निसर्ग नियम २ देण्याचा व घेण्याचा दिवस विभावरी कुलकर्णी मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक
*निसर्ग नियम २*
*देण्याचा व घेण्याचा दिवस*
*Day of GIVING & RECEIVING*
निसर्गा कडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. निसर्ग आपल्याला द्यायला पण तयार असतो.पण निसर्गाचा एक नियम असतो.जो पर्यंत तुम्ही काही देत नाही तो पर्यंत निसर्ग पण काही देत नाही. निसर्गाची मागणी खूप कमी असते.तुम्ही एक धान्याचा दाणा द्या.निसर्ग हजारो दाणे देतो.एक बी लावा.निसर्ग जंगल देतो.हाच नियम सगळीकडे असतो.थोडक्यात आपल्याला जे हवे असते त्याचे दान करावे.उदाहरण म्हणजे पूर्वीची दानाची पद्धत आठवून बघू.पूर्वी कोणकोणत्या वस्तू दान दिल्या जात असत ?
समजा एखाद्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्याने चष्मे द्यावेत.डोळ्यांच्या हॉस्पिटल साठी दान द्यावे.ज्यांना पायाचा त्रास असेल त्यांनी काठी किंवा पायाचे बेल्ट दान करावेत.
*दाना साठी हेतू महत्वाचा असतो.*
सवय लागे पर्यंत ती गोष्ट लक्ष पूर्वक करावे लागते. पोहणे शिकताना जसे सुरुवातीला प्रत्येक कृतिकडे लक्ष द्यावे लागते नंतर ती कृती आपोआप होते.तसेच दानाचे पण आहे.एकदा दानाची सवय लागली की ते निर्व्याज होते.
दान हे फक्त पैशाचेच नसते. दान कशाचे करता येईल ते बघू.
▪️फुल,चॉकलेट,पेन,
पेन्सिल,रुमाल कोणतीही छोटी वस्तू
▪️ आनंद,कौतुक,
सहानुभूती,सदिच्छा.
▪️ जमेल तशी मदत करणे
▪️ सोबत करणे.
▪️ शिकवणे
▪️ रस्त्यात मदत करणे
काही जण एक नियम पाळतात.आपल्या कमाईचा एक दशांश भाग गरजू व गरिबांना दान करतात.त्यातून जी सकारात्मक ऊर्जा व आशीर्वाद मिळतात त्यामुळे पैशाचा ओघ वाढतो.
*दानाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.*
हे प्रकार *कनिष्ठ* दाना पासून *उच्च* दाना पर्यंत आहेत.
१) मनात नसताना ( नाईलाजाने ) दान करणे. – सर्वात कनिष्ठ.
२) आनंदाने दान करु शकतो त्या पेक्षा अगदी कमी दान करणे.
३) मागितल्यावर दान करणे.
४) याचना करण्या पूर्वी किंवा मागण्या पूर्वी देणे
५) कोणाला देत आहोत त्याचे नाव माहिती नसणे.
६) घेणाऱ्याला कोण देतो हे माहिती नसणे.
७) देणारा व घेणारा दोघांचेही नाव एकमेकांना माहिती नसणे.
८) असे दान की ज्या मुळे एखादी व्यक्ती स्वावलंबी होणे. हे *सर्वोत्तम* दान आहे.
एक उदाहरण बघू.आठवड्यातून एक दिवस असे करु शकतो.५०/१०० रुपयाचे ५ किंवा १० रुपयात रूपांतर करायचे.व एकेक नोट कुठेही ठेवायची.थोडक्यात आपण पैसे ठेवले आहेत हे विसरुन जायचे.आणि नोटा ठेवताना मनात एकच भावना ठेवायची ती म्हणजे *ही नोट ज्याला मिळणार आहे, त्याचे कल्याण व्हावे व त्याला आनंद मिळावा.*
यात देणारा व घेणारा दोघेही एकमेकांना ओळखत नसतात.यातून काय साध्य होईल?तर आनंद आपल्याकडे येईल.कारण त्या प्रत्येक नोटे बरोबर आपण *आनंदाचे दान* केले आहे. आणि निसर्ग नियमा नुसार एकाचे अनेक पण आपल्याकडे येतात.त्यामुळे अनेक पटीने आनंद आपल्याकडे येणार आहे.अनुभव घेऊन तर बघू या.
जी गोष्ट देण्याची तिच गोष्ट घेण्याची.आपण शक्यतो काही घ्यायला नको म्हणतो.अगदी कोणी नमस्कार करु लागले तरी नाकारतो.तसे करु नये.छान नमस्कार घ्यावा व तोंड भरून सदिच्छांचा आशीर्वाद द्यावा.कोणी काहीही दिले तरी ते तितक्याच चांगल्या मनाने स्वीकारावे.व चांगल्या शुभेच्छा द्याव्यात,धन्यवाद द्यावेत.आपल्याला जर रस्त्यात बेवारस काही वस्तू,पैसे सापडले तर आपण आधी कोणाचे आहे याचा शोध घेतो.जर कोणी आसपास नसेल तर लगेच असा विचार करतो की हे कोणाला तरी देऊन टाकू,पैसे असतील तर दानपेटीत टाकण्याचा विचार येतो.त्या पेक्षा त्या वस्तू/पैसे जवळ ठेवावेत आणि ज्याचे असेल त्याला सुखी व आनंदी ठेवा असे म्हणावे.
हेच ते *देण्याचे व घेण्याचे* नियम!
हे अमलात कसे आणायचे याची कृती बघू.
▪️ *आज भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी भेट देईन.*
▪️ *जे मिळेल त्याचा मनापासून व आनंदाने स्वीकार करेन.*
▪️ *आज कोणाच्या विषयी किंतू ठेवणार नाही.*
▪️ *आज भेटणाऱ्या प्रत्येका विषयी काळजी,सहानुभूती,सहृदयता बाळगेन व तसेच वर्तन करेन.*
▪️ *आज सगळ्यांशी हसून,मार्दवतेने वागेन.*
▪️ *आज सगळ्यांशी प्रेमाने वागेन.*
असा आठवड्यातून एक दिवस ठेवायचा.आणि येणाऱ्या आनंदाला व भरभराटीला समोरे जाऊन स्वीकार करायचा.
तुम्ही हे नक्की आनंदाने करणार!
धन्यवाद!
✒️ विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
४/११/२०२३.