वेळ ⌚ ….. श्रद्धा…
वेळ ⌚
पाळली तर आपली नाहीतर
‘सब कुछ अपने हिसाब
से चलता है भाई’
असे म्हणणारे लोक असतात.
काल एका कार्यक्रमात गेले होते. वेळ होती 6 वाजता(संध्याकाळी) कार्यक्रम
वेळेवर 6 वाजता सुरु झाला. 6-30
वाजता एक कुटुंब आमच्या पलीकडे येऊन बसले. अर्धा तास उशीर, बरं ते काहीच नाही जागेवर जाताना आम्हाला ओलांडून जाणे, त्यांचे पाय
आम्हाला लागणे, परत तोंड वर करुन sorry. हा सगळा द्राविडी प्राणायाम झाला. मधल्या सुट्टीत बाहेर चहा घेताना ते नवरा- बायको (आम्ही तेथेच शेजारी चहा घेत उभे होतो) त्यांच्या परिचयाचे स्नेही त्यांना म्हणतात ‘अहो आपला हा भारत आहे, येथे कुठे वेळेवर काय चालू होते. झाला तर झाला अर्धा तास उशीर. मी ते वाक्य ऐकले आणि रागाने एक कटाक्ष त्यांच्याकडे टाकला. (कारण मी स्वत: वेळे बाबत खुप कडक आहे)
मला त्यांच्या वाक्यावर हसावे की रडावे तेच कळत नव्हते. काय लोक असतात, एक तर वेळ पाळायची नाही वर परत ‘आपला भारत देश’ देशाचं नाव पण खराब करणे. तुम्हाला कार्यक्रमाची वेळ झक मारायला दिली का?
वेळ न पाळणे हे सर्रास पणे चालू असते.अशा लोकांना उशीरा येणं म्हणजे ती एक स्टाईल वाटते. सगळे माझ्याकडे किती छान ड्रेस आहे ना वगैरे या दृष्टीने पाहतात. अरे तुझ्या नानाची टांग. सगळे रागाने पहात
असतात तुझ्याकडे.
खर तर वेळेचं गणित मांडता आले पाहिजे. तुम्ही किती वेळ पाळता, वेळेवर येता का, यावरुन तुमचे व्यक्तीमत्व निरीक्षीत होते. ‘ते वेळेच्या बाबतीत खुप कडक आहेत बरका, त्यांना उशिरा गेलेलं बिलकुल आवडत नाही’ हेच त्या व्यक्तीचे first impression👍🏼.
लग्नाचा मुहूर्त, वेळ, एखाद्या उद्घाटन ची चांगली वेळ पाहून ठरवली जाते. त्याच्या मागे काहीतरी चांगला अर्थ च असतो ना. मी ही उदाहरणं आपल्याकडे वेळेचा कसा खेळ खंडोबा चाललेला असतो त्यामुळे देतीये.
लग्नाची वेळ, मुहूर्त शक्यतो टाळत नाहीत म्हणण्यापेक्षा आपल्याकडे तरी तो टाळतच नाहीत. नक्कीच गुरुजींनीं ती वेळ काढली म्हणजे त्या वेळेला काहीतरी महत्व आहे. ती वेळ तुम्ही पाळा, त्या वधु-वरांना त्याच वेळेत शुभ आशिर्वाद द्या.
वेळेच्या बाबतीत अजुन एक मजा म्हणजे जे वेळेवर येतात त्यांना ‘वेडं’ समजायचं’ त्याला काय उद्योग आहे त्याच बरं विचारलं तो 1 तास आधी येऊन थांबेल, मला शंभर कामं आहेत’
बघा म्हणजे वेळेवर येणारा ‘वेडा’ आणि हा ‘शहाणा’ पण हे लक्षात येत नाही की प्रत्येकाला कामं असतात पण वेळेवर येणारी व्यक्ती तिचे 200 कामं वेळेत करून येते पण वेळेत येते. आणि तू 100च कामं वेळेवर करत नाहीस तर हि तरी वेळ कशी पाळणार. मला तर हसू येते अशा लोकांचे.
कोणत्याही कार्यक्रमाची, लग्नाची
गाडीची, फ्लाईट ची जी वेळ असते त्यातील 20-25 मी. जास्तीचे तुमच्या हातात ठेवा. वेळेवर काहीही अडचण येऊ शकते भले वाहतूक, सामान विसरणे, रस्ता चुकणे अशा खुप अडचणी येऊ शकतात. त्यासाठी ती ठेवलेली 20-25 मी. तुम्हाला कामी येतात.
येथे मला एक छान उदाहरण द्या वाटते. मी एका लग्नाला गेले होते. नवरा मुलगा मोठ्या पोस्टवर होता. त्याचे सगळे साहेब लोक, ऑफिस मधील मोठ्या पदावरची लोक लग्नाला येणार होती. लग्न मुहूर्त टळत होता. वधू कडील मंडळी टेंशन मध्ये की ह्यांचे सगळे मोठे मोठे लोक येणार मुहूर्त पुढे जातोय. शेवटी वधु पित्याने वरास विचारले ‘तुमची साहेब मंडळी अजुन आली नाहीत अक्षदे साठी थांबायचे का? नवर्या मुलाने मस्त उत्तर दिले ‘काही गरज नाही थांबायची आपण मुहूर्त कशासाठी काढला. मंगलाष्टके सुरु करा’. मला फार त्या मुलाचे कौतुक वाटले. ही खरी वेळ पाळणे. पण ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली का, त्या साहेब लोकांचे impression काय पडले?
आपण म्हणतो ‘ कोणावर पण अशी वेळ येऊ नये. येथे वेळेचे महत्व कळते. ‘ काळ आला होता पण वेळ नव्हती आली’ जर खरच वेळेने तिची वेळ पाळून वेळ आली असती तर … मग
“वक्त तो सबको मिलता है, सबके पास है। लेकीन वक्त वक्त की बातें दुबारा नही ईस्तेमाल होती, उसे वक्त पे ही ईस्तेमाल करो।”
श्रद्धा… 🙏
🙏