला निरोप शक्य तो त्याच दिवशी त्याला मिळे.. ही त्या काळातील आधुनिक फास्टेस्ट सेवा होती..
यात मग कालांतराने लोकं वारंवार सामान्यतः ज्या सारख्या मजकूरच्या तार पाठवित, त्याला तार आॅफीस ने कोड नंबर ठरविले.. एकूण वीस एक असावेत..
उदाहरणार्थ, लग्नाच्या शुभेच्छांचा निवडक शब्दांचा मेसेज ला ११ नंबर .. कोणाचे निधन झाले असल्यास शोक संवेदनांचा मेसेज १५ नंबर .. जन्मदिनाच्या शुभेच्छा असल्यास १३ नंबर.. याप्रमाणे .. त्याचा बोर्डच टांगला असे तार आॅफिस मध्ये ..
त्यामुळे तार पाठवतांना शब्दांची जुळवाजुळव .. त्याचे स्पेलिंग.. यातून सुटका झाली.. तो विशिष्ट कोड नंबर लिहिला की झालं.. त्याची विशिष्ट रक्कम ही ठरलेली असायची..
यात ही मग विनोद निर्मिती व्हायला लागली.. वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे ती लोकांपर्यंत पोहचू लागली.. उदाहरणार्थ, कोणी जन्मदिनाच्या शुभेच्छा पाठवल्या, तर त्याने लिहिलेला कोड नंबर चुकल्या मुळे, किंवा तार मास्तर ने चुकीचा वाचल्याने संबंधित माणसाकडे “मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो” अशी तार पोहचायची.. किंवा लग्नाच्या शुभेच्छां ऐवजी जन्मदिनाच्या शुभेच्छा पोहचायच्या.. किंवा शोक संवेदना जाण्याऐवजी “हॅपी बर्थ डे” ची तार पोहचायची.. अशा बातम्या वाचायला खूप मजा यायची…
इतकी तत्पर सेवा मोबाईल मुळे कालबाह्य ठरली.. आणि शेवटच्या घटका मोजून तिने या जगाचा निरोप घेतला…
आपल्या पिढीला याचा अनुभव आहे.. पण नवीन पिढीला कसे कळणार?
होय ना?
मोहन वराडपांडे
9422865897
Shared by Shishir Lokhande 90281 11422
Waa खूप उपयुक्त माहिती. थँक्स फॉर शेअरिंग.