डीव्हीडी कॉर्नर 14 11/2023 — आजची खुश खबर .. डॉ विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर 14 11/2023 — आजची खुश खबर .. डॉ विभा देशपांडे
7 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
कुपवाडा येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ 41 राष्ट्रीय रायफल्स (मराठा एलआय) मध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. जमिनीपासून सात बाय तीन चौरस फुटांवर उभा असलेला साडेदहा फूट उंच अश्वारूढ पुतळा 41 राष्ट्रीय रायफल्स (मराठा एलआय) च्या तळावर प्रत्यक्ष सीमेवर बसवण्यात आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई शहरातील राजभवन येथे ढोल-ताशे आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात मुंबईहून कुपवाडा येथे रवाना करण्यात आला
कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणा आणि उत्साह देईल. शत्रूवर विजय मिळवल्यानंतर तिरंगा फडकवण्यासाठी हा पुतळा सदैव तत्पर असेल, असे शिंदे म्हणाले
———————————————————————————
भारत 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती साजरी करत आहे. नेहरू जंयतीच्या दिवशी 1959 पासून दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलानल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि ते त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत. 1964 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बालदिनाच्या निमित्ताने मुलांचे हक्क, संगोपण आणि शिक्षणावर प्रकाश टाकला जातो.
थोडा टेंशनला ब्रेक देऊया,
रोजचं काम थोडं दूर ठेवूया,
तर्कबुद्धीला आराम देऊया,
आज थोडं लहान होऊया,
मुलं म्हणजे पाखरांची चपळता,
मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता
मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट,
मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत,
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण,
बालपणीच्या आठवणीत हरवते मन,
कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण,
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!