Classified

कुर्ग ट्रीप ……… स्मिता देशमुख.

कुर्ग ट्रीप

वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे निरीक्षण करायला मला फार आवडतं,आणि क्षेत्र म्हणजे भलेमोठी कामं करणारी नाहीत बरं का…अगदी सर्वसामान्य माणसं जी अगदी सहज नजरेस पडतात त्यांना भेटायला ,बघायला prior appointment ची गरज नसते सहज पणे रस्त्यावर, छोट्याश्या दुकानात, रस्त्यालगच्या टपरीवर मंदिराबाहेरील पुजा साहित्याच्या दुकानात, रीक्षावाले टॅक्सीवाले हाॅटेलमधे काम करणारे…अशी कितीतरी माणसं आपल्याभोवती असतात,ती माणसं नेहमीच खरा चेहरा घेऊन जगत असतात कारण त्यांचे कामाचे ठीकाण हेच त्यांचे छोटेसे जग असते आणि तीथे ते अगदी मान मोडून काम करत असतात, बाहेरील कृत्रिम जगाशी त्यांचा काही संबंध नसतो त्यामुळे मुखवटे ओढून जगणाऱ्या लोकांच्या दुनियेचा खोटेपणा त्यांच्यात नसतो चार पैसे मिळविणे आणि आपल्या आयुष्याचा गाडा रेटणे हेच त्यांचे ध्येय असते…परप्रातातुन आलेल्यांच्या डोळ्यासमोर तर सतत आपले घरदार कुटुंबातील माणसे त्यांच्या अडचणी हेच चित्र असते त्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरुन गावाकडे जास्तीत जास्त पैसे कसे पाठवता येतील या विचारातच त्यांचे आयुष्य खर्ची पडत असते अगदी प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जी लोकं घरदार सोडून येतात त्यांना मुखवटे ओढून वावरणाऱ्यांच्या दुनियेचे चोचले परवडणारे नसतात म्हणूनच ती माणसं ‘वाचणं’ फार काही शिकवून जातं आपल्याला,त्यात लपवाछपवी अजिबात नसते.जे जसं आयुष्य पुढ्यात आलेलं आहे अडीअडचणींनी भरलेलं त्यातुन आपापल्यापरीने मार्ग काढून ते जगत असतात,त्यांनी निवडलेले मार्ग इतके व्यवहारी असतात त्यात भावनांना थारा नसतो,अहंम कशाशी खातात हे तर त्यांना माहितीच नसतं आणि त्यांनी निवडलेले मार्गच आपल्याला खूप काही शिकवतात,सगळ्यात मोठा फरक म्हणजे,आपण सतत एक सुरक्ष कवच घेऊनच फीरत असतो आपल्याबरोबर आणि त्यांच्या आयुष्यात,सुरक्षीतता,स्थीरता या गोष्टी अगदीच नगण्य असतात अश्या परिस्थितीत देखील त्यांच्यातील माणुसकी ,कामाशी त्यांची बांधिलकी बघितल्यावर आपण विचार करायला प्रवृत्त होतो खरंच एक सर्वसाधारण माणुस किती माणुसकी ने वागु शकतो, त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी जीथे तो काम करत असतो,आपल्याकडून जास्तीतजास्त आनंद देण्याच्या ,घेण्याच्या प्रयत्नात असतो तो…
आपले काम आनंदाने करणे आणि इतरांनाही आनंद देणे…आजकाल ५ आकडी पैसे कमावणारे तर हा आनंद गमावूनच बसले आहेत.
यावेळेला कुर्ग ट्रीप वर गेलो असताना खुप लोकं भेटली अशी…भाषेचा बरेचदा प्रश्न येत होता तरीही आम्ही एकमेकांशी संवाद साधत होतो कधी खाणाखुणा, हातवारे,…कसं का होईना पण बोलत मात्र होतो…
यात काही माणसं खूपच लक्षात राहिली त्यांच्याच बाबतीत आज काही लिहीण्याचा प्रयत्न…
माडेकरी मधे एका रेस्टॉरंट मधे एक टेबल साफ करणारा मुलगा भेटला ,तो आमच्याशी चक्क मराठीत बोलायला लागला तर खूपच आश्चर्य वाटले,त्याला विचारले तर म्हणाला मी पण मराठीच, कोल्हापूरचा तुम्हाला मराठीत बोलताना ऐकलं…आता १०वी ची परीक्षा दिली…११ वी ला अडमिशन घ्यायची आहे तर पैसे जमवतो आहे,सुट्या आहेत ना सध्या मग उगाच घरी बसण्यापेक्षा ईथे आलो कामाला, एकटाच राहतोस का रे मी विचारलं तर म्हणाला मोठा भाऊ आहे इथे तर मी पण आलोय,पण परत जाणार काॅलेज सुरू झालं कि…आमचा अकरा जणांचा मोठा गृप होता,त्यामुळे मेन्यू कार्ड बघून प्रत्येकाची आवडनिवड बघून आर्डर place करायला वेळ लागायचा आणि अगदी अडीच वर्षांच्या नातीपासून ६५ वर्षांचे आजोबा असा गृप…लोकांना पण आमचा मोठ्ठा गृप बघून गंमत वाटायची…त्याच ठिकाणी एक वेटर भेटला त्याला काहीही मागितलं तर तो आधी नाहीये अशी नकारार्थी मान हलवायचा,आणि ठीक आहे जाऊ दे म्हटलं कि हळूच तो पदार्थ म्हणा,एखादी वस्तु (काटा,चमचा,वाटी ग्लास)आपल्यासमोर धरत असे…आणि अरे है क्या ये आपके पास असं म्हणुन आपण हसलो ना कि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जे समाधानाचं हसु खेळायचं ना,त्याला तोड नाही,त्याची ही लोकांशी संवाद साधण्याची पध्दत होती…कारण भाषेचा प्राॅब्लेम…प्रत्येक टेबलशी जाऊन तो याच पध्दतीने लोकांची मनं जिंकत होता…आपल्याला नेमून दिलेल्या कामाचा आनंद घेणे आणि लोकांना आनंद देणे…किती प्रामाणिकपणा आपल्या कामाशी…म्हणूनच आज मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले ना…तो त्याच्या या कामात पूर्णपणे सफल झालेला आहे…खंत हीच कि हे त्यांच्यापर्यंत मी पोहचवु शकत नाही.
तसेच कर्नाटकच्या सीमेवरील एक गांव आणि रस्त्यावर जागोजागी उघडलेली छोटीछोटी हाॅटेल्स्…आणि ते चालवणाऱ्या बायका…पुन्हा तेच भाषेचा प्राॅब्लेम…पण त्यांची एक नविनच पध्दत गिर्हाईक आपल्याकडे वळवण्याची…स्वतःच्या हॅटेलचे नांव ईंग्रजिमधे लिहीलेला असा एक फलक घेऊन त्या अगदी प्रत्येक वाहनासमोर बेधडक ऊभ्या राहात आणि वाहनाला पार्किंगसाठी जागा दाखवत गिर्हाईकाला आपल्या होटल मधे येण्याची विनंती करतात अगदी गोड हसून..पार्कीगजवळच एका मोठ्या बोर्डवर Today’s Menu लिहीलेला, त्याकडे बोट दाखवत आपल्याला आत या असं खुणावतात,तिथे मांडलेली हिरवीगार केळीची पाने त्यावर वाढलेले रुचकर कर्नाटकी जेवण,ऊद्बत्यांचा सुवास…जठराग्नी प्रज्वलीत झाल्याशिवाय रहात नाही आपण पण हस्तप्रक्षालन अशी खुण करुन विचारले,कि ती पण आपल्याला Handwash असा बोर्ड दाखवते आणि हात धुतल्यावर जरा मागे डोकावलं कि दिसणारी त्यांची परसबाग…नारळीपोफळीची झाडं…अहाहा…निसर्गाच्या कुशीत भोजनानंद…आपण स्थानापन्न झाल्यावर मग ती सुत्रे दुसऱ्यांच्या हातात सोपवून पून्हा नविन गिर्हाईक आपल्याकडे वळवण्यासाठी हातात फलक घेऊन रस्त्यावर पून्हा तय्यार…आणि यात फक्त तीच्या चेहऱ्यावरील हसु हाच संवाद…शब्दांची गरजच नाही…प्रत्येक वेळा या खेळात ती सफल होतेच असं नाही…काही वाहनं न थांबता पुढेही निघून जातात…पण हीच्या चेहऱ्यावरील हसु कधीच मावळत नाही… आपली पोटपूजा आटोपून आपण बाहेर आलो कि तेवढ्याच अगत्याने आवडलं का जेवण? पोटभर जेवलात ना? यासाठी पण तीच्याजवळ एक ठेवणीतलं हसु…नकळत आपणही तीच्या मुक संवादात (मुक तरी कसा म्हणावा, इतका तो बोलका असतो)आपले हसु मिसळून पुढच्या प्रवासासाठी ताजेतवाने होतो.
मंदीराच्या बाहेर पादत्राणे सांभाळणारा… मंदीराच्या मागच्या बाजूला एक कोपरा दाखवतो,तीथून तुम्ही निसर्ग सौंदर्य बघा असं सांगतो.आणि आपण ते बघून आल्यावर पुन्हा शब्देविण संवादत…हसत…छान होता ना नजारा?
आपणही मान डोलावत दुजोरा द्यायचा…
तर अशी ही ठिकठिकाणी भेटलेली छोटी छोटी कामे करणारी पण माणुस म्हणून कितीतरी मोठी माणसे…आपल्याला जगण्याचं बळ देतात…महणूनच वाचत जावी नेहमीच अशी माणसे, जशी नजरेस पडतील तशी…निर्भेळ आनंद…

स्मिता देशमुख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}