वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सकारात्मक कसे रहावे? – १………… विभावरी कुलकर्णी, पुणे.

सकारात्मक कसे रहावे? – १

हा प्रश्न बरेचदा विचारला जातो.सगळीकडे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात.वेगवेगळी टेन्शन्स असतात. मग तेच विचार मनात येत राहणार. सतत घोटाळत राहणार.
आपण एक उदाहरण बघू. समजा घरातील कोणाला काही प्रॉब्लेम आहे. असे समजू कोणी व्यक्ती आजारी आहे. अशा वेळी डॉक्टर, दवाखाना,औषधे,भेटायला येणारे असे वातावरण असते. भेटायला येणारे पण सतत तेच विषय बोलतात.किंवा आपल्या अनुभवाने ( अर्थात नकारात्मक ) त्यात भर घालतात. कोणी बरे झाले आहे सांगण्याच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीला या आजारामुळे कसा त्रास झाला,किंवा त्यात त्या व्यक्तीचे निधन कसे झाले हे सांगतात. त्यामुळे त्याच विचारांची स्पंदने तयार होतात. आणि तिच स्पंदने वातावरणात पसरतात. तिच स्पंदने आपल्या शरीरातून पण बाहेर पडतात. आणि तिच स्पंदने आपल्या शरीरात जातात. स्वयंपाक करताना तेच विचार मनात घेऊन अन्न शिजवले जाते. आणि तेच संस्कार अन्नावर होतात.व तेच अन्न पोटात जाते.व तेच नकारात्मक विचार पक्के होतात.आणि तसेच परिणाम समोर येतात. अगदी ती नकारात्मक स्पंदने औषधावर पण परिणाम करतात. आणि औषधांचा परिणाम व्हायला वेळ लागतो.

या साठी पुढील काही गोष्टी आपण करु शकतो.
आपला दिवस सकारात्मक स्वसंवादाने सुरु करायचा.

▪️ मला आजचा दिवस दाखवला त्या बद्दल मी आभारी आहे. आणि आनंदी आहे.
▪️ मी सुखरूप आहे.
▪️ मी आनंदी आहे.
▪️ आजचा दिवस आनंदी आहे.
▪️ निसर्ग,ब्रह्मांड मला मदत करत आहे.
▪️ घरातील सगळे सुखी व आनंदी आहेत.
▪️ आम्ही सगळे निरोगी आहोत.
▪️ जी समस्या असेल ती दूर झाली आहे. ( उदाहरण म्हणून आपण घरातील आजारी व्यकीचे बघू. घरातील आजारी व्यक्ती आजारमुक्त झाली आहे. निरोगी आहे. )

अशा प्रकारे दिवसाची सुरुवात सकारात्मक स्वसंवादाने करावी. म्हणजे त्याच विचारांची स्पंदने पसरतात. घरात वावरताना कामे करताना,स्वयंपाक करताना असेच विचार मनात ठेवावेत. म्हणजे ते सगळ्यांवर परिणाम करतात. म्हणून तर आपण लवकर उठून देवपूजा,जप,पोथी वाचन,मंत्रोच्चारण करतो. त्याची स्पंदने घरात निर्माण होतात.
काहींना प्रश्न असतो हे किती दिवस करायचे?
जो पर्यंत आपल्याला आपले दिवस आनंदी,सकारात्मक असावे असे वाटते तो पर्यंत असे विचार करायचे.थोडक्यात हे सकारात्मक स्वसंवाद करण्याची सवय लावून घ्यायची.
धन्यवाद!

🖊️ विभावरी कुलकर्णी, पुणे.
१/१२/२०२३
📱८०८७८१०१९७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}