वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कॅन्सल तंत्र …….विभावरी कुलकर्णी,पुणे. मेडिटेशन, हिलींग मास्टर

कॅन्सल तंत्र

आज आपल्याला सर्वांना खूप उपयुक्त असणारे एक तंत्र बघू.
आपल्याला माहिती असेल,दिवसभरात ५०,००० ते ७०,००० विचार आपल्या मनात येतात. आणि त्यातले फक्त ५% सकारात्मक असतात. आपण काम करत असताना किंवा नुसते बसले,टिव्ही बघत असेल तरीही मनात विचार चालूच असतात. त्यात बराचसा स्वतःशी संवाद असतो. आणि त्यातही आनंदी किंवा सकारात्मक विचार कमी असतात. जास्तीत जास्त नकारात्मक विचार असतात आणि तेही स्वतःला दूषणे असतात. जसे पुढील वाक्ये बघू.

मला काहीच जमत नाही.
माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही.
माझे नशीब खडतर आहे.
मला कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही.
खूप कष्ट करावे लागतात.

साधारण या प्रकारचे विचार किंवा आयुष्यातील नकोशा घटना आठवतात. आणि त्याची साखळी तयार होते. तेच विचार सारखे फिरत राहतात. आणि मग मनाचे तेच सेटिंग होते. मन त्याच गोष्टी प्रमाणित करून टाकते. आणि अशा विचारांच्या आवर्तनात आपण अडकतो. मग आपल्या भोवती तशीच स्पंदने निर्माण होतात. आणि त्याच गोष्टी पुन्हा आपल्याकडे येतात. त्यामुळे थोडा वेळ जे मेडिटेशन करतो किंवा आनंदी असतो त्याचा फारसा उपयोग होत नाही.

आणि हे नकारात्मक विचार आपल्या इच्छा पूर्तीच्या मार्गात अडथळे ठरतात. निसर्गशक्ती देण्यास तयार असते पण आपलेच विचार त्यात अडथळे आणतात. हेच दूर कसे करायचे ते बघू या.

▪️ प्रथम असे विचार ओळखायला शिकले पाहिजे. कारण एकातून एक नकारात्मक विचार येतात हे लक्षातच येत नाही. विचार थोडे थांबवून आपण कोणते विचार करत होतो या कडे लक्ष द्यायचे.

▪️ ज्या वेळी असे विचार नकारात्मक आहेत हे लक्षात येईल त्यावेळी लगेच कॅन्सल कॅन्सल म्हणणे.

▪️ जो नकारात्मक विचार करत होतो त्याच्या विरुध्द सकारात्मक विचार करावा.

या साठी काही दिवस आपल्याला आपल्या विचारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आणि आपल्याला विचार चेक करायचे आहेत हे लक्षात येण्यासाठी आपल्याला दिसेल अशा ठिकाणी कॅन्सल कॅन्सल शब्द लिहायचा किंवा कागदावर लिहून दर्शनी भागात लावायचा. ज्या वेळी आपल्याला ते शब्द दिसतील त्या वेळी आपण कोणते विचार करत होतो ते चेक करायचे. म्हणजेच आपल्याला काय कॅन्सल करायचे ते लक्षात येईल. एकदा ते लक्षात आले की ती वाक्ये आपण बदलू शकतो. उदाहरण म्हणून काही वाक्ये बघू.

मला काहीच जमत नाही.
माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही.
माझे नशीब खडतर आहे.
मला कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही.
खूप कष्ट करावे लागतात.

अशी वाक्ये मनात आली की लगेच कॅन्सल कॅन्सल म्हणायचे. आणि ती वाक्ये पुढील प्रमाणे बदलायची.

मला सगळ्या गोष्टी उत्तम जमतात.
सगळे माझ्यावर प्रेम करतात.माझी काळजी घेतात.
माझे नशीब खूप चांगले आहे.
कोणतीही गोष्ट मिळण्याची माझ्याकडे क्षमता आहे.
मी आनंदी आहे.

या प्रमाणे वाक्ये बदलून घ्यायची.

या प्रमाणे मनाला सवय लावून घ्यायची. हे तसे कठीण आहे. पण अशक्य नाही.

महत्वाची सूचना – हे सगळे नुसते वाचून सोडून द्यायचे नाही. तर हे अंमलात आणायचे आहे.

यात शंका असेल तर फोन करु शकता. हे तंत्र फॉरवर्ड करु शकता.फक्त नावा सहित फॉरवर्ड करावे. म्हणजे काही शंका असल्यास मला विचारल्या जातील.

कॅन्सल तंत्र उपयोगात आणल्या नंतर अनुभव नक्की सांगावेत.

धन्यवाद!

✍️ विभावरी कुलकर्णी,पुणे.
मेडिटेशन, हिलींग मास्टर
१५/१/२०२४.
📱८०८७८१०१९७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}