ब्राह्मण क्रिकेट लिग २०२४ – सिझन १ T -20
पुण्यातील अतिशय हौशी आणि तडफदार तरुण मंडळींनी या वर्षी पहिल्यांदाच लेदर बॉल वर पहिली ब्राह्मण क्रिकेट लिग २०२४ – सिझन १ T -20 स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत एकूण १४० जणांनी रेजिस्ट्रेशन केले. IPL सारख्या फॉरमॅट मध्ये अनेक उत्साही मंडळींनी यावेळी ८ संघ विकत घेतले. वाशिष्ठि ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन, कृष्णा लिजेण्ड्स, ब्रह्मपुत्रा वॉरियर्स, मुठा सह्याद्री शिलेदार, बियास ब्रावोस, इंडस सुपरहिरोस, नर्मदा रायडर्स, कोयना किक अशा ८ संघांमध्ये एकूण १२० खेळाडूंची लिलाव प्रक्रिये मार्फत निवड करण्यात आली.
१३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान चालू असणारी ही लिग स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
मिहीर ओक व अभिषेक खांबेटे या दोघा फलंदाजानी वैयक्तिक शतके झळकावून या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आणि संजय इनामदार व श्रीपाद भागवत हे सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या शर्यतीत आहेत.
अतिशय मनोरंजक आणि स्पर्धात्मक होणाऱ्या या लिग सामन्यामधून आता बियास , ब्रावोस, कृष्णा लिजेण्ड्स, मुठा सह्याद्री शिलेदार आणि वाशिष्ठि ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन हे शेवटचे ४ संघ उपांत्य व बाद फेरीत दाखल झाले आहेत. उपांत्य व अंतिम फेरीचे सामने केसनंद येथे प्लॅटिनम क्रिकेट ग्राउंड येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी पार पडतील.