किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा
आयुष्यात यशस्वी होण्याची असंख्य कारणे असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द , आत्मविश्वास , चिकाटी , आवड , ज्ञान अश्या महत्वपूर्ण गोष्टीमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजा सहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक व्यक्तीला खडतर प्रवास करावाच लागतो. अर्थात, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्याची क्षमता त्या व्यक्ती मध्ये असायला हवी. यशाकडे वाटचाल करत असतांना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट पाहायला आणि अनुभवायला मिळते आणि ती म्हणजे कमतरता. आणि ही कमतरता नेहमी कष्ट, जिद्द किंवा आत्मविश्वास यांचाशीच निगडीत असते असे नाही. कधी कधी असंही होतं की सर्व व्यवस्थित चालू असूनही यश मिळण्याची खात्री मनाला वाटत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं आणि आपल्याला काय कमी पडतंय नेमकं हेच कळत नसतं. हळू हळू यशाकडे जाणारा मार्ग खडतर वाटू लागतो, मनातील आशाही मंदावतात आणि सगळ्याच गोष्टी अशक्य वाटू लागतात. आपल्या हाती फक्त अपयशच लागणार असं वाटू लागतं.
असं का होत असेल बरं ? आपण कुठे कमी पडतो का ? आपले प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वास ह्याची ताकद कमी होऊन जाते का ? की आपल्यात मुळात तेवढी क्षमताच नसते यशा पर्यंतची वाटचाल करण्याची ? प्रश्न अनेक पडतात पण उत्तर सापडत नाही. असा कटू अनुभव बहुतांशी लोकांच्या वाट्याला येतो आणि ते यशस्वी व्हायचे राहूनच जातात. मग, ही यशस्वी लोकं यश मिळवतात तरी कशी ? फार कुतूहल वाटतं ना?
पण यातच तर आपल्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. खरं तर यशाकडे जातानाचा प्रवास हा एकट्याने करायचाच नसतो. यशाची वाटचाल करताना सोबत ही हवीच. आणि सोबत अशी असावी जी नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील. प्रेरणा. ह्याच गोष्टीची कमतरता असते बहुतांशी लोकांकडे. बाकी सर्व गोष्टी असल्या मात्र यशापर्यंत जाण्याची प्रेरणाच मिळत नसेल तर सर्वच अशक्य वाटू लागते. म्हणूनच मनात आशेचा दिवा तेवत ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जवळ असणं फार महत्वाचं असतं. पण प्रेरणा मिळते कशी ? की ती घ्यावी लागते ? आता ही गोष्ट मात्र नशिबानेच घडते. प्रेरणा देणाऱ्या लोकांची साथ काहींना मिळते तर काहींना नाही मिळत. ज्यांना मिळते ते वाटचाल करत राहतात, ज्यांना मिळत नाही ते एक तर शोध घेतात किंवा थांबून जातात. खरं तर आपल्याला कोणीतरी प्रेरणा द्यावी, किंवा ती मिळावी अशी अपेक्षा करणे चुकीचे वाटते. प्रेरणा ही शोधली तर नक्कीच सापडते कारण जगात असंख्य गोष्टी आहेत ज्यांपासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.
ज्या पासून आपल्याला प्रेरणा मिळते त्याला म्हणतात प्रेरणास्थान. प्रेरणास्थान फक्त व्यक्तीच असते असे नाही तर ते काहीही असू शकते. सजीव, निर्जीव, व्यक्ती, निसर्ग, किंवा अशी कोणतीही गोष्ट जीच्याकडे पाहून आपल्याला नवीन उमेद मिळते, पुढे जाण्याची आणि यश मिळवण्याची. एखाद्यासाठी एखादं गाणं, तर एखाद्यासाठी एखादा चित्रपट प्रेरणादायी असू शकतो, एखाद्या साठी त्याचे आई, बाबा, मित्र प्रेरणादायी असू शकतात तर एखाद्यासाठी सकाळी बागेत फुलणारं फुलही प्रेरणादायी असू शकतं. काहींना बाहेरील गोष्टीकडून प्रेरणा मिळत नाही त्यामुळे ते स्वतः मध्ये प्रेरणा मिर्माण करतात आणि यशस्वी होऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात. प्रेरणा कुठून आणि कशा स्वरुपात मिळतेय हे महत्वाचं नसतं मात्र प्रेरणा मिळणं आणि मिळत राहणं फार महत्वाचं असतं.
सुंदर आयुष्य जगण्यासाठी पण प्रेरणा लागते. प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा. आयुष्य सुंदर आहे.
Credit goes to Writer 🌼🙏
✨परत येण्याची वेळ✨
आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास परत फिरण्याची तयारी सुरू करा आपल्याकडे असलेल्या जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते परत येणे कधीच सोपे नसते एक माणूस राजाकडे गेला म्हणाला मी गरीब आहे माझ्याकडे काहीही नाही मला मदतीची आवश्यकता आहे राजा दयाळू होता त्याने विचारले तुला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे माणूस म्हणाला कसायला थोडी जमीन द्या राजा म्हणाला उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये तु चालु शकशील धावु शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल परंतु लक्षात ठेव जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल अन्यथा काहीही मिळणार नाही माणूस खुष झाला तो सूर्योदय होताच पळायला लागला पळत राहीला सूर्य माथ्यावर चढला होता पण माणूस धावयचं थांबला नाही अजून थोडी मेहनत मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती.
संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं त्याला परत यावं लागेल नाहीतर त्याला काही मिळणार नाही त्याने पाहिले की तो खुप दूर आला आहे आता परत यायचे होते सूर्य पश्चिमेकडे वळला होता तो थकला होता. परत पोहोचायचे होते पण वेळ वेगाने निघुन जात होती अजून थोडी मेहनत न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं तो खाली पडला आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला राजा हे सर्व पहात होता तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला याला फक्त सात फुट जमीन हवी होती बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत ला ठेवून विचार करा आपण तीच चूक करीत नाही ना आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत.
आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही आणि जेव्हा आम्ही परत येण्याची तयारी करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो आजपर्यंत मी कुठे पोहचलो मला कुठे जायचे आहे मला किती दिवसात पोहोचायचे आहे जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नाही थोडं थांबा आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय.
किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा