गिरनार अनुभव १०.१०.२०२२ …………. आशुतोष बर्वे 98225 41144
आशुतोष बर्वे
१०.१०.२०२२
जय गिरनारी !!
गिरनार बद्दल फक्त खूप ऐकले होते, १०,००० पायऱ्या आहेत पण एवढे कोण चढणार?
जाऊदे आता या वयात काही शक्य नाही.
आणि रजा?
आणि लांबचा प्रवास ?
आणि आपल्याला तिकडचे काहीच माहीत नाही,
खर्चाचे काय ?
जाऊ दे ,विषय stop.
आणि मी म्हंटले,
“असेल हरी तर देईल खाटल्यावरी”
देवाला इच्छा असेल तर तो येईल भेटायला आणि वर जाऊन काय बघायचे तर फक्त पादुका, कोणी सांगितलेय. आणि तसाही माझा आणि गुरुदेव दत्ताचा काही संबंध नव्हता.
माझी आवड होती फक्त श्री राम,
“श्रीराम जय राम जय जय राम”
रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज आणि काही वर्षापासून गजानन महाराज. कळायला सोपे , कधीही जायला सोपे.
मग अचानक दत्त महाराज?
Lockdown मध्ये कुतूहल म्हणून गुरुचरित्र वाचले (पारायण नाही), गजानन महाराज पोथी वाचली, शंकर महाराज पोथी ऐकली वर वर..
स्वामी समर्थांची नेहमीच भीती वाटायची, अचानक काही बोलतील काय, रागवतील काय म्हणून, कारण आपल्या सगळ्या चुका आपल्याला दिसायला लागतात त्यांच्या समोर गेले की आणि मग भीती वाटते. म्हणून त्यांना आपले लांबूनच राम राम करत असे.
पण एके दिवशी स्वामी समर्थ स्वप्नात आले, जक्खड म्हातारे , पांढरे शुभ्र वस्त्र नेसून, माझ्या हातचे अंगठे धरले आणि म्हणाले चल…
एवढेच…….
मी म्हणले भास आहे म्हणून सोडून दिले.
हे सगळे साधारण एक वर्षापूर्वी घडले…
Lockdown संपला रूटीन चालू झाले, मग आपले आवडते गणपती बाप्पा, मारुती राया, श्रीराम यांची नेहमीची स्तुती , स्तोत्र रूटीन म्हणून चालु होते..कामाचं प्रचंड ताण, शाररिक दमणूक यामुळे व्यायाम सोडाच पण झोप ही नीट लागत नाही हल्ली..फक्त ऑफिस, तिथले काम, घर म्हणजे गेस्ट हाऊस झाले आहे.
पण यातही, रोजची ठराविक भक्ती सोडली नाही, हट्ट केला, विमान प्रवास असो वां दुसरा देश, झोप झाली असो व नसो , ते ते ठरलेलं केलेच..कधी कधी स्तोत्र म्हणताना, काय म्हणतोय एकडेही लक्ष नसायचे, डोक्यात विचार फिरायचे..पण सोडले नाही..
हाच सगळा प्रवास असावा..
रामरक्षा स्त्रोत्रात्त , उल्लेख आहे
सीता शक्ती:
श्रीमत् हनुमान कीलकम् ||
कीलक म्हणजे किल्ली, प्रभू रामचंद्र यांचेकडे जाण्याचे कुलूप उघडण्यासाठी.. रामाकडे जाण्याचा मार्ग हनुमान जी..
तसेच आपण सगळे “किलक” झालात माझ्यासाठी गिरनार ला जाण्यासाठी,.. आश्विन, मेघराज, अश्विनी, सारिका ..
सगळेच .आपण सर्व..
आणि बोलावणे आले, गुरूंनी बोलवणे पाठवले, माझा गर्व गळून पडला, “खाटल्यावर” नसेल पण बोलावणे तर आले ..मग बघू तर
माझा भाऊ शशांक चा फोन आला येतोस का गिरनार ला , 4 महिन्या पूर्वी, मी म्हणले ” हो”. म्हणले पायथ्याशी तर जाऊन येऊ..प्रॅक्टिस करू ना चालण्याची…काहीच केले नाही…
मग अगदी शेवटी शेवटी गिरनार चे YouTube Vdo बघीतले , मग कळाले हे आहे गिरनार…
आश्विन , सारिका, शशांक, योगिता आणि आम्ही दोघे भेटलो,
शंका निरसन, माहिती मिळाली, पण तरीही confidence नव्हता. पण जायचे पक्के झाले होते.
कंपनीत नेहमी प्रमाणे,
(6 Oct 22)आपली घाई असते तेव्हा नेमकी meeting असते तसे झाले, 3.30 to 5.30pm meeting लागली, जी मीच coordinate करतो, म्हणजे माझी सुटका नाही 6pm पर्यंत.. आता काय करावे, घरी कधी यायचे आणि कधी जायचे station la? घरी नुसता गोंधळ…..
6th Oct 22 la काळजी करत बसलो होतो, कधी meeting संपणार कधी घरी जाणार, traffic Jam….
2pm ला अचानक साहेबांचा फोन आला, can u pl reschdule to 3 to 4.30pm (मला आनंद झाला).
Meeting चालू झाली, साहेब म्हणाले,
“आशुतोष can u please start from ur group? ”
(Normally maze presentation शेवटी असते)
मला अजून आनंद झाला, काय चार शिव्या खायच्या होत्या त्या 3 ते 3.30 मध्ये खाल्ल्या आणि फ्री झालो. पुढची presentation फक्त coordinate करायची होती, वजन हलके झाले..
4.30pm la meeting संपली आणि घरी आलो,,,,आ रा मा त
पुणे स्टेशन ला पोचलो.
पुढचा प्रवास, तुमच्या सर्वांबरोबर झाला..अवर्णनीय आनंद मला मिळाला
खाणे पिण्याची चंगळ,
ताकाचा अक्षरशा: अभिषेक,
उत्तम हॉटेल्स, ट्रेन्स आणि
आपल्या सगळ्यांचा सहवास
गुरुदत्ता नी माझ्यासाठी बांधलेला ropeway , कमंडलु तीर्थ इथला प्रसाद त्तृप्त करणारा..
दत्त पादुका दर्शन, तिथे मिळालेली आरती (वाटले नव्हते, आरती पर्यंत पोहोचू) अचानक मधे भेटलेले महेश गिरी महाराज , आणि ५००० पायऱ्या उतरताना तो थरारक प्रवास..
सगळेच अद्भुत, ..
दत्त पादुका समोर काय झाले काही आठवत नाही, ना काही मागितले ना काही सांगितले, दर्शन घेतले एवढेच..मंत्रमुग्ध अवस्था होती ती..केवळ स्वप्नं…आता काही नको ..फक्त आपला सहवास हवा देवा…
चढवावा मारुती ते चढवावा मारुती प्रवास आपल्या सगळ्यांच्या साथीने अविस्मरणीय झाला.
आता पुढे परत कधी जायचे, कुठे जायचे काही ठरवलेले नाही.. पुढचा प्रवास ज्याचा त्याचा वेगळा असू शकेल..
आपल्या सारखी माणसे सतत भेटत राहोत हीच इच्छा !!!
आजच हे लिहिण्याचा हट्ट होता कारण उद्यापासून परत रहाट गाडगे चालू होईल,मी सुध्दा बदलेन, विचार बदलतील.
जे जे दत्त गुरू सुचतील ते ते करत राहू. असेलही हा एका प्रवासचा अंत आणि पुढची सुरुवात..
सर्वांना , सर्वकाळ शुभेच्छा!!
आपल्या सर्वांना जे जे हवे ते ते मिळो.
हीच गुरुचरणी प्रार्थना !!
!!श्री गुरुदेव दत्त !!