Classifiedदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर डॉ विभा देशपांडे यांची अनोखी संकल्पना

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर डॉ विभा देशपांडे यांची अनोखी संकल्पना 2 7 2024

सूर्यकुमार यादवचा झेल ठरला निर्णायक! टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव

टीम इंडियाने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका संघाला १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६९ धावाच करता आल्या

भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल टी२० विश्वचषक २०२४
T20 World Cup 2024, IND vs SA Final: भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने पाच सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या.

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

भारताने १७ व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले. १६ षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७ व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. १८ व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर डॉ विभा देशपांडे यांची अनोखी संकल्पना 2 7 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}