डीव्हीडी कॉर्नर 30 Jan 2024 आजची खुश खबर योगिता गुर्जर , देवदत्त देशपांडे BUF Admins
डॉ विभा देशपांडे यांची अनोखी संकल्पना
योगिता गुर्जर
सुंदरा मना मध्ये भरली !!
आपल्या सगळ्यांची फॅशन आयकॉन-योगिता गुर्जर !!
आजची गुड आणि गोड न्यूज ही तिच्याच बाबत आहे , मोठी उपलब्धी आहे ही तिची, एक पाउल पुढे
फॅशन च्या क्षेत्रात-तिला खूप खास संधी मिळाली , एक मॉडेल म्हणुन -एका नामांकित ब्रँड करता- बिंदू रेखा आणि बंदिश लूम!
हे खास असे फोटो शूट खास अश्या ठिकाणी झाले 6/1/24 ला , सोमेश्वर मंदिर-पाषाण येथे. , हे फोटो शूट त्या ब्रँड च्या प्रमोशन करीता होते त्यांच्या वार्षिक कॅलेंडर चा वर ही छापुन येणार आहे. , ह्या ब्रँड चा वैशिष्टय़ म्हणजे ते खास हँड मेड आणि हँड painted ज्वेलरी मध्ये काम करतात.
ह्या सगळ्यात अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे-ह्यात मेकअप आर्टिस्ट पण आपल्या BUF ची प्रिया धर्माधिकारी ही होती.
———————————————
ब्राह्मण क्रिकेट लिग २०२४ – सिझन १ T -20
पहिली ब्राह्मण क्रिकेट लिग २०२४ – सिझन १ T -20 स्पर्धा
या स्पर्धेत एकूण १४० जणांनी रेजिस्ट्रेशन केले. IPL सारख्या फॉरमॅट मध्ये देवदत्त देशपांडे यांनी एक टीम विकत घेतली , स्वतः लीड करून आज त्यांची टीम 3 फेब रोजी होणाऱ्या सेमी फायनल ला पोहोचली आहे.. त्यांच्या टीम मधील खेळाडू त्यांच्या लीडरशिप मुळे अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत
देवदत्त देशपांडे यांचा अप्रोच असा की केवळ नद्यांची नावे असलेल्या ह्या टीम मध्ये त्यांनी स्वतःच नाव कुठे ही न आणता –वाशिष्ठी ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन– असेच नाव घालायला सांगितले
IPL सारख्या फॉरमॅट मध्ये देवदत्त सारख्या अनेक उत्साही मंडळींनी यावेळी ८ संघ विकत घेतले , आदित्य पाळंदे, अमित उमरीकर, शंतनू आठवले व गिरीश ओक या उमद्या तरुण संघटकांनी या पहिल्या BCL – 2024 स्पर्धेचे यशस्वी आयोजन करताना ब्राह्मण समाजातील अनेक होतकरू आणि हौशी खेळाडूंसाठी एक स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे
देवदत्त देशपांडे यांच्या ह्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी , नेतृत्व आणि कम्युनिटी सपोर्ट बद्दल त्यांचे आभार आणि प्रेरणा घेण्यासारखा हा उपक्रम यशस्वी केल्या बद्दल आयोजकांचे मनापासून आभार
जय श्री परशुराम
🙏🙏🙏
तर असा हा वर्षाचा पहिलाच महीना आपल्या दोन admins नि गाजवला. ह्या वर्षी ची सुरुवातच अश्या जबरदस्त न्यूज ने असणार आहे तर हे वर्ष खरंच आपल्या ब्राह्मण यूनिटी ने असेच गाजवत राहावे या साठी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा
योगिता गुर्जर आणि देवदत्त देशपांडे, तुमचे अभिनंदन !!