दुर्गाशक्तीवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नवरात्री तृतीय दिवस…. माता श्री चंद्रघंटा.. संकलन – अनघा वैद्य .

माता श्री चंद्रघंटा

माता श्री चंद्रघंटा या देवी दुर्गांचे तिसरे रूप आहे, ज्यांच्या कपाळावर चंद्रकोर असते, म्हणून त्यांना चंद्रघंटा म्हणतात. त्या सिंहावर बसलेल्या असतात आणि त्यांच्या दहा हातात विविध शस्त्रे असतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या कृपेने भक्तांचे सर्व त्रास दूर होतात, त्यांना शौर्य, कृपेने आणि धैर्याने बक्षीस मिळते.

श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती सुमारे ७ व्या शतकात चालुक्य वंशाच्या काळात झाली,
शिलाहार वंशाने देखील याच्या विकासात योगदान दिले आहे. हे मंदिर शक्तिपीठांपैकी एक असून, ते भक्ती, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम आहे. स्थानिक लोक देवीला ‘अंबाबाई’ म्हणतात आणि कोल्हापूरच्या महात्म्यानुसार, कोलासुर राक्षसापासून संरक्षण करण्यासाठी देवी इथे आली होती.
या मंदिराचा इतिहास अंदाजे १२शे वर्षांपूर्वीचा आहे.
एका शिलालेखानुसार, हे मंदिर चालुक्य राजवंशाने ७व्या शतकात बांधले.
या मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती ७व्या शतकातील असून, त्यानंतर अनेक दुरुस्त्या व बदल करण्यात आले. १९व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला.
कोल्हापूर हे शक्तिपीठांपैकी एक मानले जाते आणि येथे येणाऱ्या भक्तांसाठी तिरुपती बालाजीचे दर्शन कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी दर्शनाशिवाय अपूर्ण मानले जाते.
अनेक राजांच्या काळात या मंदिराचा विकास झाला, यात शिलाहार आणि यादव या राजवंशांचाही समावेश आहे.
श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मुख्य देवता म्हणून माता देवी श्री महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून, ती चार हातांची आहे. मातेच्या हातात पानपात्र, गदा, ढाल आणि फळ आहे. मंदिरात देवी श्री महालक्ष्मी अंबाबाई सोबतच श्री महाकाली आणि श्री महासरस्वती यांच्या मूर्तीही आहेत, ज्या महाशक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्तीही आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे.
मंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही काही जण सांगतात. हा खजाना 3 वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे.
खजान्यात सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्याचा हार, सोन्याची साखळी, चांदीची तलवार, श्री महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंघरू आणि हिऱ्याचे हार, मुगल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचा समावेश आहे.
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाही, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी दान केले आहे.
मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली 10 दिवस खजिन्याची मोजदाद करण्यात येते.
खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिण्यांचा विमा काढण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराचा खजाना 1962 मध्ये उघडण्यात आला होता.

1800 वर्ष जुने मंदिर
मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे.
शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली.
27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती.

नाही मोजता येत मंदिराचे खांब
मंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही. मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या. विज्ञान अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही.
सांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. येथे श्री महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते.
मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातून एकदा श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात.
या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात श्री महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मूर्ती आहे.
काही जण असेही सांगतात की श्री तिरुपती म्हणजे भगवान श्री विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी श्री महालक्ष्मी कोल्हापूरला आली.
काही वर्षांपासून श्री तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी श्री महालक्ष्मीला घालण्यात येत होती.
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते.
दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते.

संकलन – अनघा वैद्य

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}