कालौघात झालेले बदल….७ प्रिंटींग टेक्नॉलॉजी मोहन वराडपांडे
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल….७
प्रिंटींग टेक्नॉलॉजी
प्रिंटींग टेक्नॉलॉजी, हे असं क्षेत्र आहे, ज्यात आमूलाग्र बदल.. टोटल रिव्हाॅल्यूशन.. झालेलं आहे.. आता कोणत्याही साहित्याची छपाई अगदी सुटसुटीत आणि सोपी झाली आहे.. तुमच्या घरी कलर प्रिंटर असेल, तर कोणतेही हॅन्ड बिल, अगदी लग्न पत्रिकाही तुम्ही घरीच छापू शकता..
पण तंत्रज्ञानाने ही प्रगती करण्यापूर्वी म्हणजे १९६० -७० मध्ये कशी होती छपाई यंत्रणा?
सर्व अक्षरांचे उलटे खिळे होते.. रबर स्टॅम्पवर उलटी अक्षरे असतात, तसे.. वेगवेगळ्या आकाराचे .. कथिलापासून तयार केलेले… मॅटर कंपोज करणारा कर्मचारी, छपाई करावयाचे मॅटर प्रमाणे एक एक उलट्या अक्षराचा खिळा, साच्याच्या स्लाॅट मध्ये घालत असे.. दोन शब्दांचे मधील स्पेस साठी एक प्लेन खिळा असे.. मग त्या मॅटर ला शाई लाऊन कोर्या कागदावर त्याचा प्रिंट आऊट घेत असे.. जसे आपण रबर स्टॅम्प कागदावर उमटवितो तसे..
मग तो कागद प्रूफ रिडर कडे जाई.. प्रूफ रिडर काळजीपूर्वक तपासून कोठे “ध” चा “मा” झालायं का ते पाही.. पुन्हा त्या प्रमाणे, जे अक्षर दुरुस्त करायचे आहे, तिथपर्यंत चे सगळे खिळे स्लाॅट मधून काढून, योग्य अक्षराचा खिळा लाऊन, पूर्वी काढलेले खिळे पुन्हा लावीत असे.. त्यानंतर ह्या प्लेटस् प्रिंटींग मशिनवर चढविल्या जाई.. मग सुरु धाडधाड प्रिंटींग .. ती प्लेट खालच्या कागदावर येऊन प्रिंट करी.. वर उचलल्या गेली, की खालचा छापलेला कागद बाजूला होऊन, नविन कोरा कागद वर येई.
हे उलटे खिळे जाणिव पुर्वक कथिलाचे असत… लोखंडी असले तर कागदच फाटायचा.. त्यामुळे या अक्षरांची कालांतराने झिज होई.. मग ते अक्षर “व” आहे की “ब” हेच कळत नसे .. मधल्या गोलात पूर्ण काळा रंग भरल्या जाई.. मग त्या खिळ्यांना निवृत्ती देऊन नवा संच वापरला जाई ..
खूप नव्हे, तर प्रचंड मेहनतीचे, जिकरीचे आणि तेव्हढेच वेळखाऊ काम होते तेव्हा ते.. खास करुन छपाईच्या चुका दुरूस्त करण्याचे काम..
आता तर काय.. संगणकावर टाईप करायचे.. जिथे दुरूस्ती आहे, तिथे कर्सर नेला की ते अक्षर क्षणात दुरूस्त होते.. मग डायरेक्ट “प्रिंट” म्हटलं की छपाई सुरु… टाईप झालेल्या मॅटरचे मधोमध कोणाचा फोटो टाकायचा असेल, तर तिथे तेव्हढी जागा क्रियेट केली की, मॅटर स्वतः हून सरकून स्वतः ला उर्वरित जागेत अॅडजेस्ट करुन घेतं बिचारं ..
आणि आता संगणकावरील भाषा समजून तसेच छापणारे प्रिंटरर्स् आहेत.. साचे तयार करायचे कामच नाही.. कंपोजरचं तर अजिबातच नाही.. प्रूफ रिडिंग संगणकावरच..
हा शोध.. ही सुधारणा .. म्हणजे प्रिटिंग टेक्नॉलॉजी मधील आमूलाग्र क्रांतीच होय..
पूर्वी किती कटकटीचं होतं हे काम.. आपण कल्पना पण करु शकत नाही.
पण या नवीन शोधामुळे एक असा व्यवसाय … ज्याचा प्रिंटींग टेक्नॉलॉजी चा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता .. बादरायण संबंध नव्हता.. असा व्यवसाय देशोधडीला लागला.. पूर्ण उध्वस्त झाला…
कोणता होता तो व्यवसाय?
ते आपण उद्या पाहू या..
होय ना?
मोहन वराडपांडे
9422865897.