दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
Trending

वेळ ……मधुर कुलकर्णी

 

“”वेळ

      कितीतरी गोष्टींची वेळ अगदी घड्याळाच्या काट्यावर ठरलेली असते ना! शाळेची घंटा,नाटकाची घंटा, मिलचा भोंगा, कंपनीचा सायरन,घड्याळाचा अलार्म! वेळेचं महत्व मुंबईकरांइतकं कोणालाच नसेल. त्यांच्या बोलण्यात, “८.३५ ची चुकली रे.” असं कोणी बोललं की समजून जायचं लोकलबद्दल बोलताहेत.😀 अक्षरशः घड्याळाच्या काट्यावर सोमवार ते शनिवार आयुष्य जगणाऱ्या मुंबईकरांना सलाम!

आपण जन्माला येतो तीच मुळात वेळ ठरवून! काहीजण ९ महिने पूर्ण व्हायच्या आतच ह्या जगात यायची घाई करतात. पण त्यांची ह्या सृष्टीवर येण्याची ती ‘वेळ’ ठरलेली असते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या वेळा सांभाळतांना मात्र एका माऊलीची त्रेधातिरपीट उडते. ते कधी झोपेल, कधी उठेल, त्याला कधी भूक लागेल सगळंच अनिश्चित! तिचा Timetable मग बाळाच्या मर्जीनुसार सुरू होतो पण त्यात आईची माया,कौतुक आणि लटका राग पण असतो,”इतका जागवतो ना रात्री,झोपच होत नाही माझी.” पण तेच बाळ मोठं झाल्यावर अभ्यासासाठी जेव्हा जागरण करतं, तेव्हा तिच्या मनात कालवाकालव सुरू असते.

परीक्षेची ‘वेळ’ ही अशीच टेन्शन देणारी! तिची तारीख कळली की १५ दिवस आधी हुरहूर,भीती सगळं सुरू होतं. जे मुलं, मुली पूर्ण तयारीत असतात त्यांना कधी एकदा परीक्षा होते आणि आपण मोकळं होतं असं वाटतं.

लग्नाच्या मुहूर्ताची वेळ असते,(हल्ली ती पाळत नाही कारण नवरीचा make up च व्हायचा असतो.😀) मात्र ते कधी ठरेल ह्याची वेळ नसते. कितीदा आपण म्हणतो ना, “वेळ आली की,योग आला की आपोआप सगळं जुळून येईल.” अशी वेळ आली की मग अगदी सातासमुद्रापलीकडला सुद्धा ती किंवा तो धावून येतात.

‘वेळ पाळणे’ हा शब्द खूप जणांच्या डिक्शनरीतच नसतो.😀म्हणजे एखादं लग्न असेल तर तदैव लग्नम् सुरू झालं की हे येणार आणि मी कसा योग्य वेळेत आलो हे वरून सांगणार. ट्रेनच्या प्रवासात तर गाडी सुटल्यावर धावत चढणारे शूरवीर असतात. मला नागपूरला Volvo ने जाताना अनेकदा अनुभव आलाय की वेळ टळून जाते,पण प्रवाशांचा पत्ताच नसतो. मग तो ड्रायव्हर ह्या VIP ना फोन करतो. आणि आम्ही अर्धा तास तिथे आधी पोहोचतो आणि व्हाट्स अप बघत बसतो. (आमच्या घरात वेळेचं अति महत्व आहे.🙄)

आयुष्यात यश कधी कधी उशिरा मिळतं. ‘ती वेळ यावी लागते’ असं आपण अनेकदा बोलतो. माझ्या बाबतीत हेच तर झालं,त्यामुळे माझी ‘वेळ’ आत्ता आली आहे.😀

एखादी दुःखद घटना ऐकल्यावर किंवा बघितल्यावर कुणावरही अशी ‘वेळ’ येऊ नये, असं आपण पटकन म्हणतो. एखाद्या दुर्धर आजारातून कुणी बरं झालं किंवा अपघातात कुणी वाचलं तर ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’. असं म्हणतात.

तिन्हीसांजेला हुरहुर लावणारी ती ‘कातरवेळ’! सगळं आलबेल असताना देखील उगाचच हुरहूर लावणारी ‘वेळ’!

२०२३ चा आजचा शेवटचा दिवस! रात्री १२ ची ‘वेळ’ इंग्रजी कॅलेंडरचे नवीन वर्ष घेऊन येणार. दरवर्षीच काही गोड, काही कटू आठवणी असतातच. दरवर्षी आपण म्हणतो,”हे वर्ष किती पटकन संपलं.” पण ते त्याच्याच वेळेत संपत असतं.😀 सरत्या वर्षाची ‘वेळ’ संपत आलीय पण त्या वर्षाने आनंद तर नक्कीच दिलाय. मला तर खूपच! माझ्या पहिल्याच कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला,हाच खूप आनंद!

सरत्या २०२३ ला निरोप देत २०२४ चे भरभरून स्वागत करूया!

माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹😊

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}