दुर्गाशक्तीवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

हाऊसवाईफ

हाऊसवाईफ

रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता . तशी इतक्या दिवसांच्या सुट्टी ची सवय नव्हती त्याला.. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं.. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायच नाही.. घरात सगळ्यांना तस सांगूनही टाकल..
त्याच्या बायकोला तसा आनंद झाला..तसही चांगल बोलण ह्यांना माहीतच नाही.. निदान आज complaint तरी ऐकायला मिळणार नाहीत मनात विचार करून ती मनोमन सुखावली..
आज तिने नास्ताला सकाळी डोसा केला मुद्दाम.. ह्यांना डोसा आवडत नाही.. पण आज बोलणार नाहीत ठरवलं आहे मग काय.निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला त्यांची आवडती डिश. त्याने ही गुपचूप खायला सुरवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले. किती छान डोसा बनवते ही.. आपण न खाता उगीचच तिला बोल लावत होतो.. आणि त्यात मी खात नसल्याने माझ्या साठी वेगळा नास्ता तिला बनवायला लागत असे… सगळ्यांचा नास्ता करून झाला मग ती नास्ता करायला बसली.. तो तिला पाहतच होता.. खरंच आपल्याला गरमागरम डोसा दिला पण ती मात्र गार झालेल खात बसली… त्यानंतर ती आवरायला गेला. तो हॉल मध्ये न्याहाळत बसला होता ..दारावरच तोरण किती छान विणलं होत तिने …लगेच त्याच लक्ष वॉल वर गेलं फ्रेम पाहिली किती छान पेन्टिंग केली होती…गेल्या वर्षीचं आपल्या वाढदिवसाला तिने ती गिफ्ट केली होती. दुसऱ्या दिवशी च्या client meeting असल्याने आपण नीट पाहिली ही नव्हती… आणि आभार मानायचे विसरून गेलो होतो… तस पाहता ती ऑलराऊंडर होती..
मी काय बरं तिला गिफ्ट दिल होत… अरे मी तर तिचा birthday विसरलो होतो.. तरीही ती रागावली नव्हती… तिला वाईट वाटलंच असणार पण.. व्यक्त करायची हिम्मत झाली नसणार…
हॉल किती छान सजवला होता तिने.स्वतः बनवलेल्या वस्तुंनी.
तो खूप वेळ तसाच बसून होता. ती मात्र काम करतच होती.. भांडी धुतली, केर काढला, फरशी पुसली, मुलांना अंघोळ घातली, कपडे धुतले, पुन्हा जेवण बनवायला लागली… ही काम करताना मुलं त्यांच्या परीने तिला मदत करत होते.. आपण कधी तिला मदत केल्याच त्याला आठवेना…
दुपारी जेवायला बसले मसाला भेंडी केली होती. हिच्या हातची मसाला भेंडी ऑफिसमध्ये सर्वाना फार आवडते.. मसाला भेंडीची काय तर कुठला ही पदार्थ असो ती चांगलाच करते
जेवण झाले… सगळं आवरून.. ती मुलांचा अभ्यास घ्यायला बसली.. मुलांचा अभ्यास ही तीच घेत असे नेहमी . ऑफिस मधील काणेकर त्यांच्या मुलांची ट्युशनची फीस किती देतात …आणि आपले किती पैसे वाचतात.. . तो असाच बसून होता..
थोड्या वेळाने तिने शिलाई मशिन काढल आणि मुलीसाठी कपडे शिवायला घेतले.. छोटीला छान गुलाबी फ्रॉक तिने शिवला होता..
आता तर तिने काही नवीन बनवल तरी दाखवण बंद केल होत.. कारण आपल उत्तर एकच होत तस तुला काम काय आहे.. तू तर हाऊसवाईफच आहेस.घरात बसुनच असते…
संध्याकाळी झाली तो गॅलरीमधे बसून होता.. तिने चहा आणि कांदा भजी आणून दिली… अफलातून.. लागत होती.
त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले.. ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब ला होती… जेव्हा गुडन्यूज समजली तेव्हा तिने जॉब सोडला. मुलगी थोडी मोठी झाली मी पाळणाघरात ठेवायच सांगितलं पण तिने स्पष्ट नकार दिला..कारण तिला मुलांना वेळ, प्रेम, संस्कार द्यायचे होते आणि मला फक्त पैसा….
गावी गेलो की माझे आई बाबाना किती हिचे कौतुक करायचे …किती गुणांची सून.. पण मी मात्र हिने जॉब सोडल्या पासून सारख हाऊसवाईफ अस बोलत राहिलो..त्याला हे आठवून अपराध्यासारख झाल…
रात्रीच जेवण झाल पण त्याच काही लक्ष नव्हत…बिछान्यात झोपायला गेला झोप काही लागत नव्हती… आज पर्यत मी किती चुकीच वागलो.. बॉस चा राग मुलांवर किंवा हिच्यावर काढत राहिलो.. घरी असायचो तरी फक्त प्रमोशनचा विचार करत असायचो..टार्गेट कंप्लीट करण्याच्या नादात मी मुलाना बायकोला प्रेम द्यायच विसरून गेलो.. पैसा पैसा आणि फक्त पैसा दिसत होता मला तर… माझ्या स्वभावाच्या उलट हिचा स्वभाव
हिने आयुष्यात नात्यांना महत्व दिल…आणि मी पैसा आणि जॉबला . इतक सगळं घरासाठी करत असूनही मी हिच्याशी किती चुकीच वागलो.. अपराध्याची भावना त्याच्या मनात आली..
आता त्याने बदलायचा ठरवलं..सकाळी ती उठायच्या अगोदर तो उठला.. केर काढला ती उठली तशी फ्रेश होऊन येणार इतक्यात तिच्या हातात चहा चा कप दिला..तिला आश्चर्याचा धक्का बसला.. . तिने कप घेतला. … त्याच्या डोळ्यात अश्रू होते शब्द ही निघत नव्हते..
फक्त म्हणाला…. हाऊसक्वीन*’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}