सकारात्मक कसे राहावे – २ विभावरी कुलकर्णी, पुणे.
सकारात्मक कसे राहावे – २
सकारात्मक का राहावे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जे पेराल ते उगवते या न्यायाने सकारात्मक विचार केले तर आपली स्पंदने तशीच होतात. ती घरात व आपल्या भोवती असतील तर आपण व भोवतालचे वातावरण बदलून जाते. आणि सकारात्मकता आपल्याकडे येते. या साठी १आपला दिवस सकारात्मक स्वसंवादाने कसा सुरु करावा हे आपण पाहिले.आज दुसरे तत्व बघू.
२ आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा.
त्या घटना कितीही छोट्या असतील तरी त्यांचा यादीत समावेश करावा. उदाहरण म्हणून काही गोष्टी बघू.
▪️ आज आवडती व्यक्ती भेटली.
▪️ नवीन पुस्तक घेतले.
▪️ मला सेल्फी घ्यायला जमला.
▪️ आज माझ्यासाठी घरातले जेवायचे थांबले होते.
▪️ गिफ्ट मिळाले.
▪️ आवडता फोन आला.
▪️ कामाची स्तुती झाली.
▪️ कोणी कौतुक केले.
▪️ आज मला छान आवडीचे जेवण / पदार्थ मिळाले.
अशा छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. लिहून ठेवण्याचा उद्देश असा असतो, की असे आनंदाचे क्षण आठवण्याची मनाला सवय नसते. आपल्या आठवणी सांगायला सांगितल्या तर संकटे,वाईट प्रसंगच आठवतात. ज्या वेळी आपण उदास असतो किंवा दुःख होते. अशा वेळी हे आनंदाचे प्रसंग वाचावेत.मूड बदलून जातो. अशाच छोट्या गोष्टी आपल्याला सकारात्मक राहण्या साठी मदत करतात.
धन्यवाद!
🖊️ विभावरी कुलकर्णी, पुणे.
३/१२/२०२३.
📱 ८०८७८१०१९७.