मंथन (विचार)

पुरुष पण भारी देवा

🌺पुरुष पण भारी देवा🌺

हो पुरुष पण सुध्धा भारी असत

स्मिता बुटाले✍️✍️✍️✍️✍️

कोण म्हणेल फक्त बाईपण भारी असत
नाही हो तितकंच हे पुरुष असनहीं भारी आव्हानात्मक आहे
मला वाटायचं काही लिहावस म्हणून मी आज प्रयत्न केला आहे छोटासा 🙂😊 समजून घ्या आणि नक्की वाचा

आपण महिला आहोत आपल्या अमूल्य जीवनाची सुरुवात करणारे आपले बाबा आपले लाड पुरवणारे काका ,मामा,आपला भाऊ आपले आजोबा आपले पती,सासरे , दिर,,मुलगा, आपल्या ऑफिसमधील सहकारी खूप रूप आहेत त्यांची
प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत
आपली मुल त्यांचं शिक्षण आवडीनिवडी कुटुंब महत्त्वाचं मानणारे आपले बाबा ,सासरे किती गोष्टी असतात मनात पण टाळतात
पगार झाल्यावर खुपदा एखादी आवडीची किंवा त्यांच्या गरजेची वस्तू घ्यावीशी वाटते पण घरातली माणसं आणि त्यांच्या गरजांची यादी आठवते हात खाली येतो आणि मन मारल जात
मुलीचं किंवा मुलाचं लग्न इतरांसाठी कपडे खरेदी करताना इच्छा असूनही स्वतः जुन्या कपड्यांवर भागवल जात मला आणि कशाला या वयात कपडे अशी वर पट्टी लावली जाते
घर आणि ऑफिस मध्ये balance ठेऊन वावरन
मनात किती वादळ असू दे बोलणे नाही
कधीकधी घरच्यांसाठी स्वतःच प्रेम त्याग करून आईबाबा म्हणतील त्या मुलीशी लग्न करन
मोठा असो किंवा छोटा भाऊ असो खूप शिक्षण घ्यायची इच्छा असूनही अर्धवट शिक्षण सोडून नोकरी धरून कुटुंब पोसणारे भारीपन आहे
🙂🙂😔😔
घरात लग्न झाल्यानंतर आई , आजी ,बहिण कितीही बोलू दे बायकोला तिचीच समजूत काढन
बायको कितीही शिकलेली असो. आपल्या कुटुंबासाठी काम आणि सेवा करताना तीन सवतःला विसरून जावे हे तिच्या मनावर ठसवणारे
कुटुंबात मुलगा , नवरा, बाप ही नाती जीवनभर व्यवस्थीत सांभाळणार
श्रावण बाळ सारखी आईबाबा ची सेवा करणारा मुलगा
आर्थिक परिस्थती कशी असू दे कुठल्याही प्रकारची वेळ
येऊ दे कुटुंबावर अगदी न डगमगता तोंड देणार म्हणून
बहिणीच्या पाठवणीच्या वेळी रडणारा भाऊ
भाऊबीज ,रक्षाबंधन, सारखे बहिण भावाच्या प्रेमाच्या प्रतिकाचे सन अगदी मनापासून आतुरतेने बहिणीची वाट बघून ती आल्यावर आनंदाने खुलणारा भाऊ
बहिणीचा मान तिच्या सासरी आणि माहेरी सांभाळणारा प्रेमळ भाऊ
मुलगी सासरी गेल्यावर डोळे भरून आलेले असतात पण पाणी लपवणारा बाबा
सासरी येणाऱ्या जावयाच धूमधडाक्यात स्वागत करणारा गरीब असो की श्रीमंत फरक न करणारा बाबा
डोळ्यांनी दिसत नसत म्हातारपणी कंबर दुखते तरीही नातवंडांच्या लाडीगोडीत कमी न ठेवणारे
लेक माहेरी आली की पाठवणी करताना रडणारे बाबा ,भाऊ
ऑफिसमधून दमून आलेला मामा भाच्यांसोबत खेळताना सगळ टेन्शन विसरून जातो
तसच काका सुध्धा आपल्या भावाच्या लेकरांना आपल मानतो की कुठे फरक करतो तो
भाची च्य लग्नात मांडवात मागे उभा राहून हळूच डोळे पुसणार मामा
बायकोने किती छान स्वयंपाक बनवला तरी आईच्या हातची चव न विसरणारा मुलगा
बहिणीने कितीही बेचव नाश्ता केला तरी तायडे किती छान झालं मी खातो दे म्हणणारा भाऊ

आपण किती बिझी असू दे एखादा मित्र किंवा मैत्रीण अडचणीत असेल तर असेल तिथून त्याची मदत करायला धावत येणारा जिवलग मित्र

मित्र साधा गाडीवरून पडून खरच्टल तरी त्याची भाऊ बनून काळजी घेणारा आणि सेवा करणारा मायाळू मित्र

शेजाऱ्यांच्या बरोबर सलोख्या चे आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा शेजारी
आणि खूप महत्त्वाचं म्हणजे लग्न झालेलं असेल तर बायको आणि जिवलग मैत्रीण ह्यांच्यातील समतोल साधणारा
आपल्या प्रत्येक नात्यात समतोल साधून जगणारा
आपल्या आईबाबा प्रमाणे सासू सासऱ्यांची काळजी घेणारा जावई

बाईपण भारी आहे तरी हे पुरुषपण ही भारीच आहे
☺️💯✍️✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}