डीव्हीडी कॉर्नर आज कि खुश खबर डॉ विभा देशपांडे 9 7 2024
डीव्हीडी कॉर्नर आज कि खुश खबर डॉ विभा देशपांडे 9 7 2024
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती;
महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाजच्या फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला.
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलपासून सुटका व्हावी म्हणून ग्राहकांनी आपला मोर्चा ईव्ही वाहनांकडे वळवला आहे. ईलेक्ट्रीक (EV) वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत असून चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांच्याही विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 2 वर्षा ईव्ही बाईकधारकांची संख्या वाढल्याने या बाईकची चर्चा होत असते. त्यातच, आता बजाज ऑटो (Bajaj) कंपनीने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. कारण, आजपर्यंत केवळ चार चाकी वाहनांमध्ये असलेला सीएनजी (CNG) पॅटर्न आता दुचाकी वाहनांतही उतरवला आहे. बजाज कंपनीने जगातील पहिली दुचाकी बाजारात उतरवली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील मराठमोळ्या ग्राहकांनाही आजपासूनच या दुचाकीची खरेदी करता येईल
देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाजच्या फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात भाषण करताना नितीन गडकरी यांनी बजाज कंपनीकडून बाईकच्या किंमतीबाबतची अपेक्षा बोलून दाखवली होती. 1 लाख रुपयांच्या आत या बाईकची किंमत असावी, असे गडकरी यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे बजाज कंपनीनेही मंत्री महोदयांच्या शब्दाचा मान राखत त्यांनी अपेक्षित केलेल्या किंमतीप्रमाणेच या सीएनजी बाईकची किंमत ठेवली आहे. त्यानुसार, 95 हजार ते 1 लाख 10 हजार रुपयांना तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये ही सीएनजी बाईक ग्राहकांना खरेदी करता येणार आहे
2 किलो सीएनजीमध्ये 230 किमी average
बजाज कंपनीने या पहिल्या-वहिल्या सीएनजी बाईकची निर्मिती केली असून आपल्या महाराष्ट्रातच याचा लाँचिंग सोहळा संपन्न झाला. सीएनजी प्लस पेट्रोल अशी ही हायब्रीड बाईक आहे. दोन किलो सीएनजी आणि दोन लिटर पेट्रोलवर ही बाईक 230 किलोमीटरचं अंतर कापते. तर, 2 किलो सीएनजीच्या टाकीमध्ये ती 230 किमीचा टप्पा गाठते. त्यामुळे, सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीचा वापर करुन ग्राहकांना या बाईकची परवडणारी सफर करता येणार आहे.
3 मॉडेल, परवडणारी किंमत
विविध रंगांच्या तीन मॉडेलमध्ये असलेल्या या बाईकची किंमत 95 हजार ते 1 लाख 10 हजार इतकी किंमत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपासून ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे, सीएनजी बाईकची खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना आता लवकरच सीएनजी बाईकधारक होता येईल.
देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाजच्या फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात भाषण करताना नितीन गडकरी यांनी बजाज कंपनीकडून बाईकच्या किंमतीबाबतची अपेक्षा बोलून दाखवली होती. 1 लाख रुपयांच्या आत या बाईकची किंमत असावी, असे गडकरी यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे बजाज कंपनीनेही मंत्री महोदयांच्या शब्दाचा मान राखत त्यांनी अपेक्षित केलेल्या किंमतीप्रमाणेच या सीएनजी बाईकची किंमत ठेवली आहे. त्यानुसार, 95 हजार ते 1 लाख 10 हजार रुपयांना तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये ही सीएनजी बाईक ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
राजीव बजाज यांना गडकरींकडून अपेक्षा
या बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईक ही “बजाजची गॅरंटी” आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात ‘नितीन गडकरींची गॅरंटी’ असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्री महोदयांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपांची देशभरात कमतरता आहे, या सीएनजी पपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. या अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे, बजाजकडून सीएनजी बाईकची गॅरंटी देण्यात आली असली तरी, सीएनजी पंपांची संख्या लक्षात घेता, वाहनधारकांना जास्तीत-जास्त सीएनजी पेट्रोल पंपांची गरज भासणार आहे