Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर

आजचा दिवस ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनचे विद्यानंद देशपांडे आणि कुटुंबाचा
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांचं जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या शिष्या आणि पुण्यातील अश्विनी स्वरालयाच्या संचालिका सौ. अश्विनी गोखले यांनी रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. नाट्य स्वर यज्ञ नामक या कार्यक्रमात स्वतः अश्विनी गोखले आणि त्यांच्या स्वरालयातील, वय वर्ष ८ ते वय वर्ष ८० या वयोगटातील एकूण ६५ विद्यार्थ्यांनी आणि अश्विनी ताईंचे सहाध्यायी संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर, निनाद जाधव, डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी एकूण १०१ नाट्यपदे एकाच कार्यक्रमात सादर केली. असे सादरीकरण यापूर्वी कोणीही केले नसल्यामुळे हा विक्रम प्रस्थापित केला गेला आणि त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाल्याची घोषणा कार्यक्रमाच्या अखेरीस करण्यात आली. या कार्यक्रमातील १०१ पैकी ७० गाण्यांना आपल्या ब्राह्मण यूनिटी चे विद्यानंद देशपांडे यांनी तबला साथसंगत केली. विद्यानंद यांची मुलगी आद्या आणि मुलगा आरोह यांचाही या कार्यक्रमात गाण्यासाठी सहभाग होता. तर सुप्रिया विद्यानंद देशपांडे यांचा संयोजनात महत्वाचा सहभाग होता. या प्रसंगी पुण्यातील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. सर्व सहभागी कलाकारांना वैयक्तिक प्रमाणपत्रे लवकरच देण्यात येणार आहेत.
डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर
डॉक्टर विभा देशपांडे