Classified

संक्रांत … श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक, संतचरित्र लेखक ) भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

आज संक्रांत म्हणजेच सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण होय. सर्वसाधारणपणे भारतीयांचे सण हे चांद्र दिनदर्शिकेवर आधारित असतात. परंतु, संक्रांत हा सण मात्र सौर दिनदर्शिकेवर आधारित आहे. सूर्य त्याच्या सात घोड्यांनी युक्त अशा रथात बसून येतो आणि उत्तरायण सुरू होते अशी कल्पना आहे.

आज आपण प्रकाश, त्याचे सात रंग, इंद्रधनुष्य ह्याची माहिती घेणार आहोत.

थोर भारतीय खगोल शास्त्रज्ञ वराहमिहीर याने आपल्या बृहद् संहिता नवाच्या ग्रंथात खालील श्लोक लिहिला आहे.
🚩
सुर्यस्य विविधवर्णः पवनेन विघट्टिताः कराः साभ्रे |
वियति धनु संस्थानः ये दृश्यते तदिन्द्रधनुः ||
🚩
ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

The multicolored rays of the Sun being dispersed by the wind in a cloudy sky are seen in the form of a bow which is rainbow

ह्याचा अर्थ मराठी भाषेत पाहू :

ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन आकाशात इंद्रधनुष्य तयार होते.

ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टोटल आणि महान शास्त्रज्ञ न्यूटन यांसारख्या परदेशी संशोधकांनी इंद्रधनुष्य, प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन ह्याचा सिद्धांत मांडला अशी मान्यता आहे. परंतु वर उल्लेख केलेल्या श्लोकामध्ये ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात प्रस्तुत सिद्धांत मांडल्याचे दिसून येते.

सूर्याची सात किरणे

ऋग्वेद मंडल १ सूक्त ५० मंत्र ८
🚩
सप्त त्वा हरितो रथे वहन्ति देव सूर्य । शोचिष्केशं विचक्षण ॥
🚩

सप्त) सप्तविधाः किरणाः (त्वा) त्वाम् (हरितः) यैः किरणै रसान् हरति त आदित्यरश्मयः। हरितइत्यादिष्टोपयोजनना०। निघं० १।१५। (रथे) रमणीये लोके (वहन्ति) (देव) दातः (सूर्य्य) ज्ञानस्वरूप ज्ञानप्रापक वा (शोचिष्केशम्) शोचींषि केशा दीप्तयो रश्मयो यस्य तं सूर्य्यलोकम् (विचक्षण) विविधान् दर्शक ॥८॥

जसे किरणांशिवाय सूर्याचे दर्शन होऊ शकत नाही. तसेच वेदांना ठीक ठीक जाणल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होऊ शकत नाही, हे निश्चयपूर्वक जाणावे. ॥ ८ ॥

सप्त हरितः म्हणजे सात किरण येथे हरितः ह्याचा अर्थ हिरवा रंग असा नसून किरण असा आहे.

ऋग्वेद मंडल १ सूक्त ५० मंत्र ९

🚩
अयुक्त सप्त शुन्ध्युवः सूरो रथस्य नप्त्यः । ताभिर्याति स्वयुक्तिभिः ॥
🚩

यथा सूरो याः सप्त नप्तः शुन्ध्युवः सन्ति ता रथस्य मध्येऽयुक्त तैः सह याति प्राप्नोति तथा त्वं स्वयुक्तिभिः सर्वं विश्वं जगत्संयोजयसीति वयं विजानीमः ॥९॥

भावार्थः – अत्र वाचकलुप्तोपमालंकारः। यः सूर्यवत् स्वयं प्रकाश आकाशमिव व्याप्त उपासकानां शुद्धिकरः परमेश्वरोस्ति स खलु सर्वैर्मनुष्यैरुपासनीयो वर्त्तते ॥९॥

जो सूर्याप्रमाणे स्वतःचा स्वतःच प्रकाशस्वरूप, आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक, उपासकांना पवित्र करणारा, असा परमेश्वर आहे, तोच सर्व माणसांचा उपास्य देव आहे. ॥ ९ ॥
सप्त शुन्ध्युन्व शुद्ध करणारी सूर्याची किरणे.

ऋग्वेद मंडल ४ सूक्त ५० मंत्र ४

बृहस्पतिः प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् |
सप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत् तमांसि ||४ ||

सात मुख असलेला, अनेक प्रकारे प्रगट होणारा, सात किरणे असलेला, आकाशात सर्वप्रथम प्रगट होणारा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधाराचा नाश करतो.

ऋग्वेद मंडल ५ सूक्त ४५ मंत्र ९

आ सूर्यो यातु सप्ताश्वः क्षेत्रं यदस्योर्विया दीर्घयाथे |
रघुः श्येनः पतयदन्धो अच्छा युवा कविर्दीदयद् गोषु गच्छन् ||९||

सूर्याने सात घोड्याने युक्त होऊन यावे. कारण हे दीर्घ क्षेत्र त्याच्याच प्रवासासाठी आहे. हा ज्ञानी सूर्य किरणाच्या मध्ये राहतो आणि प्रकाशित होतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण हेच की प्रत्येक मंत्रात सूर्याच्या सात घोड्यांचा उल्लेख आहे. हे सात घोडे म्हणजे सूर्याचे सात रंगांचे किरण सूर्यप्रकाशापासून सात रंग तयार होतात ह्याचे ज्ञान भारतीयांना वेदकाळातपासून होते.

सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

तुमच्या सर्व what’s app समूहांत पाठवा.
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
www.ancientindianscience.com

– श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक, संतचरित्र लेखक )
भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}