कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 4

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
Day 4
आजचा मैसूर होईसळ मधला ब्रेकफास्ट एकदम छान होता , कुर्मा पुरी नंतर वडा सांबार आणि एकदम फ्रेश चटणी असा मस्त ब्रेकफास्ट करून आम्ही म्हैसूर लोकल साईट सिंग करायला बाहेर पडलो पहिला स्पॉट अगदी हॉटेलपासून जवळच एक दीड किलोमीटर मध्येच तो होता जगन मोहन पॅलेस
🔱 जगन मोहन पॅलेस, मैसूर — हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण आहे, जे मैसूरच्या राजघराण्याच्या वारशाचे दर्शन घडवते.

📜 इतिहास व स्थापत्यशैली
– निर्मिती वर्ष: १८५६ मध्ये सुरू होऊन १८६१ मध्ये पूर्ण झाले.
– राजा: मुम्मडी कृष्णराज वोडेयार यांनी हे बांधले. , स्थापत्यशैली: पारंपरिक हिंदू शैली आणि इंडो-सारासेनिक शैलीचा संगम.
🏛️ वैशिष्ट्ये मुख्य दरवाजा: दोन्ही बाजूंनी दशावताराची सुंदर कोरीव कामे.
– भिंतीवरील कोरीव काम: वोडेयार घराण्याचा इतिहास, मैसूर दसऱ्याचे भित्तिचित्र, धार्मिक प्रतीकांची रचना.
– म्युझियम: श्री जयचामराजेंद्र आर्ट गॅलरी — चित्रकला, हस्तकला आणि ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन.
🕰️ वेळ व प्रवेश शुल्क
– वेळ: दररोज सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:००.
– प्रवेश शुल्क: प्रौढांसाठी ₹६०, मुलांसाठी ₹३०.
हे पॅलेस मैसूरच्या मुख्य राजवाड्याच्या पश्चिमेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. तुम्ही मैसूरला भेट देत असाल, तर हे ठिकाण नक्कीच पाहण्यासारखे आहे.
जगनमोहन पॅलेस मध्ये तांदुळावरचे डिझाइन , फ्रेंच मुसिकल कॅलेन्डर क्लॉक , वेगवेगळी उंचचउंच स्ट्रक्चर दोन दोन माल्याइतकी उंची साधारण पाने १६ १८ फूट कृष्णराजा वाडियार हे चित्रकार होते वाडियार घराण्याचे वंशज , त्यांचा फेटा अंगरखा एकदम खास , जबरदस्त प्रचंड अशी झुंबरे , चांदीच्या वस्तूच वस्तू . ३२ पायऱ्या पहिल्या माळावर जायला. श्री रामसागर , जटायू वध , मेघनाद विजय , श्रीकृष्ण राजदूत म्हणून , श्रीकृष्ण बलराम कैदेतून बाहेर येतांना , द्रौपदी , सैरेंध्री , शकुंतला पत्रलेखन , राजा हरिश्चंद्र लेडी in moon light galaxy of musicians , गावातील लाईफ कसे असते याचे चित्र मत्स्यगंधी ही सर्व चित्रे राज रविवर्मा यांची आहेत जगन मोहन पॅलेस, मैसूर येथील जयचामराजेंद्र आर्ट गॅलरीमध्ये राजा रविवर्मा यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रांचे संग्रह आहे.
🎨 राजा रविवर्मा यांची चित्रे — वैशिष्ट्ये , भारतीय पौराणिक विषयांवर आधारित चित्रे: दमयंती, शकुंतला, लक्ष्मी, सरस्वती यांसारख्या पात्रांचे सुंदर चित्रण.
– युरोपियन शैलीतील रंगसंगती आणि प्रकाशछटा यांचा वापर करून भारतीय भावनांचा सजीव अनुभव.
– चित्रांचे मूळ प्रिंट्स आणि ऑइल पेंटिंग्स दोन्ही प्रकार येथे पाहायला मिळतात.
ही गॅलरी भारतातील राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा सर्वात मोठा सार्वजनिक संग्रह मानली जाते. तुम्ही भारतीय चित्रकलेत रस घेत असाल, तर हे ठिकाण नक्की आवडेल आणि खूप वेळ आपण रमतो त्या चित्रात
मला इथे सुहास शिरवळकर यांची अमर विश्वास या charactor – राजा रविवर्मा पैंटिंग ची चोरी हे पुस्तक अक्षरशः डोळ्या समोरून तरळून गेले
मयुरासन जयचामराजेंद्र art gallery मध्ये प्रचंड मोठा चहाचा कप २५ फॅमिली जणांच्या साठी एकच असा , तंबोरे. वीणा गोटुवाद्य , सुरसोता , व्हायोलिन , बसऱ्या , दिलरुबा , सितार , सारंगी , तबले , सारीपाट , द्युत चौसर , वेगवेगळ्या ज्योतिष पद्धती अशी ही खूप चित्रे आहेत या मध्ये
इथे फोटो नाही काढता येत
तिथून पुढे समोरच म्हैसूर पॅलेस आंबा विलास पॅलेस म्हणतात त्याला प्रशस्त पार्किंग आणि आत जाण्यासाठी अत्यंत व्यवस्थित असे एअरपोर्ट सारखे स्कॅनर त्यानंतर तिकीट ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही आणि व्यवस्थित सिक्युरिटी होती छान आत मध्ये लाईनीने व्यवस्थित सगळ्यांना आज सोडत होते प्रत्येक ठिकाणी फिरण्यासाठी गाईडेड टूर अशी ती होती आणि आत मधले काही फोटो तर मी इथे पाठवले आहेतच त्याचबरोबर बाहेरून काढलेले काही अत्यंत सुंदर फोटोग्राफ्स आणि बाहेर वराह मंदिर पण आहे विष्णू मंदिर पण आहे त्याचबरोबर अत्यंत व्यवस्थित आणि अतिशय वेल मेंटेन आणि क्लीन्लीने सुद्धा या अख्या राजवाड्यामध्ये जाणवतो



त्यानंतर त्यानंतर आम्ही एक्वा मरीन लाइफ आणि मैसूर जो बघायला गेलो म्हैसूर झू च्या बाहेर कळलं की आत मध्ये काही खूप सारे बघण्यासारखं काही नाहीये म्हणून ते ड्रॉप केलं आणि डायरेक्ट ऍक्वा मरीन लाइफ बघायला आलो
🐠 लोकराजन Aqua World (Underwater Zone Aquarium)Zoo Garden Road, Lokaranjan Mahal Road, Mysuru — भारतातील सर्वात मोठे अंडरवॉटर एक्वेरियम.
१०० हून अधिक जलचर प्रजाती — रंगीबेरंगी मासे, समुद्री जीव, कोरल्स.
अंडरवॉटर टनेलमधून चालताना जल-जगतातील अनुभव.
दुर्मिळ आणि विदेशी जलचर प्रजाती: रंगीबेरंगी मासे, समुद्री कासव, शार्क, स्टिंगरे, कोरल्स.
शैक्षणिक व मनोरंजनात्मक अनुभव: मुलांसाठी आणि प्रौढांसाठी एकसारखा आकर्षक अनुभव.इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले आणि माहिती फलक: समुद्री जीवनाची माहिती देणारे.
त्यानंतर आम्ही मैसूर मधलं देवस्थान चामुंडी हिल्स याचे दर्शन करायला गेलो जाण्याचा रस्ताच अतिशय सुंदर घाटातून वर जाणारा पाच-सहा किलोमीटरचा रस्ता अत्यंत सुखावून गेला आणि तिथून दिसणारं मैसूरच दर्शन हे अत्यंत नयनरम्य असं मनोहरी दर्शन वाटत होतं हवा ही खूप चांगली होती त्यामुळे कुठलाही त्रासही नाही झाला गरम नाही आणि तिथे गेल्या गेल्या एका चांगल्या माणसाने आमचे फोटो काढून शंभर रुपयांमध्ये लॅमिनेट करून आम्हाला आमचा फोटो पण दिला

त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो दर्शन झाल्यानंतर बाहेर एका सोड्याच्या दुकानावरती उभे असताना चांगलं आहे अच्छा आहे असं म्हटल्यानंतर त्या बाईंनी त्याचं आम्हाला कन्नड मध्ये ट्रान्सलेशन करून सांगितलं ते पुढील प्रमाणे होतं , मस्त आहे” हे कन्नडमध्ये “ಚೆನ್ನಾಗಿದೆ” (चेन्नागिदे) असे म्हणतात. एक कन्नड शब्द आज शिकलो
येता येता ललिता महल बघायला गेलो पण त्याचं आता Five star हॉटेलमध्ये रूपांतर झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही काही जास्त इंटरेस्ट त्यामध्ये घेतला नाही आणि तिथून आलो वर्ल्ड ऑफ म्हैसूर पाक नावाच्या फॅक्टरी outlet मध्ये सर्व व्हरायटी चे म्हैसूर पाक इथे होते आणि बाहेर बॉम्बे चाट म्हणून वडापाव भेळ अशा वस्तूंवर लोक तुटून पडत होते ते पाहिले
तिथून थोड्या वेळासाठी वाटेमध्ये मैसूर मधलं वर्ल्ड फेमस हॉटेल आनंद भुवन म्हणून छान रेस्टॉरंट आहे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे आणि इथे जाऊन चांगल्यापैकी बिर्याणीचा आस्वाद घेतला बिर्याणी त्याच्याबरोबर मसाला पापड आणि ताक असं छान पोटभर जेवण झालं आणि आता वृंदावन गार्डन…

🌸 वृंदावन गार्डन, मैसूर – एक सुंदर बागेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये 🌸
वृंदावन गार्डन (Brindavan Gardens) हे कर्नाटक राज्यातील मैसूर जवळील श्रीरंगपट्टणम येथे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे उद्यान कृष्णराज सागर (KRS) धरणाच्या खाली कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे.
📍 स्थान व इतिहास
– स्थान: मैसूर शहरापासून सुमारे 15–19 किमी अंतरावर, मंड्या जिल्ह्यात
– स्थापना: 1927 मध्ये सुरुवात, 1932 मध्ये पूर्ण
– निर्माता: सर मिर्झा इस्माईल (मैसूरचे दिवाण)
– क्षेत्रफळ: सुमारे 60 एकर
🌿 वैशिष्ट्ये
– टेरेस गार्डन डिझाइन: तीन स्तरांमध्ये विभागलेले, ज्यात लॉन्स, झाडे, वेली, रंगीबेरंगी फुलांची रचना आहे
– संगीतमय फव्वारे (Musical Fountains): रात्रीच्या वेळी संगीताच्या तालावर नाचणारे फव्वारे हे मुख्य आकर्षण आहे आणि ते अत्यंत नयनरम्य आहे
बोटिंग पण आहे पण त्यात काही मज्जा नाही. डॅम दिसत नाही नुसती भिंत दिसते आणि फार छोट्याश्या एरिया मध्ये फिरवून आणतात असे दिसते. पण ज्यांना इंटरेस्ट आहे अशा पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे
प्रकाश योजना: संध्याकाळी संपूर्ण बाग आकर्षक प्रकाशाने उजळते हे आजच्या दिवसाचे खास आकर्षण अनेक हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट येथे चित्रीत झाले आहेत
Musical AI based pan फार छान synchro केलेला हा शो म्हणजे कमाल आहे आणि हजारो गाड्या बसेस आणि बाइकर्स आलेले असतात हे पहायला , ९ लाईन्स आहेत पार्किंग साठी आणि लांबी असते प्रत्येकाची आर्धा पाऊण किलोमीटर इतक्या गाड्या राहू शकतील असे मोठठे पार्किंग
भरपूर फोटो व्हिडिओ काढून आणि डोळ्याचे पारणे फिटेल असा light चा आविष्कार पाहून रात्री परत आलो
उद्या मधुमलाई आणि. उटी
उपेंद्र पेंडसे

