मन दुखत आहे …. श्रध्दा जहागिरदार
मन दुखत आहे
या जगासोबत कित्ती धावत आहोत आपण ? आपले शरीर आपले मन. 🤔 पण थोडे थांबा.
आज समाजात आपल्याला प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, चढाओढ दिसून येते. त्याला अंतच नाही.
तरूण पिढी त्या स्पर्धा जिंकायच्या नादात पूर्ण खचून जात आहे. पैसा भरपूर पाहिजे, पॅकेज चांगले पाहिजे, पालकांना वाटते मुलाला चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. त्यासाठी त्या पाल्ल्यावर अभ्यासाचे दडपण. लग्न झाल्यावर बायकोने पण नोकरी करावी ही नवर्याची ईच्छा. मुली पण मी लग्न झाले तरी नोकरी सोडणार नाही हा हट्ट. प्रत्येक गोष्ट ही घरात लवकर यायला पाहिजे. प्रथम 1Bhk, नंतर काही दिवसांनी 2 Bhk घ्या वाटतो. नंतर 3 Bhk हे अपेक्षांचे ओझे पदरात पाडून घेतात. ऑफीस ला जाताना रस्त्यात एवढी trafic की नकळत त्याचा स्ट्रेस मनावर येतो.पण ह्या सगळ्या धावपळीत मानसिक स्वास्थ्य दुर्लक्षित होत आहे. त्याकडे आपण लक्षच देत नाही. त्यामुळे anxiety, uneasy, depression हे मानसिक आजार सर्रास दिसून येत आहेत. किती पालक ह्याकडे लक्ष देतात ? एखादा मुलगा, मुलगी जर म्हणत असेल किंवा एखादी व्यक्ती म्हणते, मला अस्वस्थ वाटते, सारखे रडायला येते, माझं लक्ष कशातच लागत नाही. अशा परिस्थितीत त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. कशात तरी मन रमव,एखादा छंद लावून घे, मित्र – मैत्रीणी मध्ये मिसळ असे सल्ले दिले जातात. पण येथे वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे हे लक्षात येत नाही.त्या व्यक्तीला व घरच्यांना पण समजत नाही he needs medical help.
Psychiatrist कडे जाऊन medicine घेणे म्हणजे ती व्यक्ती वेडी आहे, तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिले जाते.एका विशिष्ट पातळीपर्यंत तुम्ही councling, meditation , ॐकार, chanting ह्या गोष्टी मदत करतात. meditation करताना माझे मन लागत नाही, मनात खुप विचार येतात. असे मत असते. ते मन आहे. आपले मन असंख्य विचारांनी ओथंबून जात आहे. तो विचार प्रवाह वाहतच जाणार त्याला थोपवून मनाकडे एकाग्रता साधणे तरच meditation, ॐकार यांचा फायदा होऊ शकतो. 2 महिने झाले मी ॐकार करते पण काहीच फायदा नाही. अरे एवढ्या अखंड विचारातून मन बाहेर यायला, ते स्थिर व्हायला वेळ लागणारच. आणि ते पण ह्या गोष्टी तुमच्या दिनचर्येत नियमीत असायला पाहिजे. वर्षानुवर्षे ॐकार केला तर त्याचे फळ मिळते.
पण जेंव्हा गोष्टी हाताबाहेर जातात त्यावेळी तुम्हाला medical advice घेतला पाहिजे. तुम्ही जगासोबत धावा, डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवा ते प्राप्त करण्यासाठी कष्ट करा. पण त्याचबरोबर मन संभाळा. आपले मन थकत आहे याची जाणीव असू द्या. आणि त्यातूनच आपल्याला आज समाजात वारंवार आत्महत्या घडताना दिसतात. ह्या मानसिक आजारातून मोठ्या मोठ्या नामांकित आलेल्या व्यक्तींच्या आत्महत्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तिंना काय कमी होते? प्रसिध्दी, पैसा, ज्या व्यक्तीला लोक गुरू मानतात, ती आपल्या शिष्यांना अध्यात्माचे धडे देते, जीवनाचे सार समजावते.पण त्या व्यक्तीच्या मनातील खळबळ ही तिलाच नाही तर समोरच्याला पण दिसत नाही. यातील काही व्यक्ती डॉ.चा सल्ला घेत होत्या पण गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. मानसिक आजार हा कोणाला पण म्हणजे एखादा सर्व प्रकारे जिवनात समाधानी आहे, व्यवस्थित आयुष्य जगत आहे त्याला पण मानसिक आजार होऊ शकतो फक्त तो वेळीच लक्षात आला पाहिजे.
दुर्लक्ष होण्याचे दुसरे कारण म्हणजे phychiatrist कडे कसा जाऊ, नातेवाईक, आजुबाजूचे लोक काय समजतील ह्याला घाबरून लोक डॉ. कडे जात नाहीत. ज्याप्रकारे ब्लडप्रेशर, डायबेटिस, थायरॉईड ह्या व्याधी सर्रास दिसून येतात. त्यावर आपण औषधोपचार करतो. पण मानसिक रोगाकडे दुर्लक्ष सर्रास केले जाते. याबाबतीत समाजात अजूनही पाहिजे तेवढी जागरुकता दिसून येत नाही.
याबाबतीत एक सरवे झाला होता देशातील सर्वात मोठी neuro- scientist ची Institute आहे त्यांच्या सरवे नुसार हे लक्षात आले की देशात सर्वात जास्त प्रमाणात डिप्रेशन दिसून येते. आपल्याला उदास वाटते काही वेळेला ही उदासी आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या की निघून जाते. पण depression ची उदासी ही वेगळी असते त्यामध्ये किती ही तुमचे आयुष्य, जिवन हे चांगले चालले आहे. कशाचीही काळजी नाही, चिंता नाही तरी पण तुम्ही नेहमी उदास असता. ती जातच नाही. ईथे काहीतरी घोळ आहे व तो सोडवण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. ह्या बाबतीत जागरुक रहा. आणि तो आजार निश्चितच पळून जातो. ह्या आजाराला वैद्यकीय कारणे पण खुप आहेत. ते डॉक्टर लाच कळतात. फक्त ते कळू देणे आपल्या हातात आहे.
आयुष्याप्रमाणे रोजच्या जिवनाप्रमाणे मन चालतच राहणार पण ते कधी दुखते ह्याकडे लक्ष असू द्या. मन ताब्यात ठेवले तर ते आपला मित्र पण ज्यावेळी ते अनियंत्रीत होते त्यावेळी ते शत्रू होते.
*शेवटी एवढेच सांगणे, मनस्वाथ्य जपा त्याकडे दुर्लक्ष करू नका. खुप काही अजून लिहता येईल पण येथेच थांबते🙏🙏
श्रध्दा जहागिरदार🙏