देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

३६ गुण “……… अनुजा बर्वे .

३६ गुण “

नंदाची कीचनमध्ये एकदम लगबग चालू होती.
संध्याकाळच्या लाईट सर्व्हिंग साठी, ताजे रवा-नारळ लाडू तर तयार झाले होते मात्र गरमागरम साबुदाणा खिचडीला अजून दोनेक वाफा द्यायच्या बाकी होत्या.

तिचे लेक-जावई, भाचा -भाचेसून, नवीन लग्न झालेला पुतण्या-सून सग्गळे एकत्र ,म्हणजे अगदी प्रत्यक्ष समोरासमोर 😳(on-line नव्हे हं)तिच्या घरात जमले होते-नंदा- नितीनच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त !
घराचं अगदी गोकुळ झालं होतं.
डिनरला हल्लीच्या शिरस्त्याप्रमाणे
बाहेरच जायचा बेत होता.

(अगदी बारिकसं जरी कारण असलं तरी ‘will go out’ नाहीतर ‘मागवूया’ ही हल्ली ‘इन थिंग’ असल्याने ‘घरीच काहीतरी करते’ असं भिवया उंचावणारं 😳वाक्य नंदाने मनाच्या खोल कप्प्यात दडवलं अन् सगळ्या यंग ब्रिगेडच्या सहवासाचा आनंद भरभरून घ्यायचा असं ठरवलं.😊)

बाहेर हाॅलमध्ये भाच्याच्या मित्राच्या ‘ब्रेक-अप’ विषयी मोठमोठ्यांदा चाललेलं बोलणं नंदाला आत कीचनमध्ये ऐकू येत होतं.

“तिचं राॅंगचै ! ‘वेळ’ कध्धीच पाळायची नाही आणि ‘वेळेत’ मेसेजही करायची नाही ‘लेट’होण्याबाबत. ॲण्ड अपाॅलाॅजी वगैरे नाहीच. “
भाचा त्याच्या मित्राची तरफदारी करत होता.

“मुलांनो, चिल-पिल ! लेटस् चेंज द टाॅपिक ! जवळजवळ दीडेक वर्षानंतर असे एकत्र भेटतोय, तेही आई-बाबांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी, So ब्रेक-अप वगैरे नकोच” समजूतदार लेकीनं ताईगिरी केलीच.

“Very true! काकाच्या लग्नाचा छत्तीसावा वाढदिवस नं आज ?ग्रेट”
पुतण्या विचारत असतांनाच नंदा कीचनमधलं काम संपवून हाॅलमध्ये शिरली.

“Hey look ! कोण बोलतंय? एकदम छत्तीस वगैरे अं ?कम्माल मराठी ! 👍”
पुतण्याची खेचायची संधी न दवडता भाचा वदला.

“पण.. ३६ वर्षं म्हंजे लाॅंग पिरियड झाला नै !” इति लेक.

“हो नं !” 😜नितीन-बाबाचा मिश्किल पण तत्पर होकार .

“मामा , तुमचं पण ‘पत्रिका -गुण वगैरे बघून’ टिप्पिकल लग्न नं ? ‘विदाऊट गाठीभेटी -मैत्री’,
कस्सं काय बुवा जमवायचे तेव्हा ?🤔 आयडिया कुछ जम नही रही !”

“अरे, तसं तर हल्ली ,डेटिंग -कोर्टिंग मग मेंदी-संगीत,आऊट डोअर डेस्टिनेशन शूट, अशी ‘पायरी-पायरी’नं costly लग्न केलेली मंडळी वर्षभरातच कोर्टाची ‘पायरी’ चढतांना दिसतात तेव्हा आम्हालाही ते पचवायला जड जातंच की !पण…😔
होय, आमचं लग्न मात्र अगदीच पारंपरिक पध्दतीनुसार झालं खरं!
आता ३६ गुण जमले होते की नाही ते आठवत नाही पण ‘३६ वर्ष ‘, ६३ आकड्यासारखा समोरासमोर तोंड करून, चिडचिडत-हसतहसत टिप्पिकल संसार मात्र जमलाय. 👍
१८ वर्ष २०व्या शतकातल्या अन् १८वर्ष एकविसाव्या शतकातल्या स्टाईलमध्ये.😃” नितीन गणितात उत्तरला.

“बाबा, आज तुम्हा दोघांनीही atleast एकेक आठवण शेअर करायची आमच्याबरोबर !” जावयाची डिमांड.

“ए बाबा, ते ‘आठवणी’चं डिपार्टमेंट’ नंदाकडे बरं का ! ज्या त्या वेळी प्रंसंगोपात ‘माझं काय चुकलं’ ते सांगणारया ‘धारदार’ आठवणी आहेत तुझ्या सासूकडे!
‘मी नेहमी बरोबरच असतो’ अशा माझ्या ठाम समजूतीमुळेच तर निभावला हा ३६ वर्षांचा गेम”😄
हसत हसत नेहमीप्रमाणे नितीननं कामगिरी नंदावर ढकलली.

“आता ह्याच ‘नोट’वर एक आठवण शेअर करते.आमची एंगेजमेंट झाल्यानंतर लग्नाच्या तारखेपर्यंत सहा महिन्यांचा अवधी होता -म्हणजे ‘moratorium period’ असावा तसा”, नंदाने आठवणीला चावी दिली.

“Moratorium हे नाव का एवढ्या रोमॅंटिक पिरियडला?🤔किंचित गोंधळलेली भाचेसून.

“ठरलेलं लोन स्विकारून ते यशस्वी करायचं उत्तरदायित्व तर असतंच परंतु ‘moratorium period’ मध्ये EMI पासून मात्र सुटका असते, तस्सं काहिसं !😊”नंदाचा खुलासा.

नंदाच्या एवढ्या सुरवातीवरून, ‘आठवणीचा’ अंदाज येऊन, आठवत नाही असा बहाणा केलेल्या नितीनच्या चेहरयावर उमटलेलं बारिकसं हास्य सगळ्यानीच टिपलं अन् ऐकायला सरसावले सगळे.☺

“आमच्या साखरपुड्यानंतर घरातल्या सिनियर्सनी आम्हाला बाहेर भेटायला ग्रीन सिग्नल दिल्यानंतरची ही गोष्ट,” नंदाने सुरूवात केली .

“My god ! भेटायला ग्रीन सिग्नल लागायचा those days?😳”
साईडसाईडनं टू व्हिलर पुढे न दामटणारा एखादा चालक बघितल्यासारख्या ‘आश्चर्य-मिश्रित’ चेहरयाने पुतण्याच्या बायकोने विचारलं.

“Hmm well, म्हंजे तेव्हाच्या प्रोटोकाॅल नुसार 😄”नंदाच्या उत्तराची सगळ्यानाच मजा वाटली.

“नाटक बघायला जायचं ठरलं आमचं अन् तिकिटंही मीच काढायची असं ठरलं. भविष्यात हे ‘तिकिट-बुकिंगचं डिपार्टमेंट’ही माझ्याच गळ्यात पडणारे याची अर्थातच मला त्यावेळी कल्पना नाही आली “ नितीनची प्रतिक्रिया आजमावत नंदाने स्टोरी पुढे नेली.

“आई, आजच्या दिवशी कृपया वादग्रस्त विधाने टाळावीत”, 😝नाटकीपणाने नंदाच्या लेकीची सूचना आलीच.

“ साडेचारचं नाटक होतं. मी एकदम विशेष रीतीने ड्रेस-अप करून सव्वाचारच्या आधीच थिएटरवर हज्जर.
पहिली १०-१५ मिनिटं ‘उत्सुकतेनं’ वाट बघण्यात गेली.
त्यानंतरची पाचेक मिनिटं,
‘direct थिएटरवरच भेटायचंय अस्सं ठरलेलं लक्षात असेल नं?’, ‘आजची तारीख विसरला तर नसेल?’ अशी ‘शंकायुक्त वाट’ बघण्यात गेली.
‘वाट’ बघण्याच्या ह्या पहिल्याच वेळेने अन् तेही इतक्या विविध’विशेषणयुक्त वाट’
बघण्याने माझी वाट लागली होती.
नाटकाला ‘वेळेवर’ आलेली मंडळी एव्हाना आत जाऊन स्थानापन्न झाली होती. कोणी एखादा उशीर झालेला ‘सुरूवात चुकू नये म्हणून’ लगबगीनं आत शिरत होता.
आता मात्र ,
‘ तब्येत वगैरे ठीक असेल नं ?’ ‘येतांना वाटेत काही मेजर प्राॅब्लेम वगैरे?’
असं माझं ‘काळजीयुक्त वाट’ बघणं सुरू झालं.
थिएटर अगदी मेन रोडला लागून असल्याने येणारे-जाणारे ही आता विचित्र नजरेनं पाहू लागले होते. ‘एवढा जामानिमा केलेली तरूण मुलगी एकटीच अशी थिएटर बाहेर दिसल्यानंतरचे सग्गळे प्रश्न ‘ मला
त्यांच्या नजरेत जाणवू लागले.
बघता बघता सव्वा पाच झाले. ‘सगळ्या वाट’ बघण्याची जागा ‘रागाने’धेतली अन् रडवेल्या चेहरयाने , तो-म्हंजे चेहरा म्हणायचंय मला, लोकांना दिसू नये म्हणून तरतरा चालत घर गाठलं”,
हे सांगता सांगता नाही म्हटलं तरी नंदाचे शेवटचे स्वर जरा ‘चढे’ लागले.

“Oh no !! बाबा तुम्ही पहिली डेट विसरलात ? 😳मगाशी तुम्ही ‘आठवणींचं डिपार्टमेंट आईंकडे आहे’ म्हटलंत तेव्हा मला वाटलं तुम्ही मस्करी करताय. पण…” जावयाची उत्सुकता एकदम शीगेला पोचली होती.

“बाबा का वाट बघायला लावलीत आईला ? त्यावेळी फोन तर फक्त काही जणांकडेच असायचे अन् मोबाईल तर नव्हतेच. मग अशी emergency कशी मॅनेज करायचात तुम्ही लोकं ?🤔”
लेकीच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू.

“Cool folks ! 😃असं काहीसं म्हणतात नं हल्ली,राईट ?
झालं असं की, त्या दिवशी शेवटी ‘हाशहुश ‘करत घामाघूम झालेले बाबा साडेसात वाजता आमच्या घरी पोचले.
अचानक ‘कळवा’ इथे काम निघाल्याने बाबांना आॅफिसमधून तिथे जावं लागलं. एकंदर वेळेचा अंदाज घेऊन नाटकाची वेळ गाठता येईल असं त्यांना वाटत असतानाच परतीच्या वेळी ‘ओव्हरहेड वायर तुटल्याने’ गाड्यांचं वेळापत्रक पार कोलमडलं. ‘कळव्या’चा हा घोळ ‘कळवा’यचं साधन उपलब्ध नसल्याने ‘नाटक’ न बघताच माझ्या ‘नाट्यमय आठवणसंग्रहात’ समाविष्ट झालं.☺
कधी तरी वाटतं, मोबाईल नव्हते तेव्हा पण त्यामुळेच कदाचित जास्त ‘patience’ होता ज्याने ‘ब्रेक अप’ ला कमी वाव मिळाला.”😊नंदाने आठवणीची इतिश्री केली.

“हे ‘ओव्हरहेड वायर’ प्रकरण ‘ओव्हर द इयर्स’ चालूच आहे . महान आहे खरं सगळं”,
भाच्याची कोटीयुक्त प्रतिक्रिया.

“मी म्हटलं नं की ‘मी नेहमी बरोबरच असतो’ हा माझा ठाम विश्वास आहे, पहिल्यापासून !”
🤓 नितीनने बोलण्याचा मोका साधलाच.

“पण नाटकाचं नाव आठवतंय का आई ?”

“होय, आठवतंय की!! नाव होतं,
‘माझं काय चुकलं ??’

“काsssय ??” सगळी यंग ब्रिगेड एका सुरात चित्कारली अन् सगळं घर हास्यरसात विरघळलं.😃😃

अनुजा बर्वे .

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}