Classifiedगुंतवणूकजाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनयुनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

इन्व्हेस्टमेंट ग्रुप दिवाळी गेट-टू-गेदर 14 11 2023

गेली साडे सहा वर्षाहून अधिक काळ ब्राह्मण युनिटी च्या इन्व्हेस्टमेंट ग्रुप असणारे मेंबर्स अधून मधून प्रत्यक्ष भेटत असतात , त्या ग्रुप वरचे अनेक लक्ष्मीधर आज पाडव्याचा योग ( 14/11/23) साधून आपल्या मुलांसहित इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या दिवाळी गेट टू गेदर साठी जमले होते

इन्व्हेस्टमेंट ग्रुप मेंबर्स

लक्ष्मी च्या पाऊलानी दीपावली आली असे म्हणत आपण सर्वाना भरभराटीच्या शुभेच्छा देत असतो..गेली साडे सहा वर्षाहून अधिक काळ ब्राह्मण युनिटी च्या इन्व्हेस्टमेंट ग्रुप असणारे मेंबर्स अधून मधून प्रत्यक्ष भेटत असतात , त्या ग्रुप वरचे अनेक लक्ष्मीधर आज पाडव्याचा योग ( 14/11/23) साधून आपल्या मुलांसहित इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या दिवाळी गेट टू गेदर साठी जमले होते. सुट्ट्या , बाहेरगावी परदेशी असणाऱ्या मेंबर्स येऊ शकले नाहीत , पण ३१ जणांनी आज उपस्थित राहून उत्साह वाढवला ,
एका लांब लचक टेबल वर अरेंजमेन्ट असल्याने सर्वांना सगळ्यांचे बोलणे ऐकू येणे कठीण होते त्या मुले प्रत्येक टेबल to टेबल अशी छान छोटेखानी डिस्कशन सुरू होती. , काही जण पुन्हा पुन्हा येणारे , काही नेहमीचे प्रत्येक मिटिंग ला आवर्जून येणारे आणि काही पहिल्यांदाच आलेले असे सर्व समावेशक मिक्स चांगले जमून आले…. या वेळी काही जण आपल्या मुलांना ही घेऊन आले ही बाब खूप चांगली महत्त्वपूर्ण बदल होत आहे याची ग्वाही देत आहे..
नुसत्या पोस्ट वरून काही जण सर्वांना माहीत असतात , पण प्रत्यक्ष भेटून व्यक्ती अजून जास्त समजते आणि एकमेकांबद्दल विश्वासही वाढतो. त्यामुळे अशा प्रकारची छोटी छोटी संमेलने व्हावीत अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. आणि या पुढे रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये अश्या मिटींग्स केल्या जातींलच

अभिषेक हॉटेल मधल्या हॉल सदृश pvt हॉल मध्ये आपल्या सर्व मेंबर्स नि आपापली ओळख करून दिली , मिटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट , शेअर्स स्किप्स सेक्टर्स , आणि काही स्पेसिफिक views डिस्कस केले गेले , कोण नवीन सुरुवात केलेले , काही रिस्क घेणारे तर काही सेफ इन्वेस्टींग शोधणारे , कोणी काही वर्षांपासून करत असलेले आणि काही प्रचंड अनुभवाची शिदोरी घेऊन असलेले असे सर्व प्रकारचे इन्वेस्टर्स एकत्र येऊन सौहादपूर्णे गप्पा रंगल्या . मी काय घेतले , मी का घेतले ते मी काय विकले आणि आता कुठे लक्ष केंद्रित करत आहे इथं पर्यंत सर्व डिस्कशन सुरु असतांना , इडली वडा सांबार चटणी , चहा कॉफी याचा आस्वाद घेत मंडळी आपापले विचार मांडत होती. प्रत्येकाला इथे काही ना काही घेण्यासारखे आहे, होतेच .. कोणाला नवीन कंपन्यांची नावे , माहित नसलेल्या किती तरी कंपन्यांमध्ये इतर मेंबर इन्व्हेस्ट करत आहेत हे पाहून , किती मोठा स्कोप इथे आहे हे अजून ठळकपणे कळून गेले . कुणाला नवीन वेबसाईट वर काय कसे पाहायचे ते कळले , किंवा काही चुका होते असल्यास guidance किंवा corrections चा विचार दृढ झाला , , तर काहींचा इथे आत्मविश्वास वाढत आहे . प्रत्येक व्यक्ती करोडपती या आपल्या थीम मध्ये सामील झालेल्या ह्या प्रत्येक मेंबर साठी इथे संधी खूप आहेत आणि हे सर्व सुरु आहे केवळ आपापला अनुभव शेअर करताना होणाऱ्या डिस्कशन मधून , इथे कोणतीही फी नाही , का कसली सक्ती नाही , किंवा कोणाला पैसे द्यायला घ्यायला लागत नाहीत अनुभव आणि आपापला रिसर्च आपण सर्व जण इथे शेअर करतो त्याचा सर्वांना उपयोग होत आहे हे पाहून साडे सहा वर्षांपूर्वी नरेंद्र मेहेंदळे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा ग्रुप आज १२०० मेंबर्स चा झाला आहे यातच या सर्व मंडळींचे , आपले सर्वांचे यश आहे . सर्व मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद आणि दिवाळीच्या आणि संपूर्ण वर्षभरासाठी हार्दिक शुभेच्छा. स्टे इंवेस्टेड कीप इन्वेस्टींग कीप बुकिंग प्रॉफिट अँड कीप liquidity तो एक्सप्लोर न्यू opportunities

टीम ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन – इन्व्हेस्टमेंट ग्रुप

((for enq to join –  become a Brahman Unity Foundation member and  message 9021524188))

Related Articles

One Comment

  1. आज बरेच दिवसांनी मी ब्रेकफास्ट मिटींगला हजर झालो सर्वांना भेटून खूप आनंद झाला यावेळी सभासद थोडे जास्तच होते त्यामुळे दोन ठिकाणी बसावे लागले पुढच्या वेळी सर्वांनी अगोदर कळवल्यास उपेंद्र आणि श्रीरंग एखादी छोटासा हॉलच बुक करतील असे मला विश्वास आहे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}