Classified

चोर बझार लेखन व माहिती संकलन: रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी चित्र संकलन: रत्नाकर येनजी

चोर बझार

त्याकाळात गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच गदिमा हे नाव व ब्रँण्ड लोकांच्या फारच पसंतीस उतरला होता. गदिमांनी रसिकांसमोर जे गारुड घातले ते आजतागायत कायम आहे. त्या काळातील गदिमा यांचा सिनेमा सृष्टीतील लौकिक पाहुन हिंदी चित्रपट सृष्टीतीले एक अभिनेता असलेला निर्माता व दिग्दर्शक स्वतःहुन गदिमांना भेटायला गेला. आपल्या नवीन आगामी चित्रपटासाठी काहीतरी आगळी वेगळी गोष्ट ऐकवावी अशी गदिमांकडे इच्छा व्यक्त केली. गदिमांनी त्या अभिनेत्यास समाजात काही किमंत नसलेल्या एका शायरची गोष्ट ऐकवली. अभिनेता व दिग्दर्शक असलेल्या निर्मात्याने ती गोष्ट ऐकल्यावर त्याला एवढी आवडली की प्रभावित होऊन त्यांने ताबडतोब गदिमांना चक्क दहा हजार रुपायांचा चेकही दिला. गदिमांनी त्या कथेवर काम सुरु केले. काही दिवसांतच त्या निर्माता दिग्दर्शक असलेल्या अभिनेता असलेल्या स्टोरी डिपार्टमेंटची माणसे गदिमांना भेटायला आली. आणि त्यांच्या मुळ कथेत काही मसालेदार बदल सुचवायला लागली. आपल्या मुळ कथेत कोणी वाटेल ती ढवळाढवळ केलेली गदिमांना अजिबात खपायची नाही. ते समोरच्याला चांगलेच धारेवर धरायचे. गदिमांना त्या अभिनेताच्या स्टोरी डिपार्टमेंट च्या मंडळीचे ते मसालेदार बदल अजिबात रुचले नाहीत. त्यांनी ताबडतोब ॲडव्हान्स म्हणुन मिळालेली रक्कम त्या माणसांना परत केली आणि,
” मला हे काम करायला जमणार नाही!”
असे स्पष्टपणे सांगितले. पुढे काही काळ गेला आणि एक दोन वर्षातच त्या अभिनेता, दिग्दर्शक व निर्मात्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे तो चित्रपट त्या अभिनेत्याच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरला. त्याला अपार यशही मिळाले.पण गदिमांच्या कथेवर आधारित चित्रपट करुनही त्यांने त्याचे श्रेय मात्र गदिमांना दिले नाही.
गदिमांच्या ‘चोर बझार” या कवितेवर आधारलेला हा चित्रपट म्हणजे गुरुदत्त यांचा ‘ प्यासा’ चित्रपट!. या किंवा अनेक कारणांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले गदिमा जास्त रमले नाहीत. मराठी चित्रपटसृष्टी साठी मात्र त्यांनी भरीव योगदान दिले.
आपण इंटरनेटवर जाऊन स्वर्गीय गुरुदत्त यांच्या १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’ चित्रपटा विषयी माहिती घेतली असता त्यात असे आढळते की या चित्रपट कथानकाचे श्रेय नामावलीत स्वतः गुरुदत्त व अबरार अलवी यांना दिले जाते. पण खरी वस्तुस्थिती सांगायची झाल्यास ह्या चित्रपटाची मुळ कथा आपल्या गदिमांची होती हे मला KuKu FM वर गदिमा बद्दल ऑडिओ ऐकताना समजले.

लेखन व माहिती संकलन: रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी
चित्र संकलन: रत्नाकर येनजी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}