देश विदेशमनोरंजन

भटकंती ची गोष्ट , अजून एका सुट्टीची . सुट्टीच्या सुरूवाती पासून शेवट पर्यंत

उपेंद्र पेंडसे

उपेंद्र पेंडसे: भटकंती ची गोष्ट , अजून एका सुट्टीची . सुट्टीच्या सुरूवाती पासून शेवट पर्यंत

कुठून सुरू करायची कुठे कुठे जायचे काय काय पाहायचे आणि किती दिवस अशी चर्चा रंगत गेली

नंतर विचार आला की यातले आपल्याला काहीच लागू पडत नाही कधी ही कुठे ही आणि केव्हा ही आणि कितीही दिवस या कॅटेगरी

उत्तराखंड, नर्मदा परिक्रमा. कर्नाटक टायगर फॉरेस्ट , प्रयाग राज अयोध्या आणि राजस्थान ट्रीप अश्या विविध ऑप्शन्स संशोधन करून मग राजस्थान ट्रीप शेवटी फायनल केली आणि आज पासून राजस्थान रोड ट्रीप ला सुरूवात केली 3000 ते 4000 km चा थरार

Accu weather वर थंडी आणि पुढच्या दिवसांचे temperature पाहून हे पण कळले की 3 , 4 deg c येणार आहे रात्री काही काही ठिकाणी सो त्याची तयारी

आता गाडी मध्ये आम्ही दोघेच , मग काय मागची सीट भरे पर्यंत थांबलोच नाही ..इतके मस्त बसवले सगळे की एकही बॅग हलणार नाही तरी पण सीट वर काहीच नाही , आणि काही राहिले असे वाटणार पण नाही , हां … तरी पण गुजराती राजस्थानी शॉपिंग ठेवायला जागा अजून आहे गाडीत भरपूर .

पाण्याच्या बाटल्या मयूर तुळशीबागवाले यांच्या कडून , खाऊपिऊ अग्रज आणि सावरकर यांच्याकडून अशी सगळी जय्यत तयारी करून , 5 जानेवारी 2024 म्हणजे आज सकाळी चार वाजून 11 मिनिटांनी पुण्यातून निघालो

थंडी खूप अशी नव्हती निघतांना म्हणून इतकं करून जॅकेट नाहीच घातले
पुणे ते पनवेल ठाणे एकदम मस्त आलो 6.27 ला ठाणे क्रॉस … आणि तिथून घोडबंदर रोड क्रॉस करायला अल्मोस्ट एक तास … 35 मिनिटांचा delay तो खूपच शांतपणे क्रॉस करून फाऊंटन हॉटेल वरून अहमदाबाद हायवे ला लागलो तर दोन पाच किलोमिटर मध्येच
प्रचंड कोहरा … पण आपले विमान कुणाचे ऐकतच नाही.. पुढच्या पुढच्या ट्रक गाड्या ह्यातून मार्ग काढत आम्ही मस्त जात होतो पुढे … रस्ता भारी आहे . थ्री लेन आणि खरंच चांगला आहे अगदी आजच्या हॉटेल पर्यंत

हो आणि एक… या वेळी एकही बुकिंग केलेले नाही .. जिथे पोहोचू त्या वेळी बुक करायचे .. म्हणजे आटापिटा करून कुठे पोहोचायचे त्याचे टार्गेट पूर्ण असले काही नको

खरंच विमान चालवल्याचा फील आला आज 680 किमी .. 12 तास आणि ब्रेक फास्ट ला आपल्या खालापूर वाल्या श्री दत्त चे वडे आणि थालीपीठ त्यांच्या अहमदाबाद रोड वर असलेल्या जॉइंट वर .. दुपारी मस्त फक्कड जेवण काठीयावाडी चे .. आणि त्यात गाजर का हलवा .. आणि नंतर वडोदरा ते अहमदाबाद हा सुपर एक्सप्रेस way..90 100 च हवा स्पीड … Car 100 आणि ट्रक 80 असे लिहिले होते मग मी काटा 100 ला फिक्स करूनच आलो गांधीनगर by पास वरून डायरेक्ट हॉटेल ला

गाडी पार्क केली 4.45 pm आणि आवरून रिक्षा करून बाहेर पडलो 5.15 ला… इंद्रोदा पार्क पण उशीर झाला .. ते बंद झाले होते.. तिथून मग सरिता उद्यान आहे पाहिले त्यात आपण 1.5 किमी ची चाल करून येऊ शकतो ती केली .. चालणे झाले थोडे .. खूप पोपट आणि लांडोर आणि मोर पाहिले.. आपल्या बरोबरीने बिनधास्त फिरत होते.. माणसाळले आहेत चांगले.. थोडे दूर असतात पण घाबरत नाहीत , सरिता उद्यानात मोर लांडोर पाहायला बरेच कपल येऊन बसले होते..

ते उद्यान पाहून आम्ही पुनीत वन बघायला व्यवस्थित लावलेली झाडे आलो .. तिथे वॉक झाला पुन्हा वन बघण्याच्या निमित्ताने .. जॉगिंग ट्रॅक आहे exercise equipment आहेत लहान मुलांना खेळायला भरपूर जागा आहे

साडे सहा ला अक्षरधाम मंदिर . Amazing site .. unparalleled .. इथे स्वामी नारायण यांच्या बद्दल खूप वाचता आले … त्यांचे बालपण . हिमालयातील शिक्षण आणि अनुभव , .. मंदिरात लेझर शो पण फारच् attractive

येतांना रिक्षा चालक काय वाटले म्हणून आख्खे गांधी नगर फिरवून आणले . महात्मा मंदिर, त्री मंदिर पासून मंत्रालय , मोठे मोठे रस्ते , गार्डन्स. अतिशय सुंदर शहर . कुठे ही गलिच्छापणा नाही अतिक्रमण नाही झोपड्या , कॉर्नर स्टॉल लावण्यात आले नाहीत
प्रचंड मोठे मोठे रस्ते . जबरदस्त लायटिंग .. vibrant Gujarat 24 सुरू होते आहे आता त्याची तयारी पाहायला मिळाली … म्हणे मोदी जी कॅमेरा लावलेत त्यातून नजर ठेऊन सगळे बघतात आणि काही काही वाटल्यास कॉल करतात ….गांधीनगर फार छान प्लॅन केले आहे .. मोदी जी आल्यापासून झालेले बदल लोक n विसरता सांगत आहेत आणि दिसत ही आहेत ..

थंडी आपल्यापेक्षा जास्त आहे आपल्याकडे आत्ता 10 वाजता 22deg इथे 17

रात्री गुजरात मध्ये पंजाबी जेवण म्हणजे एक ट्रीट होती .. बिल कमी जेवण जास्त. असे झाले आमचे . स्वस्ताई इथे खूप आहे आपल्यापेक्षा .

Day 2 starts tomorrow
…..6/1/24…..

गांधीनगर ते नडाबेट भारत पाकिस्तान बॉर्डर

आज सकाळी सहा च्या गजराने उठल्यावर अजून अर्धा तास झोप म्हणजे काय असते ते सुख घेऊन साडेसहा वाजता (13 deg) आवरायला घेतले … ७.३५ ला बाहेर पडून .. काल पेट्रोल फुल्ल करायचे राहिले होते ते पंप शोधून आधी केले .. थोडीशी वाट वाकडी करायला लागली पण झाले पटकन … मग कलोल महेसाणा मार्गे …. (वाटेत श्रीजी नावाचे पोहा , पराठा ढोकळा असा दणदणीत नाश्ता करून) … अगदी आरामात २३ च्या avg ने सुईगाम येथे पोहोचलो .. रस्ता एकदम मख्ख्न…. सरहद्द गेस्ट हाऊस नावाचे इथे एक हॉटेल आहे तिथे चेक इन केले म्हणजे नुसते सांगितले की आम्ही नडाबेट बघून येऊ … त्याने ही ok म्हणून रूम मिळेल म्हणून फक्त नंबर लिहून दिला आणि आमचा घेतला
नो adv वगैरे

आम्ही तिथे एकता नावाचे एक व्हेज हॉटेल आहे तिथे जेऊन पुढे नडाबेट ला निघालो

१७ किमी वर भारत पाकिस्तान ला मिळतो ती जागा बॉर्डर पोस्ट … बॉर्डर पिक्चर मुळे थरार डोक्यात होताच .. तिथे गेल्यावर तो का आणि कसा असतो त्याचे एक जबरदस्त डिस्प्ले ही असा काही दिसला की पाकिस्तान चे काही खरे नाही हीच भावना डोक्यात बसलीच आणि आपण किती सेफ का असतो त्याचे कारण ते डोळ्यात तेल घालून पहारा देणारे अखंड प्रहरी…..

म्युझियम , मिग बोफोर्स आणि मिसाईल पहात पहात आम्ही नडाबेट बॉर्डर चेक पोस्ट ला पोहोचलो .. तिथून आम्हाला सर्वांना बस ने बॉर्डर अडवान्स पोस्ट वर नेण्यात आले .. हाताला नडाबेट BSF बँड आणि सतत देशभक्ती ची गाणी अश्या वातावरणात गेल्यावर आपल्यात ही बदल होतोच … भारत माता की जय वंदे मातरम्. अश्या आरोळ्या सर्व जण ठोकून तिथे पोहोचतातच

झीरो पॉइंट म्हणजे हिंदुस्थान पाकिस्तान ची बॉर्डर त्या नंतर नो मेन्स लँड आणि तिथून १५० मीटर वर पाकिस्तान पोस्ट …काय नजारा दिसतो … अथांग पसरलेल्या वाळू आणि दलदल याचे मिक्स आणि नजर जाईल इथे एकही झाड नाही … केवळ सपाट जमीन आणि तिच्या अंताला मिळणारे अनंत आकाश

तिथे बरेच आहे अनुभवायला ते सर्व पाहून १९७१ च्या युद्धाची तयारी नडाबेट मधून आपले सैनिक कुठे आणि कसे घुसले याचे मॅप वर पाहणे , झीरो पॉइंट आणि सर्व विषय अधिक समृद्ध झालेल्या मनाने आम्ही अँडव्हॅन्स पोस्ट वरून साडे चार ला परत आलो नडाबेट च्याच बॉर्डर पोस्ट ला

देशभक्ती गीत गात खूप मुले आली होती शाळेच्या ट्रीप बरोबर , ती नाचत होती
थोडा वेळ ते पाहून होईपर्यंत announcement झाली

Beating the Retreat ceremony ची…. हो इथे ही वाघा बॉर्डर सारखाच सेरीमनी असतो. उंटा वर स्वार होऊन बीएसएफ चे जवान सुरू होतात … त्या नंतर ध्वज घेऊन येतात त्यांचे बीएसएफ आणि इतर काही… मग सुरू होते परेड .. जबरदस्त जोश संचारलेला असतो तो पर्यंत आपणात ही… सर्व जण जोर जोरात ओरडून ओरडून प्रोत्साहन देत असतात त्यांना आणि ते ही त्याच जोशात भाग घेत असतात beating the retreat मध्ये… इथे कमांडो पण होते, उंट होते आणि स्निफ्फर डॉग्स पण त्या परेड मध्ये…

लोकांच्या मनावर ताबा घेतात ते आणि सर्वत्र भारताचा जयजयकार सतत होत राहतो .. प्रत्येक नवीन एन्ट्री ला टाळया आणि जयजयकार करत आम्ही सर्व देशभक्ती त हरवून गेलो.. नंतर आला तो क्षण … आपला झेंडा रोज संध्याकाळी खाली उतरवून प्रॉपर फोल्ड करून घेऊन जातात तो क्षण … जन गण मन सुरू झाले आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी येते ते पाहून … इतक्या अलगद पणे .. ध्वज उतरवून ते प्रचंड सन्मानाने कसे नेतात ते खरंच पाहण्यासारखे आहे..

सव्वा सहा ला सर्व काही संपते आणि आपण एका वेगळ्या दुनियेतून आपल्या दुनियेत प्रवेश करत करत आपल्या घरी येतो .

पण मनावर बिंबून राहिलेले ते दृश अजून ही माझ्या नजरेसमोरून जात नाही

रात्री २२.१५ नडाबेट
६ १ २०२४
जय हिंद

 

7.1.24
आज मोठा पल्ला होता 380km अणि नो हायवे म्हणून सहाचा गजर झाल्यावर एकही सेकंद extra झोपेचे सुख न घेता आवरून 6.45 ला प्रवास सुरू केला. प्लॅन असा होता की नडाबेट ते खुरी म्हणून एक ठिकाण आहे डीप डेझर्ट मध्ये साम डेझर्ट सारखेच, तिथे जायचे .. नडाबेट वरून निघालो परफेक्ट वेळेत आणि थराड सचोर बाडनेर असा प्रवास करत फतेह गड , सांगड आणि सांगड हून खुरी … हा रस्ता प्रचंड खराब आहे अदानी च्याच पवन चक्की हजारात आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 100 किमी च् रस्ता व्यापलेला आहे त्यांनी

मला उदयन जोशी याने खूप मदत केली आणि वेगळा रस्ता पण suggest केला पण तो वर मी सांगड चा रस्ता पकडला होता .. एक दोन वेळा गाडी अगदी खड्यातून जाऊन आली … पण कसे तरी finally पोचलो खुरी डेझर्ट ला… खुरी रिसॉर्ट आहे खूप छान पण आज Sunday सर्व सकाळी चेक आउट आणि आख्या रिसॉर्ट मध्ये फक्त आम्ही दोघेच… मग विचार केला साम डेझर्ट जास्त पॉप्युलर आहे आणि इथे साम डेझर्ट पासून दोन किमी वर कानोई ला RTDC आरटीडीसी चे सुंदर रिसॉर्ट आहे … थोडा alternatives वर रिसर्च करून ठेवला होता तो कामीं आला..

हे रिसॉर्ट इतक्या मस्त जागी आहे की सनसेट इथून सर्वात सुंदर दिसतो, उंट सफारी , जीप डेझर्ट सफारी सर्व याच रिसॉर्ट समोर सुरू होतात.
एकदम मोक्याची जागा…

इथे डायरेक्ट कॉल करून सांगितले की एक तासात येत आहोत आम्हाला बुकिंग हवे आहे … आणि मिळाले पण सकाळी 6.45 ते 5 गाडी चालवत होतो … थोडे ब्रेक झाले फोटो चे आणि ब्रेकफास्ट च् पण लंच skip कारण जेवायची वेळ होती तेव्हा काही कुठे मिळाले नाही .. सो आलो असेच ब्रेकफास्ट नंतर दिवस भर उपास करून रात्री जेवायला

मग काय खुरी डेझर्ट मधून आलो इथे . साम डेझर्ट ला ..चेक इन झाले पाच वाजले होते आणि थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली होतीच s

तरी आल्याआल्या लगेच 🐫 सफारी करायला निघालो .. एक उंट , आयुष्यात पहिल्यांदा त्यावर बसणारी मनाली ,,… ते सुद्धा उंटावरच्या पहिल्या सीट वर आणि मी मागे..
उंट उभा राहण्यासाठी जोर लाऊन उभा राहातांना आम्ही almost आडवे झालो आणि मग तो चालायला लागल्यावर डकाव डकाव करत आम्ही पण त्या राईड ची मस्त मजा घेतली 🌞 सेट पाहून परत आलो RTDC ला आणि पुन्हा थंडी ची पूर्ण तयारी करून साम डेझर्ट ची ओपन जीप सफारी …. हा मात्र एक मस्त वाळवंटातला थरार आहे. ड्रायव्हर जिप्सी त आणि आपण मागे ओपन सीटिंग मध्ये…. 4x 4 सुरू होते जीप ती टार रोड वरून पण चौथ्या पाचव्या मिनिटाला घुसते वाळूत …. साम डेझर्ट , साम डेझर्ट म्हणजे काय ते समजायला पाच मिनिट लागतात .. जिप्सी चा स्पीड आणि थंड वाऱ्याने आपले जीप च्या बाजुना धरलेले हात सैन्सेशन लेस होतात आणि कानात . आणि सर्वात थंड वाऱ्याने भरलेली शिरशिरी सुरूवातीला थोडी अस्वस्थ करते.. त्यात साम dunes .. रेतीचे उंचवटे आणि त्यातून जाणारी आपली ती गाडी .. आपण इतके छान आहोत ना की कुठे ही कसे ही ऍडजस्ट करून टाकतोच… इथे ही तसेच .. पाच सात मिनिटात रेडी टु एन्जॉय the sensational Joy राईड.. डीप डेझर्ट मध्ये यायला 25 मिनिटे लागतात .. 20 25 किमी आत येतो आपण तेवढ्या वेळेत आणि आपल्याला रेतीच्या टिल्या वर ती जीप सफारी थांबवते .. बघावे तिकडे फक्त तशीच वाळू रेती चे छोटे मोठे डोंगर . तिथे सर्व ॲडव्हेंचर आहेत . बीच वाली गाडी . उंट गाडी , बलून राईड , पँराग्लाईड …
जे हवे ते करावे …. आम्ही या सर्वांचे फोटो काढले .. खूप डिप्या काढून घेतल्या कुडकुडत थंडी लागायला सुरुवात झाली तेव्हा ही सर्व मज्जा करून वेगळ्या वाटेने पुन्हा जीप राईड चा थरार अनुभवत RTDC ला परत ..

तो वर सात वाजले आणि इथे RTDC ने एक cultural ओळख राजस्थान ची या साठी राजस्थानी संगीत प्रोग्राम अरेंज केला होता .. आल्यावर त्यात सामील झालो , नाच गाणी शेर शायरी आणि काही पॉप्युलर राजस्थानी गाणी असा हा प्रोग्राम 7 ते 9. रंगिलो राजस्थान … केसरीया ते मोरनी बागामा पर्यंत ओरिजनल व्हर्जन्स ऐकायला मिळाली
थंडी कडक 12 13 deg आहे आत्ता आणि अजून temp खाली येऊन सेट होईल ते सकाळी 10 पर्यंत असेच असते … मग वाळू तापायला लागली की थोडे 21 25 पर्यंत येईन पुन्हा थंडी … मस्त हवा असते या सीझन मध्ये.. आकाश ही एकदम क्लिअर आणि डेझर्ट मध्ये भरपूर स्काय गॅझिंग करता येते..

त्यातल्या त्यात RTDC ने नाव चांगले ठेवले आहे , चैल सिंग नावाचे त्यांचे ह्या रिसॉर्ट चे मॅनेजर यांचा इथे चांगला होल्ड आहे. पण बाकी पूर्ण कमर्शियल झालेले हे ठिकाण आहे.. सर्व धंदा लोकल मुस्लिम च् बघतात .. जिप्स उंट खाण्या पिण्याची हॉटेल सर्व त्यांचीच

इथे कोणी येणार असल्यास दोन काळज्या नक्की घ्याव्या
1 बुकिंग करू नये , आल्यावर negotiate करावे किंवा आरटीएससी लाच यावे … सर्वात सोयीस्कर जागा आहे आणि व्ह्यू पण भारी
2 बाईक स्वार मागे लागतात त्यांना कोणत्याही प्रकारे aviod करावे. काहीही deals देतात आणि फसवणूक होण्याची शक्यता असते

वाळवंटात ला हा थरार आज खरंच फार धमाल देऊन गेला . गाडी चा प्रवास , रस्त्यात दिसणाऱ्या अदानी च्या पवनचक्या . अचानक घडलेला उपास , आणि साम डेझर्ट चा थरार .. आणि आता 11 deg temp ..ॲडव्हेंचर च् ते … हड्डीतोड थंड हवा वहात आहे आत्ता ,..

रंगीलो म्हारो राजस्थान आज , आत्ता कुठे सुरू झालाय ..
Stay tunned… नवीन गमती जमती. आणि एकापेक्षा एक अनुभव …

7.1.2024

रंगीलो म्हारो राजस्थान आज… साम गाव बॉर्डर पोस्ट आणि जैसलमेर

आधी कालची एक गोष्ट जी आज सकाळी कळली… उंटावरून बसून वाळवंटात राऊंड मारत असताना त्याच्या चालीने डकाव डकाव करतांना माझे माकडहाड सीट च्याच कडक बेसवर घासले जात होते त्याने सकाळी सकाळी आठ deg त जागे होताना त्याचे लपलेले अस्तित्व दुखून दाखवले ते आता जरा बरे आहे

सकाळी 5.50 ला जाग आली आणि बाहेर येऊन पाहिले तर कडक थंडी काळोख आणि प्रचंड कोहरा fog घुके दहा फूट पण दिसत नव्हते … आठ वाजे पर्यंत तीन चार राऊंड झाल्या बाहेर पण कोहरा fog धुके काही कमी होई
ना… आवरून घेतले तो पर्यंत . बॅग्स गाडी मध्ये लोड करून ..
RTDC मध्ये सकाळचा मस्त नाश्ता पुरी भाजी … सर्व आवरून आम्ही चेक आऊट केले.. पण जवळच फिरावे असे finally ठरले ,. लाँगेवला बॉर्डर पोस्ट ला जाणार होतो पण या कोहऱ्या ने प्रोग्राम बदलायला लावला आणि आम्ही अजून जास्त वेळ साम डेझर्ट मध्येच काढला..

त्यामुळे एक चांगले झाले की जे लोक हे पाहत नाहीत अशी एक जागा पाहायला मिळाली . साम डेझर्ट बीएसएफ BSF पार्क मध्ये आम्हाला जायला मिळाले .. फारच छान जागा . Adventure climb. बंकर मध्ये visit , shooting range मध्ये फायर करायला मिळाले . वीर प्रहरी स्तंभ . बॉर्डर पिक्चर मध्ये लोंगेवला मध्ये दाखवलेले तनोट माता मंदिर पाहिले .. फेन्सिंग कसे असते .. त्याचा कसा उपयोग करत असतात… एक छान माहिती मिळालेली शेअर करतो… कुठे हरवलो आपण वाळवंटा सारख्या प्रदेशात तर पुढील उपाय इथे असलेल्या लोकल रिसोर्सचाच वापर करून
1 शंकराची पिंडी ची एक लांब बाजू ही नेहमी उत्तर दिशा असते
2 कबर ज्या साईड ला उंच असते ती उत्तर बाजू
3 मशीद असले तर आत जायचे दार नेहमी पश्चिमेकडे असते

कमांडो , स्विफ्ट ॲक्शन साठी अशी माहिती उपयुक्त

हे सर्व पाहून आम्ही जैसलमेर ला आलो आणि पुन्हा एकदा RTDC मध्येच चेक इन करून लगेच फोर्ट पाहायला गेलो.. मोठा आहे किल्ला . आत मध्ये वस्त्या आहेत .. total किल्ला population 4000 आहे आणि प्रचंड गर्दी आणि संपूर्ण पणे कमर्शियल .. किल्यात रहाणाऱ्या घरा घरातून फक्त व्यापार च् पाहिला जातो … कित्येक जागा फ्री आहेत पाहायला त्या नीट सांगितल्याच जात नाहीत ….गाईड 500 सांगून नाही म्हटले की 100 वर येतोय .. 100 रू रिक्षा जैसलमेर शहर फिरायला 1000 चे 400 रुपये . असे nigotiate करायला लागत होते .व्ह्यू पॉइंट खूप छान आहेत आणि फिरायला दोन तास तरी हवेत… ते आम्ही पूर्ण फिरलो. सूर्य मंदीर आहे किल्यावर …( माहीत आहे का कुणाला ..) दुपारचे जेवण किल्यावरच झाले .. राजस्थानी थाळी आणि ताक.. तृप्त झालो खाऊन पिऊन

किल्ला बघुन , बडा बाग . पटको की हवेली वगैरे पाहून आम्ही जैसलमेर वॉर मेमोरियल ला आलो

आजची संपूर्ण सफल visit हीच.. जे कोहऱ्या मुळे लोंगेवाला हुकले असे वाटत होते ती सारी कसर या वर मेमोरियल ने भरून काढली.

१९७१ १९४७ कारगिल वॉर आणि नंतरच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले त्या लढाया सर्व इथे फार सुंदर रित्या दाखवले आहे. बोफोर्स . हॉवीटझर तोफा सर्व प्रकारच्या आत्ता पर्यंत वापरलेल्या गम्स रणगाडे मिग२९ वगैरे सर्व इथे पाहायला ठेवले आहे
किल्ला पाहायला प्रचंड गर्दी पण इथे त्याच्या १० टक्के ही नाही अशी परिस्थिती….. Any ways …

So ते पाहून गडीसर लेक ला आलो
लेक छान आहे , क्लीन आहे बोटींग आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे पाण्याच्या पडद्यावर लेझर शो आहे RTDC तर्फे .. संपूर्ण जैसलमेर ची ओळख त्यात करून दिली जाते.. आणि भरपूर टुरिस्ट येऊन बॉम्बे भेळपुरी , मॅगी चहा आणि असे बरेच काही खात खात हा शो एन्जॉय करत असतात.. आम्ही ही केला राजस्थान मधील जैसलमेर ची माहिती सांगणारा , दाखवणारा शो …

आता टेम्प ८ deg आहे .. थंडीत फिरून चार दिवस झाले आता आमची नाकं युरोपियन झाली आहेत .. परत येई पर्यंत प्रयत्न करू की संपूर्ण युरोपियन होतो का या साठी…. बघू काय होतंय

उद्या असाच एक जबरदस्त थरार…. अजून एका पिक्चर ची राजस्थान मधली कहाणी

पधारो म्हारे राजस्थान मां … पुढचा भाग उद्या …

आज दिनांक ८ १ २०२४

जैसलमेर मध्ये भलतीच थंडी होती पहाटे temp ७ deg आले आणि तसंही
सकाळी आज जास्त प्रवास नव्हता म्हणून गजर दोन तीन वेळा बंद करून सहा ऐवजी साडे सात ला उठून आवरून सव्वा नऊ ला निघालो

जैसलमेर मधून निघतांना काही जास्त वाटले नाही पण हायवे लागल्या वर कोहरा जबरदस्त त्यामुळे आज प्रवास एकदम आरामात … असाच ७०-८० स्पीड

आज चार मोर दिसले. एका घरात पाळलेले आणि फोटो काढेपर्यंत त्यातील एकाने पिसारा ही फुलवून अजुन मज्जा आणली

पण एक आहे आजचे दोन्ही actually तिन्ही अनुभव थरारक
१ आमच्या पुढे एक तीन चाकी वाहन होते आणि त्याच्या पुढे जैसलमेर स्टोन खाणीतून दगड घेऊन चाललेला एक ट्रक. सुरूवातीला २०० मिटर पर्यंत दिसत होते . पण फुल्ल लाईट्स ऑन करून चाललो होतो… त्या दगड नेणाऱ्या गाडीतून एक मोठा दगड अचानक खाली ट्रक च्याच मागे मध्येच पडला … पाठी मागे रिक्षा आणि त्या मागे थोड्या अंतरावर आम्ही … रिक्षा ने डाव्या बाजूला गाडी वळवून स्वतःला वाचवले.. मनाली चे लक्ष होतेच तिने मला ही aware केले .. आणि आम्ही तो रस्त्यात पडलेला दगड aviod केला..


नंतर कोहरा अजून दाट होत गेले visibility कमी झाली .. साईड ची ही
पोखरण येथे अणुस्फोट केल्याची जागा जवळच आहे दोन अडीच किमी आत्ता च्या नव्या by pass पासून .. ती साईट पहायची खूप इच्छा होती पण. धुके इतके जास्त होते की तिथे जाऊन काहीही बघता ही आले नसते . …

सो आम्ही जोधपूर चा रस्ता पकडला आणि जोधपूर पाहण्याचा प्लॅन तयार करून इकडे आलो ..

३ वाटेत मिठी बेरी आणि खारी बेरी गावे लागतात … बहुतेक ते दोन्ही बाईक स्वार पुणेकर इकडे शिफ्ट झाले असावे . मागे बघायला आरसा नाही , वळून बघणे नाही , कोणताही सिग्नल नाही आणि डायरेक्ट लास्ट मोमेंट ला हात दाखवून एकदम ८० ९० deg turn ला ready.. मी जोरदार 📯 हॉर्न वाजवला आणि त्याला कळले आणि तो तिसऱ्या लेन मधून दुसरी लेन क्रॉस करून वळायच्या लेन मध्ये येणार तितक्यात त्याच्या रॅम मध्ये strick झाले आणि त्याने गाडी पुन्हा तिसऱ्या लेन मध्ये आणली… मी गमभन ची लाखोली घालत पुढे आलो..

जैसलमेर १२.३० ला पोचलो पण… एकदम पुणे च् … तसाच गोंधळ तसाच traffic तशीच शिस्त आणि तसेच चौक आणि सिग्नल … पेठा n च्याच जागी नावे वेगळी इतकाच फरक …
इथे हवा बदल थोडा बदल.. जरा जास्त वेळ लागला थंडी यायला त्यामुळे जास्त वेळ मिळाला फिरायला
मेहेरांनगड आणि जसवंत थड्डा सर्वात पहिल्यांदा पाहिले … सुंदर किल्ला . बघण्या सारख्या … Pvt property आहे ६०० रू प्रत्येकी तिकीट आहे … पण वर्थ आहे असे आम्हाला वाटले …. किल्याची गुगल माहिती खूप आहे ती काही इथे देत बसत नाही पण बघावं असे आहे ते, उंचावरून जोधपूर ब्ल्यू सिटी दिसते बऱ्याच घरांना पत्रे निळे आहेत.. त्या मुळे एक रंग असा डोळ्यात भरतो

तिथून मंडोर गार्डन … मांडोर म्हणजे मंदोदरी , रावणाच्या पत्नीचे माहेर. हे ठिकाण सर्वात छान आहे … आणि निट अँड क्लीन … नाग गंगा नदी चाच उगम इथे आहे , महादेव मंदिर आणि लेझर शो बघण्यासाठी आम्ही उम्मेद भवन ला जाण्याचे सोडून इथेच छान भरपूर फिरलो , सन सेट आणि दोन antique museum त्यात आहेत . काळया गोऱ्या भैरू जी चे मंदिर ही छान आहे …आणि तिथून घंटा घर ही जागा भारी आहे राजस्थान चे घड्याळ समजले जाणारे हे ठिकाण ऐतिहासिक च् हे जोधपूर मधील प्राचीन आणि सेंटर ऑफ जोधपूर .. अश्या ठिकाणी गेलो .. आपला लक्ष्मी रोड च् जणू.. किराणा मेडिकल होल सेल ते रोड सेल सर्व काही एक ६०० मिटर मध्येच … आपल्या भाषेत किचाट.. गोंधळ आम्ही आज सहाशे मिटर मध्ये तीन चार वेळा वेडेवाकडे उलट सुलट फिरून….त्यामुळे पाच दहा जणांनी आम्हाला हॉर्न मारून पण त्या गोंधळात थोडी भर घातली…

नंतर आलो ते जोधपूर च्या जगप्रसिद्ध जनता स्वीट मध्ये आणि मग कित्येक दिवसात न खाल्लेले चाट items , जोधपुरी स्पेशल मिरची वडा मोगरा कचोरी , समोसा , पनीर ब्रेड पॅटीस. पनीर कटलेट सर्व खाणेबल वस्तूंवर ताव मारला आणि वर sweet आणि नामकिन पॅक्स पण घेतले .. सुतार फेणी आणि आपल्या समोर तळून दिलेली गरम गरम जिलबी म्हणजे तृप्त झाले च् सगळे ….

९.१.२०२४

आज कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला… जोधपूर चांगले आहे पण टुरिस्ट ला पाहायचे फक्त एक उमेद्द भवन सोडलं तर बाकी आमचे काही राहिले नव्हते

सो सकाळी जाग आल्यावर विचार केला की आज काय करावे… थोडा गुगल मॅपिंग केले आणि ठरवले की आज आपल्या वाटेवरचे सर्वात थंड ठिकाण कोणते…. तर मग माउंट अबू… मग जोधपूर मधून सकाळी एका वेगळ्याच रस्त्याने निघालो … सहसा असे कोणी ट्रॅव्हल करत नाही . सांडेराव सुमेरपूर सिरोही पिंडवाडा स्वरूपगंज असा एक मारवाड ते मेवाड असे कल्चर जोडणारा असा जोडणारा रस्ता … अप्रतिम रस्ता …कोणताही खड्डा नाही किंवा आज कोणताही त्रास नाही ट्रॅफिक किंवा वेडेवाडके चालवणाऱ्यांचा… फक्त एक आहे गायी गुरे कुठे ही कशाही क्रॉस करतात त्यांना सांभाळायला लागते पण थोडे सोपे आहे कारण गाय संथ चालते तिची direction बदलत नाही आणि स्पीड आपल्याल कळलेला असतो ..
पक्षांचे थवे उडत उडत जातांना वेगवेगळा आकार , नक्षी , आणि शेप काढत जातांना दिसत होते.. इथे थोडी झाडे आहेत शेत आहे खजुराची झाडे लावली आहेत … त्याच्या बागा आहेत
पण पाणी अत्यंत खराब, चव घेतली तर ओकारी येईल अशी चव … आपण असे पाणी पिऊ शकणार नाही .. लोकल लोक पाण्यासाठी हातगाडी वरून वेगळे पाणी मागवत असतात …… मयूर तुळशीबागवले यांच्या पाण्याची महती आणि उपयोग भारीच … Thanks मयूर आता थोड्या बाटल्या ऊरल्या आहेत .. पण सर्वांसाठी एक suggestion .. long टूर साठी पाण्याचे क्रेट carry करावे

अतिशय आरामात आणि एकदम वेळेत प्रवास. , पाहिला टनेल आज लागला राजस्थान मधला आणि माउंट अबू चे द्वार मस्त … ऋषी वसिष्ठ यांचे नाव दिलेले द्वार …. आवडले

हॉटेल ला पोचल्यावर चेक इन झाले आणि लोकल फूड खायला लगेच बाहेर पडलो … कनक गुजराती थाळी एकदम छान आहे … तिथून सुरू केले लोकल पर्यटन …. सर्वात पहिले आम्ही ज्या साठी इथे आलो ते दर्शन …. गुरुशिखर… दत्त महाराज दर्शन … एक अनुभव … दत्त महाराज दर्शन करत असताना आम्ही साष्टांग नमस्कार घातला आणि उभे राहत असताना कुठे पादुकांच्या हात लागला त्या वेळी गंधाचा एक थेंब , ठिपका जे म्हणाल ते हाताला कधी कसे लागले ते कळलेच नाही .. खाली आलो आणि पाहतो तर ते छान असे हातावर पसरून इतके मस्त रंगले होते … आत्ताही तसेच आहे थोडे फेड झाले आहे इतकेच … अष्टगंधाचा सुवास अजूनही दरवळत आहे… तोच हात आम्ही आमच्या साठी प्रसाद समजून कपाळावर टिळा म्हणून ठेवला … इतके छान दर्शन. कोणतीही गर्दी नाही … गुरुशिखर ते गुरुशिखरच. त्या समोर सर्व माउंट अबू फेल…

ते पाहून प्रजापिता ब्रह्मकुमारी पिस पार्क , ट्रेवर टँक …ट्रेवर नावाच्या इंग्रजी माणसाचे है काम. .. आपल्या सर्वांसाठी त्याने बांधून ठेवलेला हा tank … आणि viewings पॉइंट्स. Actually रात्री सफारी साठी इथे आले तर अस्वले दिसू शकतात बर्ड वॉचिंग साठी तर आख्खा दिवस घालवण्याची जागा

थोडा वेळ तिथे घालवून आम्ही संध्याकाळी ५.४४ ला 🌞 सेट ला आलो.. पण नाही पहिला… सन सेट पॉइंट ला जायला चक्क तिकीट १३४ रू इको पार्क च्या नावाखाली उद्योग … आम्ही ☀️ सेट नाही पहिला अबू चा…

लोक तिथे जात होते तेव्हा आम्ही मेन नक्की झील कडे येत होतो.. छान आहे राजस्थान मधील सर्वात उंच तळे . … नैनिताल ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ….. लेक आहे मस्त. देवांनी है नखाने खरवडून तय्यार केलेला तलाव …..जबरदस्त कारंजे सत्तर ऐशी फुट वर उडते ..राजस्थानी शिल्प इथे खूप मिळतात आणि genuine शॉप्स आहेत … मार्केट भारी आहे टिपिकल महाबळेश्वर पाचगणी स्टाईल पण बरेच मोठे आणि खूप व्हरायटी गुजराती कल्चर राजस्थानी मारवाडी मेवाडी कल्चर आणि काही कोरियन ब्रँड शॉप्स याचा अनोखा संगम … भरपूर वेळ तिथे शॉपिंग करून गाडी थोडी भरून घेतली.. गरम गरम रबडी जिलबी वर ताव मारून मह हॉटेल ला यायला निघालो

गेम्स पार्क आणि डान्स सोंग्ज ची सगळी सोंग इथे आहेत …. हनीमुनर्स चा paradise आहे राजस्थान गुजरात चा..

ओव्हर all ok hill station .. sorry to say पण गुजराती लोक जोर जोरात. बोलत असतात , प्रचंड घाण करतात. थुंकणे आणि हातातले खाऊन संपले की कचरा रस्त्यात तिथेच टाकणे हा जसा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच… मी आपण हातातल्या ५०० ml बाटली संपल्यावर कचऱ्याचा डब्बा शोधणारे… कल्चर च फरक …..
अबुरजा देवी धराधरेश्वर महादेव , सिद्धेश्वर महादेव दुलेश्वर महादेव असे दर्शन ही झाले

एक फक्त सोडावे लागले गोमुख ..७०० पायर्या उतरून आणि पुन्हा वर यायला थोडे कठीण झाले… आम्हाला दोघांना आज temp एकदम खाली आल्यामुळे थोडी सर्दी आहे …सो ते राहिले

अचल गड पण छान आहे .. मस्तच आहे .. पण कठीण आहे वर पर्यंत खऱ्या सोन्याची मूर्ती पाहणे म्हणजे amazing experience .. लवकर होणारा sun set … आणि थंडी वाढत होती

आता आठ deg temp आहे सकाळी सहा deg होईल

रात्रीचे राजस्थान मधील पंजाबी जेवण ठीक … थंडी ने हात हळू चालत आहेत म्हणून उशीर झाला आज

उद्या आम्ही इथून निघू आणि बघतो कुठे काय जायचे ते
कळवतो उद्या …. १० १ २०२४

उदयपुर का कुंभलगड असा विचार करत माउंट अबू मधून निघत होतो तेव्हाच हॉटेल मॅनेजर ने सांगितले की कुंभलगड पाहून तुम्ही रात्री उदयपुर ला पोहोचू शकता

म्हटले 👍 डन… लावला मॅप कुंभलगड चा आणि माउंट अबू हून निघून कुंभलगड कडे कूच केले

अरवली पर्वत रांगेतील माउंट अबू पेक्षा कमी दुसरे उंच ठिकाण .. एक फार छान वाटले या राणा कुंभ राजे महाराजे यांचे की आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्यासारखे प्रचंड फसवे असणारे असे स्थान … आत कुठून जायचे हेच न कळणारे … एक तर जवळ जाई पर्यंत हा किल्ला दिसतच नाही आणि जेव्हा दिसतो तेव्हा त्याचे उत्तुंग चित्र डोळ्यात भरते … खरोखर अभेद्य असा आहे हा कुंभलगड ,, ९ मे १५४० रोजी महाराणा उदय सिंह दुसरे , यांचा प्रतापी पुत्र राणा प्रताप यांचा जन्म इथेच झाला

उदयपुर म्हणजे दक्षिण राजस्थन्मांजे मेवाड (सिसोदिया) आणि माउंट अबू जोधपूर राजसमंद जिल्हा हा मारवाड. (राठोड) .. असे रुलर होते इथे …

कुंभलगड ची तटबंदी ही ३६ किमी अंतराची आहे … खूप ठिकाणी आपण जाऊ शकतच नाही . Great Wall of china नंतर ची सर्वात मोठी भिंत हीच याला great Wall of India पण म्हणतात … कुंभलगड युनेस्को साईट आहे भारताचा झेंडा इथे काय फडकत असतो …. strongest defence आणि निवाडलेली isolated जागा हे कुंभलगड चे वैशिष्ठ्य … अरेट पोल, हनुमान पोल, राम पोल विजय पोल निंबू पोल, पगरा पोल , and Top खाना पोल . असे सात दरवाजे आहेत या गडाला .. सिक्युरिटी एकदम कडक असणार त्या वेळी या गेट मधून पास होणे सोपे नाही .. घोडे हत्ती जाऊ शकतील असे रस्ते आहेत आत

तेरा पर्वत क्रॉस करून मगच कुंभलगड दिसतो इतका छान लपावलेले स्थान आहे हे .. जवळ जाई पर्यंत दिसत पण नाही

पूर्ण किल्ला बघायला दोन तीन तास लागले नंतर सफारी मधून n जाता आम्ही almost ९० टक्के जागा पाहील्या फार सुंदर maintain केला आहे हा किल्ला …

सर्वात उंच बादल महाल चारही बाजूंचा सुपर view रात्री लाईट अँड साउंड शो मधून ही सर्व माहिती कळते RTDC चा शो असतो हा .. दररोज ५००/ १००० लोक आणि ३०० / ४०० गाड्या असतात … मग रस्त्याच्या कामामुळे उदयपुर चा ट्रॅफिक जॅम करतात सर्व …आणि पोचायला उशीर होतो

पण वर्थ seeing … Super place कुंभलगड … एक आत्मीयता आहे राणा प्रताप यांच्या बद्दल .. शौर्य पराक्रम नेतृत्व गाजवणाऱ्या एका राजाची कहाणी आपण वाचली ऐकली असणारच

वाटेत
परशुराम महादेव स्थान म्हणजे जबरदस्त च् … पाचशे पायऱ्या चढून उतरून जावे लागते पण जरूर जावे असे ठिकाण … बरोब्बर म्हणजे इतकी बरोब्बर म्हणण्या इतकी ४००० फूट उंची
परशुरामांनी साधनेने महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्या साठी आपल्या परशू ने कापून तयार केलेली ही गुहा .. है स्थान …इथे शिवलिंग छिद्र असलेले आहे आणि त्यात कितीही आणि काहीही समावले जाते

४० मिनिटांचा लाईट साउंड शो म्हणजे आख्खा इतिहास पराक्रम , बुद्धिमत्ता आणि कौशल्य सांगणारा शो अत्यंत सुंदर आणि must see

ते सर्व करून आम्ही आता उदयपुर ला आलो … पूर्ण दमून पण पूर्ण समाधानाने आणि आपण काही तरी भूतकाळातील एक अदभूत जागा बघून आलो याची जाणीव घेऊन आले

जबरदस्त दिवस शौर्य पराक्रम बुद्धिमत्ता नेतृत्व समजून घेऊन आज उदयपुर ला आलो राहिलो नाही कुंभल गड ला

येताना मात्र दम निघाला .. प्रचंड खराब रस्ता … काळोख आणि एक लेन काम सुरू आहे .. ट्रॅफिक पण खूप आणि येता येता भारीच भूक लागली . चेक इन करण्या आधी जेवून च् घेतले आणि मग चेक इन …RTDC कजरी फार च् छान आहे … रूम पण मस्त वेल appointed आणि सर्व सुविधा असणारी , हॉटेल एकदम सेंट्रल लोकेशन .. शास्त्री सर्कल

आता दोन दिवस उदयपुर स्थायिक

आज सकाळी आरामात आवरून निघालो ते
नाथद्वारा ला.. फक्त एक तास .. उदयपुर हून …..कृष्ण , श्रीनाथजी , सावरीया अशी सर्व नावे असलेल्या श्रीकृष्णाचे है मंदिर असलेले स्थान

औरंगजेब जेव्हा सर्व मूर्ती भंग करत चालला होता त्या वेळी 1672 मध्ये राणा राज सिंग यांनी श्रीनाथजिंची मूर्ती वेगळ्या ठिकाणी नेत असताना रथाचे चाक जिथे रुतले आणि तिथेच अडकले ती ही जागा … श्रीनाथ जींची इच्छा समजून त्यांनी तिथे च् मंदिर बांधून घेतले..

एकाच काळया स्टोन मधील ही सुंदर मूर्ती दोन गायी ,सर्प , सिंह आणि दोन मोर आणि पोपट असे सर्व या मूर्ती च्या च कपाळावर आहेत

पेड लाईन मधून दर्शन .. अगदी पहिल्या रांगेतून आणि सर्वात जवळून … पायावर डोके ठेवायला मिळणे कठीण काम तरी आम्हाला या लाईन मुळे ते करता आले .. इथली गर्दी भारी , पुरोहित आणि सेवेकरी म्हणजे काय विचारू नका, सुदर्शन चहा मिळतो इथे . बघितला पिऊन .. पण गोल फिरायला नाही होत

नाथद्वारा पाहून आम्ही निघालो हल्दी घाटी ला … जबरदस्त जागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे घडलेली युद्धाची घटना आणि त्याचे चित्रीकरण आणि scene creation .. just solid

अकबर सेनेला जोरदार विरोध करण्यासाठी भिल्ल राणा आदिवासी सेना महाराणा प्रताप यांनी तय्यार केली
काय गंमत असते बघा अकबराने राणा मानसिंह यांना सेनापती म्हणून पाठवले आणि महाराणा प्रताप यांच्या मदतीला धावून आला तो अफगाण हकीम खानसोर.. देशप्रेम आणि व्यक्ती निष्ठा . स्वार्थ आणि हाव . दोन्ही ची उदाहरणे इथेच

प्रचंड मोठी लढाई होती ही हल्दी घाटी ची .. पण एकाच दिवसाची महाराणा प्रताप यांच्या भिल्ल राणा आदिवासी सेना आणि त्यांचे सैनिक यांनी गनिमी काव्याने युद्ध लढत राजा मानसिंग आणि अकबर यांच्या सेनेला तिथून पळवून तीन किलोमिटर मागे खमनोर गावी ढकलले .. दुसरी लढाई तिथे च् झाली आणि दोन्ही बाजूचे मिळून 18000 सैनिक योद्धा मारले गेले.. त्याच दिवशी प्रचंड जोरदार पाऊस झाला आणि या सर्वांचे रक्त वाहून जात असलेली ती जागा म्हणजे आजचे गाव रक्त्त तलाई… आज तिथे एका बागेत सर्व सैनिकांचे स्मारक आहे..

हल्दी घाटी मध्ये अकबर -राणा मानसिंह यांचे सैन्य विजयी होणार असे दिसत असताना महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यावर स्वार होऊन केलेला मानसिंह वरचा सरळसोट हल्ला . भाल्याने वार करत राणा प्रताप यांनी या लढाईत केलेला हा उलटफेर .. या हल्ल्याने सर्व उलटफेर झाला आणि राणा प्रताप यांच्या सैन्याने त्या नंतर अकबराच्या सैन्याला पळवून लावले. याच हल्यात चेतक च्या पायाला तलवार लागून पाय कापला गेला … राणाप्रताप यांचा भाऊ मानं सिंह यांनी राणा प्रताप यांना तिथून बाहेर काढले आणि चेतक ने त्यांना 22फूट उडी मारून ओढ्याच्या पलीकडच्या काठावर नेले आणि तो पडला खाली तो कायमचा … तिथेच त्याची समाधी आहे …

राणा प्रताप यांची अकबरा समोर मान n झुकावता त्याला तोंड द्यायला तयारी केली सैन्य तय्यार करण्यासाठी .. तो पर्यंत गादी वर झोपणे , झाडाच्या पानावर च् जेवण आणि सिंहासनावर बसणे नाही … 21 वर्ष गेली यात … पण मेवाड रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी हे करून हा प्रांत पूर्ण सुरक्षित केला आणि अकबर सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले..

, 19 जानेवारी 1557 रोजी महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाल्यावर
अकबर याने केलेल्या आक्रमणा मुळे
राजपूत स्त्रियांनी तीन वेळा केलेला जोहार ऐकून काटा आला अंगावर… १६००० स्त्रिया .. १३००० स्त्रिया आणि नंतर ६००० … केवळ निशब्द च्

पराक्रम , प्रेम आणि त्याग याचा परमोच्च बिंदू आहे इथेच पाहायला मिळतो.

प्रचंड इच्छा शक्ती , पराक्रम , बुद्धिमत्ता आणि कौशल्य आणि मुत्सद्दी नेता … महाराणा प्रताप… ते दर्शन आणि तो इतिहास आम्ही धन्य झालो

महाराणा प्रताप यांच्या नावे एक म्युझियम पण आता या सर्व गोष्टी सांगितल्या समजल्या पाहिजेत या साठी प्रयत्नशील आहे …

त्याच हल्दी घाटी ची पवित्र माती आम्ही घेतली

हल्दी घाटी मध्ये पांढरी गुलाबाची फुले सीझन मध्ये असतात .. त्या पासून बनवलेली काही औषधी , गुणधर्म असलेल्या गोष्टी ही घेतल्या.

संध्याकाळी बाकी उदयपुर फिरून ( जे सर्व पाहतात ) मग फतेह लेक , सहेलियोंकी बाडी आणि नंतर जगदिंश्र्वराची आरती … फारच सुंदर दिवस… कृष्ण दर्शन , राणा प्रताप यांचा इतिहास आणि नंतर त्यांच्या पुढच्या पिढी मधील राणा उदय सिंह यांनी तयार केलेले हे उदयपुर ….

छान आहे टाउन आता खूप मोठे झाले आहे … लेक तर बरेच आहेत . मंदिरे खूप … आज हाथी पोल म्हणून एका जुन्या उदयपुर मधील मार्केट ला ही भेट दिली .. आर्ट . आणि राजस्थान…

आज उदयपुर हुंन सकाळी लवकर निघून चितोडगढ.. पाहायला आलो…दोन तासाचा कार चा प्रवास आणि चितोड गड शहरात आलो … किल्ला दोन किमी लांब आणि थोडा वर आहे.
सात दार क्रॉस करून किल्यावर पोहोचलो.

किल्याच्या सुरूवातीलाच भवानी माता मंदिर पाहून मन प्रसन्न झाले.

आशिया खंडातील सर्वात मोठा किल्ला मंदिरे राजवाडे आणि स्तंभ आणि 5000 माणसे राहत असलेला किल्ला
53 वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी येथे राज्य केले आणि हा संपूर्ण किल्ला घडवला
म्हणून येथे वेगळेवल्या शैली आढळतात
इथे

सर्वात जास्त fierse फाईट इथेच झाल्या आहेत या किल्यावर तीन आक्रमणे समोरून झाली तर 27 मागच्या बाजूने … कुंभकर्ण डोंगर आहे तिथे एक त्या मागे खिलजी सहा महिने तळ टाकून बसला होता राणी पद्मिनी साठी

राणा राजे कुंभ यांनी कुंभ शाम म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मा विष्णु महेश मंदिर आणि मीरा मंदिर मंदिर बांधले
युद्धाच्या विजयाचा विजय स्तंभ ही तिथेच आहे

तीन जोहर पाहिले आहेत या किल्याने .. पाहिले 1303 खिलजी वेळी 18000
दुसरा बहादुर शाह वेळी 1528 ,13000
तिसरे अकबर वेळी 1567. 9000
आता इथे संपूर्ण जागा भरून काढली आहे आणि त्या वर लॉन केले आहे … सांगतांना गाईड पण सांगतात की इथे आत जाऊ नका.. तरी काही सेल्फी वाले ………….. Tragic …..खूप आहे बघायला किल्यात … खूप सोसले आहे ह्या किल्यां ने . कित्येक शाबूत आणि तोडलेल्या अवशेष सकट अजून मंदिरे , 84 तलाव आणि राजवाडे

गुजरात ..आणि राजस्थान फार छान आहे .. गांधी नगर , नडाबेट भारत पाकिस्तान बॉर्डर , माउंट अबू , कुंभलगड, जैसलमेर , साम , सुडासुरी खुरी , जोधपूर , उदयपुर नाथद्वरा, हल्दी घाटी आणि चितोड गड …. जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत …

जयपूर बिकानेर पुष्कर पुढच्या वेळी वाघा बॉर्डर सोबत ..

आज चितोड गड पाहून राजस्थान सोडून मध्य प्रदेश मध्ये आलो , मोठा प्रवास … उज्जैन महाकालेश्वर .. उद्या सांगतो त्या बद्दल

 

महाकालेश्र्वर…उज्जैन
सकाळी दर्शन ..

सकाळची भस्मारती साठी चे दर्शन रात्री बारा नंतर लाईन सुरू होतेच
आदल्या रात्री चे दर्शन 11.30 नंतर संपते .. प्रचंड गर्दी सुट्टी असल्याने … साध्या लाईन मधून दर्शन घेतले.. स्वयंभू दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग
प्रचंड मोठे कॉम्प्लेक्स आहे .. मराठा शासक यांनी माळवा प्रांत ताब्यात घेतला तेव्हा आणि , इतर राजे आणि राजा भोज यांनी या मंदिराचे व्यवस्थापन आणि वाढ वेळो वेळी केली आणि पूर्व गौरव पुन्हा प्रस्थापित केला … त्या वेळी उज्जैन शहर माळवा प्रांताची राजधानी होती
मंदिराच्या 118 शिखरांवर 16 किलो सोन्याचा मुलामा आहे ..1980 नंतर बिर्ला समूहाने सभा मंडप तय्यार करून एक प्रशासकीय समिती आता त्याचे पूर्ण
काम बघत आहे

याबद्दल सर्वांना बरीच माहिती आहेच त्यामुळे बाकी माहिती देतो

संदीपनी ऋषी आश्रम आणि वेद शाळा
श्री कृष्ण बलराम आणि सुदामा यांची शाळा 14 विद्या शिकलेले हे तिन्ही संदीपनी

पुराण
मीमांसा लॉजिक तर्क
कल्प धर्म शास्त्र
निरुक्त
ज्योतिष
व्याकरण
छंद शास्त्र
शिक्षण
आयुर्वेद प्रधान
संगीत प्रधान
यज्ञ प्रधान

अश्या 14 विद्या शिकेलेले बलराम सुदामा आणि श्री कृष्ण

84 बैठक पण आहेत, वल्लभाचार्य यांच्या. भारत भर जिथे जिथे स्थाने आहेत ती ही 84 जागा. त्यांनाच बैठक म्हणतात

चित्रगुप्त मंदिर , अकृरेश्वर महादेव , राम जानकी मंदिर , कुसुमेश्वर महादेव विष्णुजनार्दन मंदिर अशी अत्यंत प्राचीन मंदिरे पण आहेत

चित्रगुप्ता ला आपले सर्वांचे अकाउंट नीट ठेवायला डेबिट क्रेडिट साठी सांगून आलो…

आणि उज्जैन मध्ये कोअर गावात स्कूटर ,बाईक च् जातील असे लहान रस्ते आहेत आणि प्रचंड गर्दी ज्योतिर्लिंग मंदिरे असल्यामुळे .. आम्ही e रिक्षा ने गेलो आणि मकर संक्रांत असल्याने शेकडो दुकाने पतंगाची लागली होती आणि त्यातून हजारो लोक पतंग मांजा फिरक्या खरेदी करत होते .. प्रचंड हॉर्न बाजी चालते इथे एकाने वाजवले की दुसरा तिसरा आणि एकदम कल्लोळ होतो. आणि मग जॅम पण आणि समोरून पण horns … काही स्कूटर अगदी रिक्षा च्याच बाजूला येऊन जोरात हॉर्न वाजवून जायला रस्ता द्या म्हणून चलो चलो तोंडाने ही ओरडायचे..

E रिक्षा चालक एकदम skilled. त्याची गाडी कुणालाही लागली नाही का त्याला एकही गाडी टच नाही केली

आपल्या पुण्याहून भयानक प्रकारे गाड्या चालवतात इथे

आज उज्जैन पाहून इंदोर ला मुक्काम करणार

पुण्यात 14 तारखेला आमच्या कॉलनीत राम मंदिरात समारंभ सुरू होणार होता अयोध्याहून त्याच्या बोलावण्याच्या अक्षता आल्या होत्याच , इंदूर मुक्कामात एका अत्यंत जवळच्या अश्या आप्तेष्टांकडे गेलो तर तिथे ही राम मंदिरात राम लल्ला स्थापनेच्या मुहूर्ताच्या बोलवण्याच्या अक्षता पुन्हा एकदा मिळाल्या … योगायोग च् की आम्ही त्याच वेळी त्यांच्याकडे होतो

दुसऱ्या दिवशी इंदूर राजवाडा , खजराणा गणेश मंदिर बडा गणपती काच महाल मंदिर लालबाग वगैरे std tourist place बघून दुपारी कमी जेऊन रात्री इंदूर च्या सराफा बाजारावर डल्ला मारायला गेलो …..😊

सराफा बाजार .. ट्रेडिशनल ओल्ड प्लेस .. राजवाडा आहे ना त्याच्या बाजूची एक ६०० ७०० मीटर ची गल्ली .. संपूर्ण दुकाने फक्त सोन्याची .. पूर्वी चोऱ्या लूट डाका असे प्रकार इथे खूप व्हायचे त्या मुळे सराफ लोकांनी एक शक्कल लढवली… दिवसा तर गजबज असतेच … रात्री पहारा देण्या ऐवजी त्यांनी त्यांच्या दुकाना समोर खाण्याच्या वस्तूंची दुकाने लावायला दिली … आणि बघता बघता सराफा बाजार खाऊ गल्ली म्हणून जग प्रसिद्ध झाली .. दिवसा गजबज आणि रात्री खाण्यासाठी झुंबड .. आख्खा एरिया एकदम सेफ झाला आणि दिवस रात्र गजबज वर्दळ त्यामुळे एकदम सुरक्षित.. रात्री नऊ पर्यंत सराफा बाजार बंद होतो आणि ही दुकाने त्या च् नंतर लगेच लागतात आणि ती बंद होतात सकाळी सहा नंतर … ते लोक रोज दुकानाचे सर्व सामान आणतात नेतात म्हणजे नुसते खाण्यापिण्याचे नाही तर आख्खे दुकान .. स्टील स्ट्रक्चर कढया , gas stove , स्टॉल भांडी आणि रोज लागणारे सर्व l५०० पेक्षा जास्त खाण्यापिण्याची दुकाने ..(सर्व च्या सर्व केवळ व्हेज)) त्या गल्लीत लागली आहेत आणि लोक ही रात्री दहा नंतरच येतात ते पहाटे चहा पिऊन च् घरी जातात .. प्रचंड गर्दी .. आणि गोंगाट प्रत्येक स्टॉल वरची लोक ही ओरडून ओरडून बोलावत असतात … इतक्या व्हरायटी आहेत खायला की आठ दिवस आणि रोज सात आठ गोष्टी खायला असे equation जमू शकेल संपूर्ण गल्ली बोळात टेस्ट करून घ्यायला ..

जगात भारी इंदूर ची ही खाऊ गल्ली

आता एक नवीन थोडी पॉश खाऊ गल्ली तयार झाली आहे ५६ दुकान एरिया नावाची आहे चांगली ती ही … पण ती ओरिजनल खाऊ गल्ली नाही .. गर्दी आणि सोय बघता तय्यार झालेली नवीन. खाऊ गल्ली तिथे आता मॅगी मोमो चायनिज , पनीर टिक्का तत्सम आणि आजचे snacks पिझ्झा बर्गर पण मिळतो.. त्यात काही मज्जा नाही

इंदूर ची मज्जा जुन्या जाणत्या सराफा बाजारातल्या खाऊ गल्लीतच्

ताव मारला असा ……
पाणीपुरी 12 फ्लेवर च्या . पुदिना , regular , लसूण , लिंबू , कैरी चिंच आणि काय काय होते फ्लेवर … यानेच पोट अर्धे भरते

खिचडी वर वेफर, फराळी चिवडा आणि दही

गराडू ( आपल्या सुरणासारखे कंद) तळलेले गरम गरम

कांजी वडा उडीद वडा आणि फेटून चढवलेली मोहरी .. मेंदू जागृत करणारी असते ही .. सणक डायरेक्ट मोठा छोटा असलेला नसलेला मेंदू जागृत करते

दही भल्ला खाण्या आधी ..करण्याची पद्धत च् पाहत राहावी आणि खातांना ही मजा घ्यावी अशी भन्नाट चव

जिलबी आपल्या समोर गरम गरम साजूक तुपात तळून मग पाकात पूर्ण बुडवून ठेवून आपल्याला ताटली त देतात खायला … जिलबी ची साईझ आपल्या आठ इंच पिझ्झा इतकी .. आणि गरम गरम रस आत मध्ये इतका मस्त मुरलेला असतो की खातांना गरम लागले तरी आपण अजून अजून खातो

कोकोनट क्रश हे तर इथे भारी करतात.. शहाळे उडवून उडवून खाली टेबलावर आणून सोलतात .. त्याचे पाणी डायरेक्ट मिक्सर मध्ये आणि त्या वर आतले शहाळे नारळ अक्षरशः अर्पण करतात … थोडे थंड जास्त चांगले लागते .. थोडी साखर आणि मिक्सर मध्ये दोन तीन वेळा गुरररर , गुरररर केले की डायरेक्ट आपल्या ग्लासात.. ग्लास हातात येई पर्यंत पुढचे दोन तीन शहाळे फोडतांना आपल्याला त्या तून उडालेल्या शहाळ्याच्या पाण्याची उद्धोदक स्नान झालेले असते च्. लक असेल तर नारळ पण कुठे तरी कपड्यावर चेहेऱ्यावर आपटून गेलेला असतो .. चव म्हणजे भन्नाट .. पृथ्वीवरचे आणि स्पेसिफिकली इंदूर चे अमृत च्

मग स्मोक पान म्हणजे सगळे कसे स्वर्गा त च् असल्या सारखे वाटते , तो वर थंडी ची जाणीव व्हायला लागते आणि रात्री एक ला आम्ही परत आलो

आणि त्या नंतर थोडे उशिरा उठून आवरून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.. वाटेत अत्यंत सुंदर आणि एक ब्राह्मण म्हणून मला अत्यंत गर्वच असेलेले है स्थान … जानापाव … आठ अवतरांपैकी एकमेव ब्राह्मण अवतार ,, भगवान श्री परशुराम यांचे जन्म स्थान
परशुराम कुटी या नावाने प्रसिद्ध असलेली ही जागा श्री परशुराम …ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे चिरंजीव.. उंच डोंगरावर जंगलात ही जागा आहे.. मध्य प्रदेश सरकार ने इथे मोठे मंदिर उभारले आहे आणि संपूर्ण वास्तू आणि परिसर पूर्ण कायापालट करण्याचे प्लॅन तिथे दाखवले आहेत.. प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता असलेली ही जागा .. माझा साष्टांग नमस्कार ….

आणि finally आज डहाणूकर च्या धावपट्टी वर विमान उतरून इंद्र नगरी च्या हैंगर मध्ये विसावले

4227 किमी 12 दिवस आणि 20.8 चे avg असा हा हायवे , संपूर्ण दलदल असेलेल नदाबेट च खारा हवा असलेला रस्ता , राजस्थानी रेगीस्तान चे सुसाट हायवे. अरवली पर्वत रांगा. डर्ट ट्रॅक खुरी साम डेझर्ट ला जाण्याचा , राजस्थान मध्ये चार बोगदे आहेत फक्त आणि आम्ही त्या चारही मधून एकदा तरी गेलोच … हल्दी घाटी कुंभल गडाचा चढ , चितोड गडाची ऐतिहासिक सफर
माउंट अबू ची सुंदर वळणे आणि उंच असेलेलं गुरुशिखर एमपी मधील ही रस्ते भारीच इंदोर उज्जैन मस्त निवांत शहरे … आणि मग पुण्याचा MH मधला प्रवास करत आज या प्रवास यज्ञाची सांगता करत आहे

 

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}