ह. मो. मराठे एक आठवण:-
ह. मो. मराठे एक आठवण:-
आज अनेक ब्राह्मण समाजाचे सोशल मीडिया वर ग्रुप अस्तित्वात आहेत. त्यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाज एकवटून किमान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध क्षीण असा का होईना पण आवाज उठवत आहे.
पण समाज म्हणून आपली स्मरणशक्ती फारच कमी असते. आपण काल घडलेले आज विसरून जातो. ब्राह्मण समाजावर अन्याय होत असून इतर समाजांना जसा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आहे तसा तो ब्राह्मण समाजाला देखील आहे आणि एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण समाजात जन्म घेतला म्हणजे त्याने काही अपराध केला नाही हे पहिल्यांदा प्रखरपणे सांगितले त्या व्यक्तीला आज किती जण ओळखतात?
त्या व्यक्तीचे नाव आहे श्री ह. मो. मराठे. साहित्य जगत त्यांना ह. मो. म्हणून ओळखते. त्यांचा जन्म सन 1940 साली झाला. सन 2004 मधील एका दिवाळी अंकात त्यांनी एक लेख लिहिला “ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?” आणि सगळा महाराष्ट्र हादरून गेला. मूलतः लेखक, पत्रकार असलेले ह.मो. सुरवातीच्या काळात समाजवादी विचारसरणीचे लेखक होते; परंतू कालांतराने त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे कार्य सुरू केले.
त्याचे किंमतही त्यांना चुकवावी लागली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना कायमचे सोडावे लागले. मात्र त्यांनी त्याची कधीही पर्वा केली नाही.
त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी “विविजा मंच” (विद्वेषाच्या विरोधात जागृती मंच, 607/ओ इमारत, पिनाक मेमरीज (II), कोथरूड, पुणे 411 038 मो. क्र. 9423013892) स्थापन केला आणि त्या अंतर्गत स्वतःच्या व इतर लेखकांच्या खालील पुस्तिका प्रकाशित केल्या
1) ब्राह्मणमानस
2) विद्रोही ब्राह्मण
3) ही घ्या ब्राह्मणेतर तरुणांच्या शंकांची उत्तरे
4) संत तुकारामांचा खून खरेच ब्राह्मणांनी केला असेल?
5) ब्राह्मण- निंदेची नवी लाट
6) ब्राह्मण चळवळ कशासाठी?
7) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग
8) मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडवले काय?
9) गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ
10) शंबुक, एकलव्य। यांच्या दु:खांना ब्राह्मण जबाबदार आहेत काय?
11) ब्राह्मण परकीय आहेत काय?
12) डॉ. आंबेडकर यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग.
अजूनही इतर पुस्तिका.
दुर्दैवाने 2 ऑक्टोबर 2017 साली त्यांना देवाज्ञा झाली. त्यांना 77 वर्षांचे आयुष्य लाभले.