मंथन (विचार)

यशस्वी.. म्हणजे नक्की काय ?

यशस्वी.. म्हणजे नक्की काय ?

त्यांची काळजी घेण्यात मायलेकींचा बराच वेळ जात असे. काॅलेज ॲडमिशनच्या दिवशी सकाळपासून जेन अस्वस्थ होती. हव्या त्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली की सुटकेचा श्वास टाकू शकेन असं तिला वाटत होते. पण सेकंद आणि मिनिटे त्या दिवशी पुढे जात नव्हती. जेन ने रात्री बारा पर्यंत कसाबसा वेळ काढला. बाराला निकाल आला व ती आनंदाने नाचू लागली. केंब्रिज मधील जगप्रसिद्ध कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली याचा आनंद शब्दातीत होता. लगेच फेसबुक वर स्टॅटस लिहूनही झाला. लगेच त्या खाली एकापाठोपाठ एक अभिनंदनाचे मेसेजेस झळकू लागले.

तीनं ज्युलियाला अनेक टेक्स्ट पाठवले. ज्युलिया कडून काही उत्तर नव्हते. तीने फेसबुक स्टेटस ही टाकला नव्हता. जेन च्या लक्षात आलं की ज्युलियाला बहुधा हवं ते कॉलेज मिळाले नसणार. तिला खूप वाईट वाटू लागलं. बाहेर नोकरी करून टॅाप कॅालेज मधे ॲडमिशन मिळणं सोपे का आहे ? शाळेनंतरचा सगळा वेळ नोकरीत जातो तिचा. त्यामुळे तिनं ती आशा ठेवणंच चुकीचं होतं. भल्याभल्यांना ते जमत नाही. आता कसे तिचे सांत्वन करायचं उद्या ?

चांगल्या वाईट अशा बऱ्याच भावनांचा उद्रेक होऊन जेनला झोप येत नव्हती. अती आनंद सुद्धा माणसाला नाही सहन होत.

दुसरे दिवशी जेन शाळेत आली. ती दिसेल त्याला तिला तिच्या ड्रीम कॅालेजमधे ॲडमिशन मिळाल्याचं सांगत होती. तिला आपण हवेत तरंगत आहोत असे तिला वाटत होते. सगळं जग आपल्या मुठीत असल्याचा भास होत होता.

तेवढ्यात तिला ज्युलिया दिसली. हाय ज्युली. कशी आहेस ? फोन का उचलत नव्हतीस ? जेन नं विचारलं.

ज्युलिया म्हणाली, अग मला इतका आनंद झालाय तुझा फेसबुक स्टॅटस बघून. मनापासून अभिनंदन जेन. तुझं ड्रीम कॅालेज मिळालं ना तुला ? अग काल रात्री आजोबाना खूप धाप लागली होती म्हणून मला जमले नाही तुला टेक्स्ट करायला.

थॅन्क्यु ग. काल रात्री पासून तुझ्या उत्तराची वाट बघत होते. तुझा फेसबुकवर स्टॅटस नाही काही त्यामुळे तुझी फार काळजी वाटते आहे. तुला हवे ते कॉलेज मिळाले नाही का ? मला फार वाईट वाटत आहे तुझ्याबद्दल पण जाऊदे ग. असं होतं कधीकधी. पण आता काय ठरवलं आहेस ? जेन म्हणाली.

अग मला मनासारख्या एक नाही तर दोन टॅापमोस्ट कॉलेजेस मध्ये ॲडमिशन मिळाली आहे त्यामुळे मी गोंधळातच पडले आहे की कुठे जावं. विश्वासच बसत नाही माझा. ज्युलिया हसत म्हणाली.

जेन चा ही कानावर विश्वास बसेना. अग, जगातल्या दोन अत्युत्तम कॅालेज मधे तुला ॲडमिशन मिळाली आणि तू इतकी थंड कशी ? तुला काही वाटत नाही याचे ? फेसबुक वर पण लिहले नाहीस. अशी कशी ग तू ? तुला सेलिब्रेट देखील करावसं वाटत नाही ?

प्रिन्सिपॉल डॅाक्टर लॅारेन्स हे संभाषण त्यांच्या ॲाफिस मधून ऐकत होते. त्यांना ज्युलियाचा जगावेगळा स्वभाव माहित होता. लहानपासून तिचं झगडणं त्यांनी पाहिलं होत. तिच्या लिखाणात आयुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगांचे पडसाद उमटलेले त्यांना जाणवत. ते तिला धीर देऊन सतत तिच्या पाठीशी उभे होते. सगळीकडे काही ना काही अडचणी असतात ज्युलिया. त्यातच जिद्दीने उभे राहायचे. एक दिवस तुझा असेल. माझी खात्री आहे. म्हणणारे डॉ. लॉरेन्स तिला वडिलांसारखे वाटत.

बाहेर ज्युलिया जेनशी बोलताना ते ऐकत होते. जेन,मला फेसबुक वर काही लिहावसं वाटलं नाही. आपल्या वर्गात बघ किती मुले आहेत. त्यांना मनासारख्या कॅालेजला ॲडमिशन मिळाली नसेल तर त्यांना त्रास होईल असे वाटले.

रिचर्ड ला लर्निंग डिसॅब्लिटी आहे. टॅाम नोकरी करून कॉलेजसाठी पैसे जमवत आहे. त्याचे आई वडील कॉलेज चा खर्च करू शकणार नाहीत. नीना आॅटीस्टिक हे त्यामुळे हुशार असून ती फोकस करू शकत नाही. जॅकला बास्केटबॉल साठी स्कॉलरशिप मिळाली तरच तो कॉलेज ला जाऊ शकेल.

आपलं यश साजरे करताना दुसऱ्याला त्रास झाला तर ते कसले सेलिब्रेशन ? हसऱ्या चेहऱ्याने हिंडणाऱ्या चेहऱ्यांमागचे दुःख आपल्याला माहित नसतं. मला विचार ना.

जेन तिचं उत्तर ऐकून थक्क झाली. मग आपलं यश आपण कधीच सेलिब्रेट करायचच नाही ? आपण चार वर्षे किती कष्ट केले आहेत ? जेन आठ्या घालत म्हणाली.

करायचं ना. बेतात करायचं. इतरांचं ठीक आहे ना, कुणी नैराश्यात गेलं नाही ना,आपण हसताना बरोबरचे रडत नाहीत ना बघत बेतानं करायचं. मला तरी असे वाटतं बघ.

यश म्हणजे काय सांग बरं ? चांगले मार्क मिळणं ? टॅाप कॅालेजला ॲडमिशन मिळणं ? चांगला बॅायफ्रेंड मिळणं ?

जॅक चे बाबा दारू पिऊन घरी येऊन मारहाण करतात तरी तो हसऱ्या चेहऱ्याने शाळेत वावरतो याला यशस्वी होणं म्हणायचं. डिस्लेक्सिक असताना न कंटाळता काम करत राहणे नीना सारखं.. याला यशस्वी होण म्हणायचं. जिमला लागलेल्या व्यसनांवर मत करून तो आता परत छान अभ्यास करतो आहे. त्याला यशस्वी होण म्हणायच. यश म्हणजे केवळ आपल्याला हवे ते मिळणे नाही. आलेल्या अडचणींवर मात करून ताठ मानेने उभे राहणे म्हणजे यशस्वी होणे. ज्युलिया अंतर्मुख होत अनुभवाचे बोल बोलत होती.

जेन ने पटकन फेसबुक उघडून तिचा स्टेटस डिलीट केला. ती हसत म्हणाली बरोबर बोलता हो आजीबाई. ज्युली, तू किती विचार करतेस इतरांचा ? तुला सर्वोत्तम कॉलेजकडून का बोलावणे आले याचा अर्थ मला कळतो आहे. जेन कौतुकाने आपल्या मैत्रिणीकडे बघत म्हणाली.

ॲाफीसमधे डॉ. लॅारेन्सनी चष्मा डोळ्याला लावला आणि स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदनाचे मजकूर लिहण्यास सुरूवात केली. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:च्या हस्ताक्षरात मजकूर लिहताना डॅा लॅारेन्स प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यात असलेल्या गुणांची जाणीव करून देत. दोन तासात ते १२ वी च्या वर्गाला बाहेरच्या जगात जाऊन कसं यशस्वी व्हायचं यावर भाषण देणार होते. आपल्या मुलांना बाहेरच्या जगात पाठवताना यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या चार गोष्टी सांगताना त्यांना पण भरून येत असे.

त्यांनी पहिलं कार्ड जेन ला लिहिले.
Congratulations Jane! Your strength is your hard work snd your determination. I am proud of you. Best Wishes.

दुसरं कार्ड ज्युलिया ला लिहिले.
Congratulations Julia You are going to change the world. You are an inspiration! Make us proud as usual. Best wishes.

एकेक कार्ड लिहून बाजूला ठेवत डॅा. लॅारेन्सनी चष्मा काढून डोळे पुसले व सेंडआॅफच्या भाषणासाठी कागदावर महत्वाचे मुद्दे लिहायला सुरुवात केली,

यशस्वी होणं म्हणजे काय ?
Success is nothing but
survival against all odds

नेल्सन मंडेला म्हणतात,
I never lose. I either win or learn

बाहेरच्या जगातल्या नव्या आव्हानाला न डगमगता सामोरं जा. जे हाती घ्याल ते उत्तम करा

पण कुणाचे पाय खेचून वर जाऊ नका. त्याला बरोबर घेऊन वर जा नाहीतर त्या वरच्या ठिकाणी पोचलात तरी अगदी एकटे असाल.

जेव्हा सगळे पुढे जातात ना तेव्हा यश आपोआप तुमच्या मागे मागे येऊ लागतं.. असे यशस्वी व्हा.
ज्योती रानडे …..

समाप्त ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}