गोफ विणू बाई गोफ विणू …नात्यांची गोफ विणू आरती सिन्नरकर
गोफ विणू बाई गोफ विणू …नात्यांची गोफ विणू
आज मैत्रिणीनं बरोबर अंगणात कट्ट्यावर गप्पा मारताना 2 गट पडले…घरात सासू सासरे असणाऱ्या आणि विभक्त परिवार असणाऱ्या…
प्रत्येकीच्या मनात वेगवेगळ्या भावना…ऐकताना मोठी गंमत वाटली..सासू सासरे असणारी जबाबदाऱ्या आहेत कित्ती हे सांगणारी तर विभक्त राहणारी बर आहे बाई मदत तरी करतात म्हणून स्वतःच दुःख कुरवळणारी😀
नंतर माझ्या कडे वळून तुझ काय ग…म्हणून मला त्रास देणाऱ्या…त्यावर मी सोडून सगळ्यांचं आपापल उत्तर पण तयार…ती काय बाई साधू संत कॅटेगरी वाली आहे. तिला काही त्रास नाही असला तरी बोलणार नाही. हिच्या सूनेच पण बर…असणार …सासू काही म्हणून बोलणार नाही…मी नुसतीच गालात हसून पाहिलं ..अग बोल की म्हणून मैत्रीणी वैतागल्या…
मी सहज म्हटल अग नाण्याच्या 2 बाजू असणारच ना.. तस आहे ..नात्यांचं..त्यात साधू काय नि संत काय.
लग्नाआधी आई बाबा ,भावंडं..ह्यांच्या मध्ये आपण हक्काने वावरत असतो..सासरी तो हक्क गाजवायला थोडा वेळ लागतो.अग आई असते तश्या अहो आई असतात..पण त्यांनी काही सांगितलं की सूचना म्हणून आपल्याला राग येतो. तस आपले ड्रेस हक्कने घेणारी आपली बहीण अगदी न विचारता ते घेते घालते…तेव्हा आपण शाब्दिक चकमक खेळतो च की…मग नणंद भावजय ह्या नात्यात औपचारिक पणा का येतो..एक नवरा मध्ये असतो म्हणून नात्याचा इतका गुंता का होतो.
मित्र मैत्रिणी ह्या नात्यात सुध्धा वैचारिक भेद असतातच पण मैत्री सांभाळत आपण ते जपतो. कारण ती मैत्री आपल्याला हवी हवी हवीशी असते.
नात्यांचं पण तसच असत जी नाती आपल्याला हवी हवी शी असतात ती नाती आपण रेशमी धाग्यासारखी जपतो. आणि जी नाती आपल्यावर लादलेली आहेत अस वाटत ती नाती आपण सुरुवातीपासूनच दोरखंड आहेत अस समजून त्यांना तोडायच्या मागे लागतो. त्यांना जपायची मेहनत ही घेत नाही आणि त्यातला नाजुक धागा पण समजून घेत नाही …
मी आपली सहज बोलत होते..ह्या सगळ्या गप्पच..अग माझ्या सासू बाई आणि मी आमच्यात वैचारिक भेद नाहीत असं अजिबातच नाही…पण सासरी घरात रुळेपर्यंत मी प्रत्येकाला आईकात होते अनुभवत होते त्यामुळे नात्याचा गुंता कधी जरी झालाच तर त्यातून सोडवायला माझ्या बहीण नंनदा माझ्या पाठीशी नाही तर माझ्या बरोबर असायच्या.
मुलांच्या लहानपणापासून माझ्या नवरा, सासू सासरे सगळ्यांनीच मला मदत केली…सूचना केल्या कधी कधी राग पण आला शेवटी मी माणूसच ना..
पण माझ्या नात्यांनी मला खूप काही शिकवलं…आईने शिस्त शिकवली..सासू बाईंनी श्री सुक्त शिकवलं…बाबांनी स्वावलंबन शिकवल..सासरे बुवा माझ्या लेखनाचे समीक्षक बनले, बहिणी माझ्या कला गुणांना पाठिंबा देत होत्या नणंद त्याच कौतुक करणाऱ्या …नवरा उत्तम मित्र बनला जो चुकल्या वाटेवरून परत योग्य दिशा दाखवणारा आहे. मुलं ज्यांच्यावर किती ही राग काढला..फटके दिले तरी त्यांनी आई म्हणून मला सांभाळून घेतलाच की…सगळीच आपलीच माणस..आपलीच नाती..रेशमासारखी नाजुकच..कोणी दोरखंड म्हणून जरी दाखवली तरी आपण ती कशी पाहतो ती तशीच दिसतात तशीच जपली जातात..जवळची असतात कीव दूर लोटली जातात.
आत्तापर्यंत माझ्या मैत्रिणींनी मला साधू संत सगळ म्हटल होत…आता म्हणे अग तुझ्यातला राक्षस पण येतो म्हणयचा कधी मधी बाहेर ..अच्छा म्हणून तू आपल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात गोफ विणू बाई गोफ विणू खेळताना रमते होय…आता कॉफी पाज इतका वेळ तुझ भाषण आईकलं…
चला ग तोवर आपण हीचा आवडता खेळ खेळू…अस म्हणत खरंच गोफ विणू बाई चां खेळ रंगला..आणि पुन्हा एकदा हास्याचे फवारे सुरू…
आरती सिन्नरकर