कथा – मनभेद ले-अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे
“कथा – मनभेद
—————————-
पाच वर्षानंतर पहिल्यांदा अभिलाषा मायदेशात परतत होती , होय ,या येण्याला परतणे “असेच म्हणणे योग्य होते.
कारण यापुढे तिकडे ..त्याच्याकडे ..सिद्धेशकडे परत जाण्याचा प्रश्नच नव्हता .
तिने स्वतःच्या हाताने “परतीचे सारे दोर कापून टाकलेत ” तिचा झालेला भ्रम-निरास , आणि त्याच्याशी असलेले नाते, न जुळू शकलेले भावबंध कोरडेपणाने संपवून टाकीत , .
अभिलाषा परत आपल्या मायदेशात -माय-बापाकडे निघाली..
तिच्या या निर्णयाचे कुणाला काही वाटावे ? हा प्रश्नच नव्हता ..स्वतहा अभिलाषा ,तिच्या बॉसच्या सिद्धेशच्या – प्रेमात पडली , त्याच्या करीयरची झेप , त्याच्या
महत्वाकांक्षा आणि दिपवून टाकणारी स्वप्ने ..याचीच “अभिलाषा “जणू या अभिलाषाच्या मनात निर्माण झाली. आणि झपाटल्यासारखी ती “सिद्धेशच्या “आयुष्यात
स्वतःला झोकून देत ..त्याच्या मागे ..त्याच्या सोबत ..परदेशात निघून गेली ..
गावाकडे असलेल्या तिच्या आई-बाबांना , भाऊ आणि वाहिनीला फक्त फोनवरून सगळे टाकले .
स्वतःचे म्हणणे खरे करणारी जिद्दी ,हेकेखोर अभिलाषा ..चुकते आहे ” हे सांगण्याची आई-बाबांची इच्छा त्यांच्या मनात राहून गेली .
आपल्या लेकीला ..आपण जमिनीवर आणू शकणार नाही ” हे सत्य ..स्वीकारून .
तिच्या आईबाबांनी मन घट्ट करून लेकीला एअर-पोर्टवर हसतमुखाने निरोप दिला होता.
” नव्याचे नऊ दिवस सरले की हवेत असलेले पाय जमिनीवर टेकतात “आणि स्वप्नांच्या बुडबुड्या ऐवजी काटेरी जमीन पायाला टोचू लागते ..
सिद्धेशच्या मनात “अभिलाषा विषयी प्रेम-भावना वगेरे असे काही नव्हते
त्याने एका गोष्टीची काळजी घेतली ..तिच्या मनात कायम अस्वस्थता ,असुरक्षितता राहील याचीच तो काळजी घेत असे.
अभिलाषाने किती प्रयत्न करो ..आणि रात्रीच्या वेळेत ..त्यांच्यात ..पती-पत्नी – हे सहजीवन सह-आनंद , सह-सुख ” हे असले काही नव्हते .
सिद्धेशच्या मनात आले आणि त्याच्या मनात असले तर .त्याच वेळेपुरती ..अभिलाषा आणि सिद्धेश यांची जवळीक व्हायची .
भांडणे , वाद-विवाद , अबोला ,यातील एकाही गोष्टीचा परिणाम सिद्धेश्वर होत नसे , तो यापुढे कधी होणार नाही ..या सत्याचा स्वीकार अभिलाषाला करावा लागला.
दूर परदेशात आपण एकाकी आहोत, असहाय आहोत ..ही भावना अभिलाषाच्या मनात प्रबल होत गेली ..
.एक प्रकारचे डिप्रेशन आले तिला .
याचा परिणाम सिद्धेशच्या दिनक्रमावर काहीच झाला नाही , तो त्याच्या ऑफिस आणि करियरमध्ये हरवून गेला ..
हे पाहून या सिद्धेशच्या जीवनात यापुढे आपल्याला काडीचीही किंमत नाही ,ही जाणीव झाली.
त्याच्या लेखी ..अभिलाषा फक्त ..घरात असलेली एक केअर -टेकर होती. , फरक एकच ..लग्न केलेले असल्यामुळे ..
पगारी -नोकर .असे न म्हणता ..हाऊस- वाईफ ” आहे असे तो आवर्जून सांगत असे.
कोरड्या मनाचा , दगडी काळजाच्या या नवर्याला काय म्हणावे ?, ज्याच्या मनात ..सहजीवनाच्या भावना , पती-पत्नी , जोडीदार ,
साथ-सोबत ” या शब्दंना कवडीची किंमत नाहीये . त्याच्या हाकेला “ओ” देणारी ..एक स्त्री ,एक बाई ..त्याने आपल्यात पाहिली …
बस ,आपल्या देहाचा उपभोग हाच त्याच्यासाठी आपला “उपयोग ” त्यला न घराची गोडी , न संसाराची , ना संसारातील सुखांची ..
अभिलाषा अलीकडे स्वतःवर चिडून जाई , राग-राग करी , या अशा विचित्र माणसाच्या प्रेमात का पडलो ?
.सिद्धेशने आपल्याला नकार दिला नाही ..” हाच त्याचा आपण “होकार “समजलो , आणि “प्रेमात आंधळे होऊन ..स्वताची फरपट करून घेत जगत आहोत .
कोणत्या तोंडाने ..आपण आपल्या आई-बाबांना , घरातील आपल्या माणसांना हे सांगणार ?
तिची एक मैत्रीण .मानसिक उपचार तज्ञ,होती . अभिलाषाने तिच्याशी संपर्क साधला ..दोघीच्या दोन-तीन वेळा संवाद -भेटी झाल्या . डॉक्टर फ्रेंड म्हणाली –
अभिलाषा –
तुझ्या भेटीनंतर ..मी सिद्धेशला भेटले , तो स्वतःला अतिशय हुशारीने प्रेझेन्ट करतो , त्यामुळे ..”तुझ्यासाठी तो जसा आहे ” बाहेरच्यासाठी अर्थातच तसा नाहीये .
एक नक्की आहे अभिलाषा – तुम्हा दोघात नवरा-बायको , पती-पत्नी ..या नाते-स्वरूपाला ” काही आकार नाही, कारण त्याच्या
मनात या भावनांना स्थानच नाही . “कोरड्या मनाचा , बराचसा “विरक्त -वृत्तीचा हा पुरुष “तुझ्यासाठी “तुझा नवरा ” किंवा
त्याची तू बायको ” तुम्हा ” दोघांचे काही खरे नाही.
माझ्या मते ..तू स्वतःला .सिद्धेशपासून दूर करवून घ्यावेस . आणि इथल्या वातवरणात विभक्त झाल्याने कुणावर आभाळ कोसळले
असे वाटण्याची काडीमात्र शक्यता नाही.
तू स्वतहा सिद्धेशशी बोल ..काय सांगावे –
तो निर्विकारपणे .”तू तुझ्या देशात परत जाऊ शकतेस , मी तुला बंधन-मुक्त करीत आहे..असे म्हणेल सुद्धा .
अभिलाषा थंड मनाने स्वतःला दोष देऊ लागली – ”
भेद तरी किती असावेत ..विचारंचे भेद ,आचारांचे भेद ..मतांचे भेद ” हे सगळे प्रयत्नांनी हे दूर होतात ..
पण..जिथे मन -भेद असतात ,तिथे काय होणार ..?
जे आपले झाले तसे होणार .
आपणच स्वतः च या उध्वस्तास जबाबदार आहोत.
अभिलाषाचे विमान मायदेशातील जमिनीवर सुखरूप उतरले ..ती आपल्या माणसांच्या घराकडे निघाली ..
————————————————————————————————————————–
ले-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
