देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कालौघात झालेले बदल…. १२(अंतिम) पेजर – मोहन वराडपांडे

©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————

कालौघात झालेले बदल…. १२(अंतिम)

पेजर

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती आपण अनुभवतो आहोत.. अगदी काल परवा लागलेला शोध आज कालबाह्य ठरत आहे..

साधं टीव्ही चं उदाहरण घ्या नं… आधी भले मोठे असायचे टीव्ही .. त्याची पिक्चर ट्यूबच मोठ्ठी असायची… तेव्हा सायन्स् मॅगेझिन् मध्ये यायचं.. येणारा टिव्ही अगदी पातळ .. आपण भिंतीवर कॅलेन्डर सारखा लाऊ शकू असा राहिल.. तेव्हा वाटायचं .. कसं शक्य आहे हे?
पण झालच ना शक्य? आलेत ना तसे टीव्ही?

अशी वेगवान आहे ही प्रगती, की कालचा शोध आज कालबाह्य ठरतो.. खरयं ना?

तसच मोबाईल वापरात येण्यापूर्वी आणि फक्त लॅन्डलाईन अस्तित्वात असतांना घराबाहेर असणाऱ्या सदस्याला संदेश कसा द्यायचा? तर या संदेशवहना करीता एका नवीन यंत्राचा आविष्कार झाला होता.. त्याचे नाव होते पेजर…. आठवतयं कां कोणाला?

माचिसच्या डब्बीपेक्षा थोडं मोठं… त्यावर डिजिटल मेसेज मिळण्याची सुविधा.. ज्याच्या जवळ पेजर.. तो मोठ्या ऐटीत वापरायचा.. अगदी शर्ट ईन् करुन.. फुलपॅन्टला चांबडी पट्टा .. त्यात अडकवेला तो पेजर.. तो वापरणारा एकदम आधुनिक ऐटबाज वाटायचा आपल्याला…

त्या पेजर वर मेसेज आला की, तो वापरणारा इसम मोठ्या थाटात पेजर काढून मेसेज वाचायचा.. आपण कित्ती बिझी आहोत असे भाव त्याच्या चेहर्यावर यायचे.. गंमतच होती ती एक..

ही पेजर व्यवस्था लॅन्ड लाईन ला कनेक्टेड होती.. ज्याच्या जवळ पेजर आहे, त्याला काही निरोप द्यायचा असेल, तो निरोप आपण टेलिफोन त्या विशिष्ट नंबर वर द्यायचा.. मग ते त्याला लोकेट करुन, तो मेसेज त्याच्या पेजरवर पाठवायचे.. मेसेज आला की त्या पेजर मधून टुक् टुक् असा आवाज यायचा.. मग तो वापरणारा मेसेज रिड करायचा…

त्यावेळची एकदम अत्याधुनिक व्यवस्था .. पण काळाच्या ओघात.. कालौघात.. तंत्रज्ञानाचे वेगवान प्रगतीत .. हे यंत्र फारच अल्पजीवी ठरलं.. कारण नंतर लगेचच वायरलेस सिस्टीम चे भ्रमणध्वनी वापरात आले.. आणि ते बिचारं अल्पजीवी पेजर काळाचे ओघात केव्हा गायब झाले, ते कोणाला कळलच नाही..

होय ना?

मोहन वराडपांडे
9422865897.

 

सर्व प्रिय वाचकांना नमस्कार😊🙏🏻

“कालौघात झालेले बदल” या लेख मालिकेतील आजचा अंतिम लेख.

आपण सर्वांनी मला अक्षरशः भरभरून प्रोत्साहन दिलं.. प्रतिसाद दिला..माझा उत्साह वाढविला.. आपणा सर्वांचे आभार मानण्यास मला शब्द कमी पडताहेत ..त्यामुळे मी असाच कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो.

पुनःश्च खूप खूप धन्यवाद सर्वांना .. असाच लोभ असू द्यावा.. व आता रजा द्यावी.

मोहन वराडपांडे
9422865897.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}