देश विदेश

जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…

तुम्हला ठाऊक आहे का??जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते..???
जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…
🚩
🗡️
⚔️
🗡️
⚔️
🗡️
⚔️
🗡️
⚔️

२५ फेब्रुवारी

तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता. त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट वर कसलेला सेनापती. त्या तरुण विराकडे सैन्य फक्त २५,००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.

नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.

अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरूण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले.
अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तो ही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

२५ फेब्रुवारी १७२८ – पालखेडची लढाई

तो बलाढ्य शत्रू :- निजाम उल मुल्क
वय : ५७,

ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
वय : २८ फक्त….

आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा असा जाज्वल्य इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा…🚩🚩🚩

पण आपले दुर्दैव की पेशवे म्हणजे बाहेरख्याली.पेशवे म्हणजे मौजमजा करणारे असं काहीस समोर आणलं जातं. त्यांचा तेजस्वी इतिहास जाणून बुजून झाकून ठेवून विकृतपणा समोर आणला जातो.

हे आपल्या गौरवशाली इतिहास असलेल्या देशासाठी घातक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}