वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

**नाडीज्योतिष्य:एक प्रस्तावना** 2 संध्या राजन

***लेख#२***
(हा लेख वाचण्यापूर्वी माझा पहिला लेख ‘नाडीज्योतिष्य:एक प्रस्तावना’ वाचलेच पाहिजे.

ह्या समूहात ‘संध्या राजन’ असे शोधले तर लेख वाचू शकाल.)

***तमिळनाडूची नवग्रह तीर्थयात्रा***

माझ्या ‘नाडीज्योतिष्य : एक प्रस्तावना’ ह्या लेखाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.. शेकडो वाचकांनी मला संपर्क केला.. संदेश पाठविले.. आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरादाखल मी हे सांगू इच्छिते..
आपल्या सगळ्या आग्रहास्तव आणि मदतीच्या हेतूने मी हा लेख तुमच्यासमोर सादर करतेय..

मी वाचकवर्ग तीन भागात केलेत..
·जे नाडीभविष्य जाणण्यासाठी उत्सुक आहेत..ज्यांना काही समस्या नाहीत पण भविष्याबद्दल कुतूहल आहे..
·ज्यांना समस्या आहेत-नाडीभविष्य, परिहार आणि तीर्थयात्रेची गरज आहे..
·ज्यांना फक्त नवग्रह मंदिरांना भेटी द्यायच्या आहेत..

तुम्ही ह्यात कोठे बसता पहा आणि निर्णय मग घ्या..

फक्त नाडीभविष्य जाणण्यासाठी——

पहिल्यांदा वैतीश्वरन कोइलबद्दल माहिती देते.. ज्यांना नाडीभविष्य जाणण्याची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी .. हे चिदंबरमपासून चार किलो मीटर्स अंतरावर आहे.. कन्याकुमारीपासून ५२२ कि.मी.आहे.. कोइम्बतूरहून ३६७… चेन्नईहून २२ आहे..नाडीभविष्य विचारण्यापूर्वी वैदिश्वरन देवळाला जाऊन आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे..

नवग्रहातील मंगळ किंवा अंगारिका ग्रहाचे इथे देऊळ आहे.. येथील इष्टदेवता वैदिश्वर (वैद्य+ईश्वर) शिव असून त्याला ‘वैद्यनाथर’ किंवा ‘वैतीश्वरन’ म्हणून संबोधले जाते.. इथे देवाची पूजा “इलाज करणारा देव” म्हणून केली जाते आणि त्याबद्दल हे देऊळ प्रसिद्द आहे. संपूर्ण दगडात बांधलेले हे देऊळ खूप भव्य आणि सुंदर आहे.. बाहेर गावी उष्ण तापमान असले तरी देवळात सुखद भावना येते.. अगदी निवांत आणि प्रशांत वाटते.. देवळात पार्वती देवीपण विराजमान आहे जिची पूजा ‘मांगल्यादोष’साठी केली जाते.. आत मंगळाचेही देऊळ आहे.. ज्यांचे लग्न लांबले असेल किंवा होत नसेल त्यासाठी पुजारी अभिषेक करवतात.. हळदीच्या लेपनातले दोऱ्याचे ‘तमिळी मंगळसूत्र’ पुजून देतात.. देवाला मागणीचे दीप लावायला आणि तेल,नारळ, फुल वगैरे सामुग्री जवळच मिळते.. आत सुब्रमण्य देवाचेही मंदिर आहे जिथे दोषपरिहारासाठी वेगवेगळ्या ‘मंडळ पूजा’ करतात…

मंदिरातील आवारात आणि बाहेर नाडीवाचकांची छोटीछोटी कार्यालये आहेत.. सगळे एकसारखेच दिसतात पण माहित असलेल्या किंवा माहिती मिळालेल्या कार्यालयाला जाणे सूक्त आहे. एकदा अंगठ्याचा ठसा दिल्यानंतरची प्रक्रिया आणि वाचनाचे टप्पे मी पूर्वीच्या लेखात दिले आहेत.. त्याचे मार्गदर्शन मिळेल.

मी २००८ला गेले होते तेव्हा मला एक हजार रुपये द्यावे लागले..आता माझ्या अंदाजाप्रमाणे ३००० ते ४००० रुपयांपर्यंत द्यावे लागतील.

आता मूळ नाडीवाचन करणारे फक्त तीनचार कुटुंबे उरली आहेत.. बाकीसगळे नंतर शिकून ज्योतिष्य बघणारे आहेत..

एका मूळ नाडीज्योतिषी कुटुंबाचे कार्यालय ‘वैथीस्वरन कोईल येथे आहे. मी मेसेंजरवर पत्ता देईन.तिथे मी भेट देऊन नाडीभविष्य विचारले आहे.. तुम्ही तिथे जाऊ शकता..खूप अचूकपणे सांगतात आणि समस्येचे परिहारपण करतात.
॰प्रत्यक्ष नाडीवाचन करणेच उत्तम..
॰ऑनलाईन वाचनाला पूर्ण पैसे एकदम देऊ नका..
॰थोडा ऍडव्हान्स तेवढाच द्या..
॰फोनवर कोठलीही माहिती देऊ नका.
॰समस्या सांगू नका..
॰जन्मतारीख देऊ नका.
॰स्वतःची कुंडली घेऊन जाऊ नका..
॰फक्त भेटीची वेळ मागून घ्या..
॰नाडी वाचताना स्वतःच्या फोनवर रिकॉर्ड करून घ्या.
॰कृपया तिथे जाण्याआधी आणि परत येताना मांसाहार आणि मद्यपान टाळावे..
॰भविष्य जाणून घेतल्यानंतर सरळ आपल्या घरी जावे..
॰आपले भविष्य गूढ ठेवावे..कोणालाही सांगून त्याचा अनादर करू नये.

बाकी सगळे मार्गदर्शन मी मागच्या लेखात दिले आहे..तेच कृपया पाळा.

शुभ मस्तु!!!!

फक्त नाडीभविष्य आणि परिहारासाठी-

वरीलप्रमाणे नाडीभविष्य जाणून घेतल्यानंतर ज्यांना परिहार सांगितले जातात त्यात तामिळनाडूच्या काही नवग्रह मंदिराला भेटी, अभिषेक, पूजा आणि दीप लावायचे संकल्प असतात..

सगळी नवग्रह मंदिरे आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांतच आहेत.. भविष्य जाणून घायला एक दिवस जाईल..
नाडीचे गाव मध्यवर्ती धरून पुढचे दोन दिवस मंदिरांना भेटी देऊन यात्रा पूर्ण करा..

समस्येच्या गंभीरतेवर परिहार दिलेले असतात..ते खूप भक्ती आणि विश्वासाने पाळावे लागतात..
आणि ती दशा आणि वाईट काळ संपेपर्यंत संयम घ्यावा.
सगळ्या परिहारातून पूर्वजन्माची कर्माचे शुद्धीकरण आणि पुण्य संचय होत असतो..
पिढ्यापिढ्यापासून चालत आलेल्या दोषांचे निवारण होत असते त्यामुळे त्यांनी सुचवलेला पूर्ण काळ तनमन कायावाचे शुचिर्भूत राहिले की शुभकाळ येणे सुलभ होते..

स्थानीय हॉटेल किंवा लोक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील..दररोज अश्या लोकल ट्रिप्स असतात.. परत कधी येऊन करणे कठीण होऊ शकते. ..
एकंदरीत तीनचार दिवसांचा प्रवास ठरवा ..

मी पूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ज्याच्या नशिबात समस्यानिवारण होणे दैवी इच्छा आहे अशांनाच नाडीभविष्य जाणून घेण्याचे भाग मिळते अशी मान्यता आहे…पहा तुम्हाला तसे भाग्य आहे का..
आणि नशिबात असेल तरच तुमची पाने मिळू शकतात.. नाहीतर नाही.. देवेच्छा…

पूर्ण भविष्यात ते जातकाचा अंतिमकाल तिथीद्वारे सुचवतात..घाबरण्याचे काही कारण नाही.. कारण ज्यांना दीर्घायु प्राप्त आहे तेच नाडीपर्यंत पोचतात.. दैवीसंकल्प असेल…

फक्त नवग्रह मंदिरांना भेटी-

हिंदू खगोलशास्त्राप्रमाणे नऊ ग्रह देवता सूर्य , चंद्र , अंगारकन (मंगळ), बुध , गुरु, शुक्र , शनी, राहू आणि केतू आहेत. तमिळनाडूतील प्रत्येक नवग्रह मंदिर पुरातन, गूढ आणि प्रभावी आहे. सगळ्या नवग्रह मंदिरांच्या तीर्थयात्रा आणि प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या जीवनावरील ग्रहांचे वाईट प्रभाव दूर होण्यास लाभ मिळतो, मनःशांती मिळते आणि दोषनिवारण होते अशी जवळजवळ सगळ्या दक्षिण भारतीयांची भावना आहे..

मी जेव्हा पहिल्यांदा बेंगळूरहून नवग्रह यात्रा केली ती कुंभकोणम ह्या गावी जाऊन.. तुमच्या गावाहून तिथे कसे पोचावे ते पहा..

कुंभकोणम हे सगळ्या नवग्रह मंदिरांचे केंद्रस्थान आहे आणि तिथून आजूबाजूला जाणे खूप सोपे आहे..
सूर्य नवग्रहस्थलम् सूर्यनर कोविल ह्या गावात आहे..
चंद्र नवग्रहस्थलम कैलासनाथर मंदिर, थिंगलूर येथे आहे..
अंगारकन नवग्रहस्थलम् हे वैतीश्वरण कोविल गावात..
बुध नवग्रहस्थलम् हे तिरुवेंकाडूत.. गुरु नवग्रहस्थलम् — अलंगुडी,
शुक्र नवग्रहस्थलम – अग्निेश्वर मंदिर, कांजनूर गावात,
शनि नवग्रहस्थलम – थिरुनाल्लर सनीेश्वरन मंदिर,थिरुनाल्लर आणि
राहू नवग्रहस्थलम – श्री नागनाथस्वामी मंदिर, थिरुनागेश्वरम;
शेवटी केतू नवग्रहस्थलम – कीझपेरुमपल्लम गावात स्थित आहेत.

प्रत्येक ग्रह मंदिरात इष्ट देवता शिवपार्वतीच असतात..त्यांच्यासोबत त्या ग्रहाची देवता प्रकट असते..

आम्ही तिथल्या ‘श्रियास’ ह्या हॉटेलात उतरलो होता..अगदी इकॉनॉमी हॉटेल असले तरी छान आहे..त्यांनीच आम्हाला दोन दिवसांसाठी कार भाड्याने करवून दिल्या..
तिथले वाहनचालक तीर्थयात्रेच्या प्रवासात निपुण मार्गदर्शक असतात..
देवळांच्या वेळा त्यांना माहित असतात.. अभिषेक, पूजा अर्चाबद्दल सगळे माहित असते..फक्त भाषा अनुवादाला तयार राहा..

हवा उष्ण असल्याने सूती कपडे, छत्री, कॅप्स आणि गॉगल्स घेऊन जायला विसरू नका..

पूर्ण तामिळनाडूत जेवण छान मिळते..छोट्याछोट्या हॉटेलातही अगदी कमी दरात खूप चांगले नाश्त्याचे आणि जेवणाचे पदार्थ मिळतात..

दक्षिण भारतीय जेवणखाण अगदी आनंदाने नावे न ठेवता करा.. अन्न हे परब्रह्म..

तमिळ लोक जास्ती हिंदी आणि इंग्रजी बोलत नाहीत.. गुगल ट्रान्सलेटमध्ये वाक्ये घालून उच्चारायचा प्रयत्न करा.

पर्यटन न समजता तीर्थयात्रा म्हणून भक्तिभावाने जावा..

कोठलाही संकुचितपणा न ठेवता गेलेले काम यशस्वीपणे पार पाडून या…तिथले न्यूनगंड काढण्यापेक्षा तुमचे काम खूप महत्वाचे आहे…..

शुभ मस्तु .. सर्वे जन: सुखिनो भवन्तु….
***संध्या राजन***

(नाडीजोतिष्य पाहण्याचा निर्णय घेण्यापूर्वी माझा तिसरा लेखपण वाचायला विसरू नका.
मी लवकरच पोस्ट करेन😊)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}