मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

विषय : वाढत चाललेला स्क्रीन टाईम शब्दांकन: शुभा रुद्र

विषय : वाढत चाललेला स्क्रीन टाईम
शब्दांकन: शुभा रुद्र

विज्ञानातील शोधांमुळे आणि प्रगतीमुळे टेलिफोन, दूरदर्शन, मोबाईल, स्मार्टफोन, टॅब ,फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामवर कोणत्याही विषयाची माहिती आता माऊसच्या एका क्लिकवर मिळते. ही सारी किमया प्रसारमाध्यमांच्या क्रांतीमुळे झालेली आहे. अगदी वर्तमानपत्रापासून ते फेसबुक ट्विटर पर्यंत हां हां म्हणता आपले जीवन यांनी व्यापून टाकलेले आहे.

सोशल नेटवर्किंग वाईटच आहे असे नाही. पण सद्विवेक बुद्धीचा वापर करणे हे आपल्या हातात आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची झोप अपुरी होते.झोपमोड होते. अपचन, लठ्ठपणा, अस्वच्छता, ताण, डोकेदुखी, आजार, चिडचिड, हट्टीपणा, नकारात्मक भावना बळावत असल्याचे दिसून येते. लिंडा स्टोन यांनी अनेक प्रयोग केले. या निरीक्षणातून असे लक्षात आले की जे संगणकावर किंवा स्क्रीनवर जास्त वेळ बसतात , त्यांनी श्वासाची पद्धत जाणून घेऊन सरावाने योग्य करायला हवी. हृदयाच्या ठोक्यांवर यावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे दर २० मिनिटांनी २० सेकंद ब्रेक घ्यायला हवा.

या अतिरिक्त वापरामुळे जिवलग मित्र – मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा, पुस्तके वाचणे, अभ्यास करणे, मैदानी खेळ खेळणे, इतर छंद जोपासणे, निसर्गाचे निरीक्षण करणे, निसर्गाचा आनंद घेणे, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करणे, मस्त झोप येणे, आपल्या शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी , त्यांची विचारपूस करणे,घरातल्या लोकांची चौकशी,  त्यांचे कौतुक करणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, बाहेरील कामांची जबाबदारी घेणे, घरातली कामे करणे अशा अनेक गोष्टींपासून आपण दुरावलेलो आहोत. आपलं कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्ती यांना प्राधान्य देणे कुटुंबातील मिळणारी सुरक्षितता प्रेम, माया, जिव्हाळा याला तोड नाही. त्याग, आपुलकी, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं सर्वांनी मिळून घरची काम करणं, एक जबाबदार नागरिक म्हणून अत्यंत आवश्यक आहे. अशा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आजकाल वेळ नाही. वेळ आपल्याला कमी पडतो. मोबाईल नावाच्या अल्लाउद्दीन च्या दिव्याने केवळ जगचं नाही तर जगातील बऱ्या-वाईट गोष्टी आपल्या मुठीत आणून ठेवलेल्या आहेत. मात्र हे गोंडस उपकरण अधिकाधिक स्मार्ट होत आहे. तसेच आपल्या जीवावर उठत असल्याचे अनेक घटनांमधून आपल्याला लक्षात येते.

पुष्कळदा शाळेतली संख्या सुद्धा मुलांची हजेरी पत्रकं पाहिली तर कमी होते आहे असे लक्षात येते. जेव्हा या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आलं की पालक आपल्या मुलाला म्हणतात- “आजच्या दिवस नको जाऊ शाळेत. जो अभ्यास बुडला असेल तो शेजारची तुझ्या वर्गातली मैत्रीण तिच्याकडून वही घे झेरॉक्स कार्ड आणि लिहून काढ किंवा मोबाईलवर फोटो काढ आणि मग लिहून काढ. सजग पालक असतील तर मुलांचा स्क्रीन टाईम कमी करतात. नाहीतर मोबाईलचा स्क्रीन टाईम आणखीन वाढतो”. अगदी जन्मलेल्या मुलांच्या सुद्धा हातात मोबाईल पाहिल्यानंतर कौतुक आपणच करतो. आणि तो क्षणार्धात रडणारा शांत बसतो असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर ते मूल आपलं ऐकेनास होतं. मोबाईलचे व्यसन कधी जडतं हे लक्षात येत नाही आणि मग ते व्यसनच बनत.

लहानांचे काय मोठ्यांचे सुद्धा डोके दुखणे, मान खांदे दुखणे, डोळे कोरडे होणे, अंधुक दृष्टी होणे, झोपेचा त्रास होणे, तुटक झोप होणे, त्यामुळे शारीरिक- मानसिक समस्या निर्माण होणे असे प्रमाण वाढले आहे. भावनांचे अर्थ लावण्याच्या क्षमतेवर सुद्धा याचा परिणाम होतो. स्क्रीन टाईम जास्त वाढल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी पाण्याचे सेवन करा असा आजकाल तज्ञांकडून सल्ला दिला जातो. काळवेळाचे भान राहत नाही.

प्रत्येक घरटी आजकाल आपली मुलं परदेशात राहतात. त्यांच्याशी बोलणं, नातवंडांशी बोलणे वेबकॅम, स्काईप, झूम याद्वारे संवाद साधता येतो. आपल्या शाळेतल्या जुन्या मित्र-मैत्रिणींशी ज्येष्ठ नागरिकांना संवाद साधता येतो. अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था अर्थकारण बाजारातील फायद्यांचे वापर करणे यात निश्चितपणे वाढ झालेली आहे. कित्येक कोटींची उलाढाल प्रसारमाध्यमात होत असते. प्रसार माध्यमांचे विविध प्रकार त्यांचे परिणाम फायदे- तोटे असतातच. या गोष्टीच्या सजगपणे विचार करायला हवा अशी वेळ आलेली आहे.

टॅब हे महागडे खेळणं बऱ्याच मुलांच्या हातात दिसतं. त्यावर ते गेम खेळतात. शाळेमध्ये काही मुलं आत्महत्या करत आहेत. असे काही खेळ ते खेळत आहेत याबद्दल पालकांना कल्पना नसते. आधुनिक प्रसारमाध्यमातून अवास्तव अतिरंजीत आणि उद्दीपित करणारी माहिती मिळते त्यामुळे वयात आलेल्या मुलांसाठी लैंगिकतेबद्दल निर्माण होणारे समज गैरसमज मनामध्ये खोलवर घर करतात.

स्क्रीन टाईम जास्त दिल्यामुळे अन् आरोग्याकडे आपण जात आहोत. शारीरिक स्वास्थ्यासाठी काही विशेष निकष लावावे लागतात. खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्नतेकडे शरीर झुकले पाहिजे. आपले शरीर धडधाकट चिवट असले पाहिजे. कितीही कष्ट पडले तरी आपण थकता कामा नये. एवढेच नव्हे तर कणखरपणा, काटकपणा, सोशिकता ताकद, वेळप्रसंगी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्षणासाठी मदतीला धावून जाणे, विश्वासपूर्वक- समर्थपणे हे करता आले पाहिजे. त्यासाठी खेळ व्यायाम चौरस आहार हे नितांत गरजेचे आहे. वाढत चाललेल्या स्क्रीन टाईम आपले नुकसान करत आहे या जाणिवेची जाणीव असायला हवी. आपल्यासाठी सुविधा आहेत सुविधांसाठी आपण नाही.
✍🏻 शुभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}