फक्त मंदिरात गुप्त दान केल्याने देव कसा खुश होतो तेच कळत नाही!
गुप्त नातं ठेवल्यास परिवार नाराज!
गुप्त रोग झाल्यास समाज नाराज
गुप्त धन ठेवल्यास सरकार नाराज
पण
फक्त मंदिरात गुप्त दान केल्याने देव कसा खुश होतो तेच कळत नाही!
ही theory ज्या कोणी स्थापित केली तो खरंच खुप चाणाक्ष व चतुर असला पाहिजे!
पंचपक्वानाचा नैवेद्य देवळातल्या देवाला अन् उपाशी पिडित चिमुकले मात्र लाचार असते देवळाच्या पायथ्याला !
कधी जाग येणार धर्मान्ध अंत:करणाला ?
संकटात देवाचा धावा केल्यावर देव येईल की नाही माहित नाही
पण 100 नंबर डायल केल्यावर पोलिस नक्कीच येतात….
108 वेळा कोणत्याही मंत्राचा जप केल्याने देव संकट समयी धावून येतात की नाही माहित नाही
पण 108 नंबर डायल केल्या वर ऍब्यूलन्स नक्की मदतीला धावतेच…
सृष्टिचा निर्माता देव आहे की नाही ते मला माहित नाही
पण देवाचा निर्माता माणूस आहे यावर माझा खात्रीने विश्वास आहे
(म्हणून तर देवाच्या मुर्त्या विकल्या जातात न)
आणखी एक वेगळीच गोष्ट म्हणजे
देवापुढं लावण्यासाठी उदबत्ती घेतली जाते ! ती उदबत्ती मात्र स्वतःला आवडणाऱ्या वासाची घेतली जाते. हे काय गौडबंगाल मला कळलं नाही ! याचा अर्थ देवाला कसलीच आवड निवड नसते ! जे भक्तिभावाने तुम्ही अर्पण कराल ते तो आनंदाने घेतो. वैदिक शास्त्रानुसार नियमितपणे असे धूप घरात करावेत ते आरोग्यासाठी चांगले असतात हे हि सिद्ध झालं आहे ! फक्त जुनी लोक “आरोग्यासाठी चांगलं आहे” असं सांगितलं तर ऐकतीलच असं नाही म्हणून त्याला देवाधर्माची जोड दिली गेली असावी (असं माझं मत)
समाज सुरळीत चालावा म्हणून नीतीसाठी बिंबवल्या जाणाऱ्या गोष्टी नंतर नितीसाठी कमी आणि भीती साठी जास्त पोसल्या जातात
आणि ह्याच गोष्टींचा अतिरेक पुढे जाऊन अनितीलाही कारणीभूत ठरतो
ज्या दिवासापासून सामाजिक बांधिलकीचे कंकण हाती बांधले तेव्हापासूनच विरोध पचवायची देखील तयारी ठेवली
मी फक्त विचारांची बीजे रुजवत जातो ती सगळ्यांनाच पटतीलच असे नाही
पण
हळूहळू सत्य पटणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि समाज हळूहळू बदलत जातो.
श्रद्धा जरूर असावी. पण अंधश्रद्धा नसावी.
धर्म जरूर पाळावा पण सर्व धर्मापेक्षा माणुसकी हा धर्म सर्वश्रेष्ठ मानावा !
मी कोणा ठराविक एका धर्माबद्दल बोलत नाहीये ! यात सगळेच आले !!
गाडगेबाबानी सांगितलेला हाच तो माणुसकीचा धर्म व माणसात देव पहा त्याची सेवा हीच देवपूजा असं कर्मावर आधारित असलेला धर्म मला प्रिय आहे.
मी देवळात जात नाही असं नाही ! (तसा तर मी सगळीकडेच जातो) पण जिथं जातो तिथं माणसात असतो ! त्यांना आपल्याकडून समाधानी चार क्षण देता येतील का ? हेच पाहतो. तीच माझी पूजा असते. बाप्पा समोर हात जोडून उभा राहतो पण त्याला मागत काहीच नाही ! कारण न मागता त्याने इतकं दिलेय का ! मग अजून काय मागू ? त्यापेक्षा रांगेतल्या इतरांकडे लक्ष दे बाबा, असं म्हणून मी तिथून निघतो ! (तरी बाप्पा माझ्या पाठीशी प्रत्येकवेळी उभा असलेला अनुभवला आहे ! हे काय गणित आहे त्याचे ? मला आजवर कळलं नाही ! असो !!
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते
परीक्षेत वेळेची मर्यादा असते
इमारत बांधताना उंचीचीही मर्यादा असते
परंतु
विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा…
देवाकडे मागताना मी हल्ली थोडा थांबतो,
रांगेतल्या इतरांकडे डोळे भरून पहातो…
‘ते’ जे मागत असतात, नेमकं ते सारं माझ्याकडे असतं,
मला मात्र तेवढंच दिसतं, जे माझ्याकडे नसतं…
अधाशी मन पाण्यासारखं उताराकडे धावतं,
घट्ट धरावं नेहमी सारं जेवढं मुठीमध्ये मावतं…
जेवढं मागावं देवाला तेवढं कमीच असतं,
मुठभर त्याने दिलेलं कधीच दिसत नसतं…
साठवलेलं सारं उपयोगात कधी आणणार?
घाम गाळून जे मिळवलं, त्याचा उपभोग कधी घेणार?
परतीच्या प्रवासात यातलं काय नेणार…?
म्हणून देवाकडे मी आता नाही मागत ,’वस्तू’,
‘तो’ सुद्धा आता हसून पटकन म्हणतो, ‘तथास्तु’…
(एके ठिकाणी वाचनात आलेलं)….