Classifiedमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Article on Fundamental analysis Part 1 : Akshay Parkhi CA .. Our member

साधारण पणे ४५ वयानंतर, चालू होणारा आयुष्याचा प्रवास, हि आयुष्याची सेकंड इंनिंग (Second Inning) असे
म्हणता येईल.
आयुष्यात लहान पणीच्या अल्लड , खूप कमी विचार करून जगण्याच्या आयुष्यातून आपण आयुष्यतल्या
महत्व्याचा टप्यात म्हणजे adult age मध्ये प्रवेश करतो. खूप happening अशा ह्या वयात आपल्या करिअर,
संसारीक आयुष्यात होण्याऱ्या घटना, ह्या खूप वेगवान होतात. काही वेळा आपण फक्त आणि फक्त कामासाठी ,
परिवारा साठी धावत असतो. "मला वेळ नाही रे" असे आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रीणना सांगण्याची वेळ असते
ती.
नोकरी ऑफिस चे टेन्शन, घरी मुले आई वडील जवळच्या लोकांना वेळ देण्यात आपण “आपल्या” साठी फार वेळ
काही देऊ शकत नाही.
ह्यात सगळ्यात important ठरते ते धावपळ. आपल्याला आवडत असतील किंवा नसतील अशा नोकऱ्या करून
"पैसे" मिळवतो. "पैसा "हा जीवनातला खूप अविभाजक भाग.
साधारण पणे वयाच्या ४५ नंतर आपल्या आयुष्यातील स्थिर वाटचाल सुरु होते. मुले समजण्याचा वयात
आलेली असतात. नोकरीत एका position मध्ये आलेलो असतो . ह्या सगळ्यात आपली तब्येत जर
चांगली असेल तर उत्तमच.
मग कधी घरी, मित्र मैत्रिणींमध्ये निघालेला हमखास विषय "काय रे आपण आपले जीवन आपल्या साठी
हवे त्याप्रमाणे जीवन जगतो आहे का". साधारण पणे ह्याचे उत्तर " बिलकुल नाही "असे येते. बस यार
आता आपण आपले जीवन जगायचे”.
या वयात काय मिळवले आहे हे कळते पण काय गमावले आहे ती खंत विचारात येत असते.
जर पुढच्या प्रवासाची आखणी करायची असेल तर ४५ वयापासून त्याचे नियोजन चालू करणे योग्य ठरते.
पैसा किती कमवावा कि जो आयुष्य भर पुरेल हे गणित मांडणे तसे कठीणच असते. हे गणित जरी
कठीण असले तरी impossible असे नाही.
आपल्या मूलभूत गरजा, ह्यातील "आपल्या " हा खूप मह्त्वाचा शब्द्ध आहे. वयाचा तिशीत "आपण"
म्हणले कि नवरा बायको मुले आई वडील काहीजवळचे नातेवाईक येत असतात. त्यांचा खर्च त्या वेळचा
Cash Inflow ने कठीण वाटत नसतो.

जेव्हा पण आपण आपले पैशाचे नियोजन करतो तेव्हा ह्या “सगळ्यांचा” विचार करायचा आहे का “आपण”
आणि “आपल्या” जीवन साथी चा विचार करायचा आहे हे मह्त्वाचे ठरते.
आपली मुले ही आपल्या आयुष्यातील आई वडिलांसारखा अविभाज्य भाग. त्यांच्या आनंदात जेवढे आपण
डुबून जात नसू तेवढे त्यांचा विषयी वाटण्यारा काळजीने चिंतीत असतो. ह्यात त्यांचेच गुण अवगुण
स्वभाव हे आपल्या जास्त माहित असतात किंवा त्यात आपली PH D झालेली असते, म्हणून का काय
त्यांच्या विचाराने आपण आपल्या आयुष्याच्या निर्णयात पण बांधलेले असतो.
आपण ह्या विचारातून बाहेर आलेलो असेल तर मग मुलांचे relation मित्रत्वाकडे गेलेले असते. Children
are financially not dependent on us. असे केले तर मग आपले financial planning खूप सोप्पे
असते.
वयाच्या एका पायरीवर मुले त्यांच्या आयुष्यात रमून जाणार हि नियती आहे. अर्थात ह्यात emotional
attachment हि प्रत्येकाची वेगळी असते. पण emotional attachment चा पुढे financial
dependency असेल तर गुंतागुंत तशीच राहू शकते.
आता थोडा विचार आपल्या Financial planning चा:
वयाच्या ४५ मध्ये साधारण पणे आपले राहाते घर असणे जरुरी असते. घराचे Loan संपलेले किंवा एक
दोन वर्षात संपेल असे असावे.
घरा बाबतीत खूप अपेक्षा असतात. काही जणांनी ह्या पेक्षा अजून चांगले किंवा आपल्या गावाला घर बांधून राहू
ह्याचा विचार केलेला असतो. हे नियोजन प्रत्येकाचे वेगळे असू शकते. ह्यात आपण desire to achieve our goal
आणि leaving everything for our dream. ह्याचा विचार करून घ्यायला पाहिजे.
Investment च्या दृष्टीने PPF, PF, पोस्टाच्या योजना ह्यात सोप्पी गुंतवणूक करणे सोईस्कर असते.
Measureable goals म्हणजे एका अमुक वेळेस इतके पैसे आपल्याला मिळत राहातील हे माहिती पाहिजे.
साधारणपणे, २०,००० पर्येंत घराचे Rent आणि investment मधून ३०,००० दर महिना मिळाले तर
५०,००० पर्येंत दोन जणांसाठी महिन्याला लागणाऱ्या पैशाचे नियोजन होऊ शकते.
ह्या सगळ्यात आपण खूप सोप्पे इन्व्हेस्टमेंट प्लॅन समोर ठेवले आहेत.

हे सगळे planning आपण ४५ मध्ये करत आहोत. पुढच्या १५ वर्षाने ५० ते ६० हजार पुरतील का हा एक
सहज डोक्यांत आलेला प्रश्न. कदाचित कमीच पडतील. पण इतके तरी लागतील हे जर लक्षात आले तर
आपले विचार, बुद्धी त्या कामात लावायला लागू.
ज्याला हे कमी वाटत असेल त्यांनी त्याचा गरजा आणि त्यांना पुढे लागणारे पैसे ह्याचे गणित मांडावे.
दोन वेळेला जेवणे ही गरज आहे. म्हणजे breakfast न करता दुपारी ११-१२ ला पूर्ण जेवून घेणे आणि
रात्री ८ ला जेवले हि गरज आहे.
एका छान अशा luxury car मधून retirement नंतर भटकंती करणे हि गरज असू शकते पण त्या पेक्षा
जास्त ही गरजे पुढची जरुरत आहे. अर्थात आपल्या गरजांचा विषय मांडण्याचा किंवा त्यात लढाई
करण्याचा हा लेख नाही . तर त्या गरजा कोणत्या आहेत ह्याची लिस्ट कराव्यात हे सांगण्याचा लेख
आहे.
तूर्त तरी इकडे थांबत आहे. Second Inning चा Second part अजून बाकी आहे. तो ह्या part पेक्षा
जास्त रोचक आणि खूप काही करण्या सारखे आहे हे सांगणारा असेल.
आपला हा लेख आपल्यावर म्हणजे "स्वतः" वर आहे. हा second inning मध्ये आपण आपल्याला
शोधणार आहे आणि आपल्या साठी वेळ, पैसा ची provision करणार आहे.
लहानपणी स्वतः चा विचार करतो तो स्वार्थी असे सांगितले जाते. काही वयात कौटुंबिक जबाबदारीतुन जर
बाहेर येऊन, आपण आपल्या आवडी निवडी साठी वेळ आणि पैसा ठेवत असू तर तो स्वार्थ आपल्या
आयुष्यात नक्कीच काही चांगले क्षण देऊन जाणार असतो, तर ते क्षण उपभोगायचे का नाही हा आपला
स्वतः चा निर्णय असेल.

Best Regards

Akshay Parkhi ,

aksh747@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}